Sunday, December 28, 2014

From the top of the world!

Yes literally the top of the world !  Yes Burj Khalifa it is !

Last week I visited Dubai with my family..The view from the top was mesmerizing! The fountain show and the sunset, lights and everything.. It was amazing. 

Some people say , you can actually see the curvature of the earth, well it might be true but I couldn't see it.. What me and my sister did was simply taking selfies! Well that was after looking around for some time :P

खरच एवढ्या उंचीवर खूप खूप छान वाटत होतं !

More about Dubai , its a perfect example of what a transformation is.. I gues after some years people might not believe that it was simply a desert at some point of time.. Its a place where you can spend a lot of money. :) So be careful!

Dubai was nice, most of our tour was tall buildings, lavish dinners, some shopping and most importantly a lot of pictures! 

We visited all the emirates of UAE .. Had some great time in the desert...One of the places we visited was Gold souq .. I have never seen so much gold at one location in my life! Its different. Everything is available in multiple sizes and you have so much variety to chose from! Its a paradise if you like to buy gold. 


Sunday, December 21, 2014

चंद्रभागेचे वाळवंट

चंद्रभागेचे वाळवंट


चंद्रभागेचे वाळवंट , दुसरे नकोच वैकुंठ
माधव भरला आकंठ , हासून नाचून !

मनात भरला विठोबा , मुखात भरला तुकोबा
हृदयी भरला ज्ञानोबा , हासून नाचून !

माझ्या खूप खूप आवडता अभंग आहे ! यावेळी अगदी चंद्रभागेवर जायची वेळ आली … मला वाटतंय कि मला अभंगच खूप आवडतो …

आजीला घेऊन पंढरपूर ला गेलो खरं , पण त्या पाण्यात … खर तर फारस पाणी नव्हतच नदीत … तरीही कित्येक लोक श्रद्धेने नदीत अंघोळ करत होते … ठिकठिकाणी विठ्ठल रखुमाई च्या मुर्त्या ठेवल्या होत्या आणि त्यासमोर उभ राहून लोकं फोटो काढत होती…कित्येक भंगलेल्या मुर्त्या त्या पाण्यात वाहून आल्या होत्या … कित्येक लोकांनी कपडे/केस वगैरे त्या पाण्यात अर्पण केले होते … बिचारी चंद्रभागा , तिला काय वाटत असेल …. अर्ध्या वाळवंटाचा तर "parking lot" बनवला होता … मला असा वाटतंय त्या नदीत अंघोळ करणं किंवा न करणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग … त्याबद्दल माझ मत काय हा विषय नाही …


मला खरं तर खूप वेगळ वाटत होतं … असा नाहीये कि पहिल्यांदा पंढरपूर ला गेले , पण दर वेळी मला असाच वाटत … tv वर आषाढी कार्तिकी ला पंढरपूर बघणं वेगळ आणि प्रत्यक्षात तिथला अनुभव घेणं खूप खूप वेगळ आहे …




Sunday, December 14, 2014

Cleanathon

Cleanathon!
What an initiative by ndtv! It was a very unique initiative. I loved the concept of spreading the awareness through media.
NaMo has taken one of the most important initiatives in recent years by making us realize how dirty we are as a country and how we should improve!

Lets talk about NaMo fever some later day. So people who are unaware of cleanathon. Here is little more about it. Many have said that cleanliness is not a one day job or cleanliness can not be achieved with start studded tv show. I am not saying that its a one day job or can be achieved with star studded show , just feel that its a good start!

We are crazy for bollywood and cricket. Someone just decided to use this craze for a good cause!

I should not be writing more as I haven't done anything to be a part of cleanathon! :(

Sunday, November 16, 2014

कदाचित आज



कदाचित आज मिळतील सगळी उत्तर
काही विचारलेल्या प्रश्नांची आणि काही न विचारलेल्या


कदाचित आज सुटतील सगळे प्रश्न
काही प्रश्न सतावणारे आणि बरेच इतर


कदाचित आज मिटतील सगळ्या चिंता
झोप उडवणाऱ्या आणि तोंडच पाणी पळवणाऱ्या

कदाचित आजच सुरु होईल एक नवीन आयुष्य
माझ्या मनातल माझ्या स्वप्नातलं 



-----------------------------------------------------------------
आहे त्यात आनंद न शोधू शकणाऱ्या आपल्या सर्वांसाठी

Sunday, July 13, 2014

The art of chilling!

मागच्या आठवड्यात एका मित्राला भेटले …त्याच्याकडून शिकण्यासारख आहे बरच पण सगळ्यात महत्वाच आहे ते Art of chilling!

पहिला बोट आणि करंगळी वर करायची , उरलेली बोटं दुमडायाची ! And you are a disciple of art of chilling!
Unfortunately I am still learning that art but I can direct you to the concerned person! :P

art of chilling is not "not ever getting into panic mode".. Its handling the panic mode I guess... Take it easy , just chill वगैरे शब्द ऐकायला भारी वाटतात पण आपण असा काहीही करत नाही … पण आता I am going on the route of chilling!

एकदम मस्त chilled out attitude.. काय होईल , कधी होईल हे सगळ सोडून आत्ता मी काय करू यावर लक्ष !
केवढा भारी वाटतं अस काहीतरी लिहायला ! लोक संगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण !

Anyways coming back to my dear friend, he is a person who can make you "CHILL". His two patented works , "Chill" and "Peace" will not allow you to fight with him! WoW! Such an amazing advantage it has!

So next time my boss asks me for something , I will say "Chill" :P
Next time my sister decides to pick up a fight , "Peace"

The only person for whom this wont work is the master! Its his way , so I will have to figure out a way to work around that...

Anyways , I will write in more details once I learn and in a position to explain it.

Till then

पहिला बोट आणि करंगळी वर करा, उरलेली बोटं दुमडा आणि मग "Chill"


           

Sunday, July 6, 2014


भकास !

आज खरच भकास / उदास शहर म्हणजे काय  मी आज पहिल ! बापरे त्या जुन्या भिंती , रिकामे रस्ते , जागा दिसेल तिथे केलेली ग्राफिटी , कचरा आणि चहूकडे पसरलेली उदासीनता !

कितीतरी अर्धवट पडलेल्या इमारती , फुटलेल्या काचा , मला माहित नाही कि हे शहर त्याच्या चांगल्या काळात कस होत? पण आत्ता मात्र अगदी न बघावाणारी स्थिती आहे ,

अशाच एका इमारतीच मनोगत

-------
हो मीच बोलतीये … खर तर आता बोलायला काही उरल नाहीये आणि त्यापेक्षाही आता माझं ऐकायला कुणी उरला नाहीये … कुण्या एके काळी लोकं मला ओळखायची … माझ्या आसपास गर्दी असायची …. कित्येकांची स्वप्न , कुटुंब , आशा - निराशा माझ्याशी जोडलेल्या होत्या ! इथेच बघून कुणी निराशेच्या वादळातून सावरल … कुणी त्यात वाहत जाउन स्वतःला हरवलं …. कुणी उंच उंच आकाशात झेप घेतली तर कुणी त्याच उंचीवरून उडी मारून सर्वस्व गमावलं !

पण आज इथे कुणीच नाही , माझ्याशी बोलायला , त्यांच्या व्यथा सांगायला , त्यांची सुखं - दुःखं मांडायला …
माझा अस्तित्वच जणू नकोस झालाय सगळ्यांना … समोरच्या इमारतीच्या आरशात स्वतःला बघण्याच सुख सुद्धा नाही माझ्या नशिबी आता … तीही बिचारी अगदीच कोलमडली आहे …

माझीही काही स्वप्न असतील ना? मलाही कित्येकांना मोठ होताना बघायचा होत , आकाशात उंच उडताना पहायच होत … पण सगळ सगळ संपल!

आता आहे मी आणि माझा एकटेपणा … आणि वाट बघतोय आम्ही …
-----

Detroit downtown

Sunday, June 22, 2014

मनोगत - आजच्या कर्णाचं

आज खूप दिवसांनी महाभारतातल्या एका  पात्राची आठवण आली … कर्ण …

आणि लक्षात आल कि खरच महाभारत हि एका कोणत्या युगात घडलेली गोष्ट नाही , हा आपला इतिहास नाही ! हि पुन्हा पुन्हा प्रत्येकाच्या मनात घडणारी गोष्ट आहे … कधी आपण अतिशय एकाग्र असणारे  अर्जुन असतो , कधी समोरच्याला संजून घेणारे -संयमी असे  धर्म , कधी आपल्याच शब्दात प्रतिज्ञेत  अडकलेले भीष्म तर कधी कृष्ण !

आज माझ्या मनात कर्ण आहे … शस्त्रस्पर्धेच्या वेळेचा

***

आज मी या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करून आलो आहे … माझी वर्षांची मेहनत , तपस्या सगळ काही सोबत घेऊन , आज मला या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करायच आहे … जेव्हा माझ्या आसपासची लोकं इतरत्र वेळ  वाया घालवत होती , मी मात्र सराव केला … माझ मन माझ्या ध्येयापासून हलु दिलं नाही … फक्त आणि फक्त माझ ध्येय माझ्यासाठी महत्वाच होत ! आणि अजूनही आहे … पण आज फक्त आणि फक्त मी सूतपुत्र आहे म्हणून माझा अपमान होतो ? माझी गुणवत्ता न तपासता ? जर मी कशात कमी पडत असेन आणि म्हणून माझा अपमान झाला किंवा जर माझी योग्यता नाही म्हणून मी नाकारला गेलो तर मला वाईट वाटणार नाही … उलट आनंदच होईल कि एका पराक्रमी विराकडून माझा पराजय झाला , पण फक्त माझं कुळ / जात अशा गोष्टींवरून मला नाकारल जावं ?

एखाद्या माणसाचा स्वभाव , त्याची गुणवत्ता फक्त त्याच्या जात / कुळ /रंग अशा गोष्टींवरून ठरवली जाणार असेल तर काय अर्थ आहे ? मला स्वतःच म्हणणं मांडायची संधी तर द्या… मी नक्की कोण आहे कसा आहे हे तर समजून घ्या … तुमच्या राजघराण्यातल्या लोकांपेक्षा देखील उत्तम धनुर्विद्या मी प्राप्त केलेली आहे ….

पण केवळ राधेय असल्यामुळे आज … पण आज जे काही मी आहे ते केवळ त्या राधेमुळेच … सूतपुत्र असण्याची मला अजिबात लाज नाही फक्त आणि फक्त अभिमान आहे ….

***

Sunday, June 15, 2014

Random - अगदीच random

आज सुर्य आहे तळपणारा पण त्याची उष्णता जाणवत नाहीये 
मन बेभान होऊन नाचतंय त्याला दम लागत नाहीये !

जोरदार वारा सुटलाय वादळ सुद्धा येईल कदाचित 
पण या बेधुंद मनामुळे तेही जाणवत नाहीये !

किती गर्दी आहे आजूबाजूला , किती वेळ वाया जातोय 
उडणार्या मनाला मात्र एक वेगळच आकाश दिसतंय !

तळपणारा सुर्य , सुटलेला वारा , आजूबाजूची माणस
कशाचा कशाचा परिणाम होईना 
अर्रे मना मला तुझ वागणं काही केल्या समजेना !

कितीही अडथळे येउदेत समोर , मन काही थकेना 
उंच उंच उडण्याची हि मनाची उमेद काही केल्या तुटेना !

सुंदर स्वप्न बघण्यासाठी आता झोपायची गरज नाही 
उघड्या डोळ्यांना दिसणारं जग त्याहीपेक्षा सुंदर आहे !


Sunday, June 8, 2014

The unknown unknowns!

Recently we had a heated discussion in the office..Unfortunately our side kind of won the argument. :(
Now you will say why am I sad for that? Because later my mentor told me that you are playing with unknown unknowns.. Be very very careful!

WoW!

Unknown-unknowns! (It was almost a mentos moment for me! - दिमाग की बत्ती जल गयी  ! )

Hmm now I am thinking... Unknown unknowns , what a weird concept.. Although it sounds weird , its a very wonderful concept.

Originally this phrase comes from  United States Secretary of Defense Donald Rumsfeld.. He had once said,

"that something hasn't happened are always interesting to me, because as we know, there are known knowns; there are things that we know that we know. We also know there are known unknowns; that is to say we know there are some things we do not know. But there are also unknown unknowns, the ones we don't know we don't know."

Isn't it worth giving a thought..It just changed a lot of things for me..We know that we are unaware of some things and we assume that we know what we are unaware of!

खरच जर आपण हे मान्य केल कि खरच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित सुद्धा नाही कि माहित नाहीयेत तर लोकांकडे , परिस्थितीकडे बघायला किती सोप जाइल ना? उगीचच आपल्या परीने लोकांच्या वागण्याचे बोलण्याचे अर्थ लावण बंद होईल !

Anyways enough philosophy ! But truly it is something to think about..Something to ponder upon and surely something to keep in mind every single day!


Sunday, June 1, 2014

श्वास !

खर तर आज वरच्या आयुष्यात सगळ्यात गृहीत धरलेली गोष्ट म्हणजे श्वास ! आपण श्वास घेतच असतो जन्मल्यापासून , त्यात होण्या न होण्यासारखं काय आहे ? एका सेकंदाला कित्येक वेळा श्वास घेत असतो आपण … त्यात काय एवढ ? आपण त्या श्वासाला महत्व सुद्धा देत नाही . असाच या आठवड्यात विचार आला आणि लक्षात आलं कि किती गृहीत धरतो या श्वासाला आपण …


---

जगण्याची सुरुवात करताना घेतलेला तो पहिला श्वास…
आणि तो ऐकून बाकीच्यांनी घेतलेला सुटकेचा श्वास…

अतिशय सुंदर कलाकृती बघताना रोखलेला श्वास…
सर्कशीतल "थ्रिल" बघताना खिळलेला श्वास …

पहिल्यांदा प्रेमाची जाणीव झाल्यावर चुकलेला श्वास…
विरहात सुद्धा मोजलेला प्रत्येक अन प्रत्येक श्वास …

भयानक संकटाला तोंड देताना हरवलेला श्वास …
आणि त्यातून बाहेर आल्यावर सुटकेचा श्वास …

खोल समुद्रात घट्ट धरून ठेवलेला श्वास …
वर आल्यावर घेतलेला मोकळा श्वास …

पिंजर्यात अडकलेला तो घुसमटलेला श्वास..
आणि स्वतंत्र झाल्यावर घेतलेला हि मोकळ श्वास …

आयुष्य संपताना घेतलेला तो शेवटचा श्वास …
आणि तो ऐकताना खिळलेला बाकीच्यांचा श्वास…

----

अगदी " झीन्दगि न मिलेगी दोबारा " मध्ये सांगितल्यासारख , " बस सास लेते रहो !"
खरच अवघड प्रसंगी श्वास घेत राहिलं कि मार्ग हळूहळू सापडत जातील

---




Sunday, May 25, 2014

निबंध : मोर

मोरावारचा निबंध आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असणार …

माझा आवडता पक्षी "मोर "… मग मोराच्या सौंदर्याचा वर्णन , पिसार्याचा वर्णन , निळ्या मानेबाद्दलचा वर्णन आलच ! त्यानंतर त्याचा मिआओ मिआओ असा आवाज… मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी , पावसात नाचणारा मोर वगैरे वगैरे !!

खर तर आवडता पक्षी होण्यासाठी , आपल्या पैकी किती जणांनी तो नाचणारा मोर पाहिलाय ? मी तर कायम मंदपणे हळू हळू पिसार्याने जमीन झाडत चालणारच मोर पहिला … आपला दुगु दुगु चालतोय मोर!

काल पहिल्यांदा मी नाचणारा पिसारा फुलवलेला मोर पहिला तोहो अगदी जवळून आणि माझा मोराचा निबंधच बदलून गेला ! तर हा नव्याने लिहिलेला मोराचा निबंध !


निबंध : मोर (पुन्हा एकदा )

मोर , खरच किती सुंदर पिसारा आहे त्याचा , अगदी मस्त ! त्यावरचे ते रंगीत डोळे , तो मऊसुत पिसे अप्रतिम!
ती निळीशार मान , त्यावरचा तो रुबाबदार तुरा ! सुंदर ! जणू काही निसर्गाने सुंदर रंगांची उधळणच केलीये त्यावर ! तो फुललेला पिसारा… थरथरणारा मोर … कदाचित त्या ओइसनच्य ओझ्याने थरथरत असेल का तो ?
एवढी पिसं उभी करण , खूप खूप अवघड आहे !

इतका सुंदर असेल तरी त्या लांडोरीला पटवता पटवता जीव जातोय बिचार्याचा …. किती वेळ हा बिचारा तिच्या मागे लागलाय , पिसाराच फुलव … तिच्या जवळच जा … तिला पिसार्याचा स्पर्श तर कर … पण लांडोर बाई काडीचा सुद्धा लक्ष देत नाहीत पठ्याकडे ! ह्याचा आपला चालू आहे !

मोराचे काही भाग खूप सुंदर असले तरी त्याला बर्यापैकी कुरूप अवयव सुद्धा आहेत बरं का !! :) :)
त्याचे पाय अतिशय विचित्र दिसतात आणि आवाज कर्ण कर्कश ! अतिशय मोठा ! बरं पिसारा खूप सुंदर पण तो फुलवला कि मागून मोर फार विचित्र दिसतो !

तात्पर्य असे कि एवढ्या सुंदर मोराला सुद्धा काही कुरूप अवयव असतातच कि तर मग आपण कशाला रडायच ?
बर्याच सौंदर्य शास्त्रांच्या पुस्तकांमध्ये लिहिलंय , "तुमच सगळ्यात सुंदर feature highlight करा !"

असो मोर खराच खूप खूप सुंदर असतो , ते कुरुप अवयवांच वर्णन फक्त याच्यासाठी कि आपल्यासारखे लोक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी रडत बसतात , माझ नाकच चाफेकळी नाही किंवा माझा रंगच गोरा नाही …. पण एकदा स्वतःकडे बघून कळेल कि आपल्याकडच्या काही गोष्टी कुणाकडेच  नाहीत !


Sunday, May 11, 2014

Being Hopeful on a dull day

Its from the redcent Amazing Spiderman movie.

Would really like to copy some portion of the actress's speech here.

"I know that we all think we're immortal, we're supposed to feel that way, we're graduating. The future is and should be bright, but, like our brief four years in high school, what makes life valuable is that it doesn't last forever, what makes it precious is that it ends. I know that now more than ever. And I say it today of all days to remind us that time is luck. So don't waste it living somebody else's life, make yours count for something. Fight for what matters to you, no matter what. Because even if you fall short or even if we fail... what better way is there to live?"

" It's easy to feel hopeful on a beautiful day like today, but there will be dark days ahead of us, too. There will be days when you feel alone, and that is when hope is needed most. No matter how buried it gets or how lost you feel, you must promise me that you will hold onto hope. Keep it alive. We have to be greater than what we suffer. My wish for you is to become hope - people need that. And even if we fail, what better way is there to live? As we look around here today, at all the people who helped make us who we are, I know it feels like we are saying goodbye, but we will carry a piece of each other into everything that we do next, to remind us of who we are and who we are meant to be."

खरच आपण जग जिंकू शकतो हे वाटणा अगदी अगदी साहजिक आहे ! आणि तस ध्येय ठेवण पण उत्तम आहे! "जग जिकायची ईर्ष्या दाटो चित्ती " … एखाद्या सुन्दर दिवशी खूप चांगल आणि भविष्याबद्दल आशादायी वाटण साहजिक आहे पण ते पुरेसं नाही … एखद्या कठीण दिवशी , संकटांनी घेरलेला असताना भविष्याबद्दल आशादायी वाटणं महत्वाच आहे ! याहूनही पुढे जाउन … आशादायी होण्यापेक्षा आपण "आशा " व्हायला हव!

खूप सुंदर वाक्य आहेत या चित्रपटातली !

Sunday, April 13, 2014

Follow the light : From "The Croods"


Wonderful movie.. Its about the struggle of world's first family to survive. The most important lesson it teaches is of :following the light" , not being scared of anything.. Beautifully made animation film..It captures different emotions and different kind of people inside family very well! The protective father , caring mother , angry grandmother , lazy son , naughty younger daughter and brave elder daughter.
One fine day , a "guy" comes to their life and their life changes for good. The guy teaches them about following your heart , solving problems with ideas rather than power , being courageous and most importantly follow the light.. I am too impressed with the screenplay and the story

I will leave you with the opening speech of the movie 

"With every sun comes a new day. A new beginning. A hope that things will be better today than they were yesterday. But not for me. My name is Eep. And this is my family, the Croods. If you weren't clued in already by the animal skins and sloping foreheads, we're cavemen. Most days we spend in our cave, in the dark. Night after night, day after day. Yep, home sweet home. When we did go out, we struggled to find food in a harsh and hostile world. And I struggled to survive my family. We were the last ones around. There used to be neighbors. Uh, the Gorts, smashed by a mammoth. The Horks, swallowed by a sand snake. The Erfs, mosquito bite. Throgs, common cold. And the Croods, that's us. The Croods made it, because of my dad. He was strong, and he followed the rules. The ones painted on the cave walls. Anything new is bad. Curiosity is bad. Going out at night is bad. Basically, anything fun is bad. Welcome to my world! But this is a story about how all that changed in an instant. Because what we didn't know was that our world was about to come to an end. And there were no rules on our cave walls to prepare us for that."

Sunday, April 6, 2014

Life : Pointless ?? Hmmm

So after a long time, I was reading a book related to Life!
The book is "Bringers of Light".. Very interesting book to read..

One of the points mentioned in the book is "Life is Pointless! "

अर्ध जग आयुष्याचा point शोधण्यात अर्ध आयुष्य घालवत ! आणि इथे तर हा लेखक म्हणतो आयुष्याला काही point च नाही !! त्याचं म्हणण अस आहे कि आयुष्याचा point शोधण्यात काहीच अर्थ नाही ! कारण आयुष्याला काही point नसतो … लेखकाच्या मते हा "point" शोधण्यापेक्षा तो बनवणे जास्त योग्य आहे !

खूप वेगळा विचार वाटला मला हा … सामान्यतः आयुष्याचा अर्थ किंवा "so called point" शोधण्यात लोक आयुष्य घालवतात आणि संयासाश्रमात तो मिळाला नाही म्हणून मुक्ती शोधतात !

जाउदे एवढ सगळं मांडण्याचा माझा आयुष्याचा काही अनुभव नाही … फक्त एवढाच कि हा एक वेगळा विचार वाटला….


Sunday, March 30, 2014

Moving Moving!!

पुन्हा एकदा moving! आधी खूप कमी सामान होत, आता हळू हळू सामान वाढायला लागलय ! आणि हे फक्त moving च्या वेळी कळत !! केवढ सामान असतं माणसाचं ! अशा वेळी मला अचान साधी राहणी आणि उच्च विचारसरणी वगैरे वगैरे वक्तव्य आठवायला लागतात ! मग एवढ सामान का घेतला असेन मी वगैरे वगैरे प्रश्न मला पडतात !

भांडी कुंडी , पुस्तक , कपडे , चपला , फर्निचर आणि काय काय गोष्टी !

दोन दिवस एकदम भरपूर मेहनत ! नवीन घरात येण्याचा उत्साह ! नवीन जागेशी नसलेला नातं …
सगळ एकदम मस्त असतं !


Sunday, March 23, 2014

The Correlation Syndrom

काल एक मस्त पिक्चर पहिला "क्वीन" ! पिक्चर तर मस्त आहेच पण त्याबद्दल नंतर कधीतरी… आत्ता फक्त माझा मुद्दा समजवण्यासाठी जेवढा गरजेच आहे तेवढच ….

तर ह्या चित्रपटची नायिका एकदम सरळ साधी … लग्नाच्या एक दिवस आधी तिचा होणारा नवरा सांगतो कि तो तिच्याशी लग्न नाही करू शकणार … मग ती अगदी तुटून जाते … पण मग ती युरोप ला जाण्याचा (ते सुद्धा एकटी ) निर्णय घेते … तिथे तिला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात आणि बरेच चांगले वाईट अनुभव येतात ! तर हि गोष्ट आहे "ती " ची … "ती " उमलण्याची ! "ती " च फुलपाखरात रुपांतर होण्याची !

असो छान गोष्ट आहे । थोडक्यात काय , तर एक मुलगी स्वतःच अस्तित्व शोधते आणि स्वतंत्र होते !

पिक्चर मधून निघताना विक्रांत म्हणाला (एका बायकांच्या घोळक्याकडे बघून ) ," आता या सगळ्या बायका liberate होण्याचा विचार करणार !! "

खरच आपल्या मध्ये हा खूप मोठ्ठा problem असतो ! एखाद्या पिक्चर मध्ये काही दाखवला कि आपण लगेच त्याला relate करणार !!

जब वि मेट पहिला कि सगळ्या मुली बडबड करायला लागणार … विवाह पहिला कि लगेच arranged marriage च वेड  लागणार! ३ इडियट पहिला कि गळ्यात केमेरा दिसणार ! वेडेच असतो आपण ! लगेच त्या चित्रपटाची गोष्ट किती माझ्या आयुष्यशी निगडीत आहे , हे आपण शोधणार !

आता क्वीन बघून लगेच मला किती वाईट वागवलं जातंय याच रडगाणं ! अर्रे पिक्चर हा पिक्चर पुरता मर्यादित असतो हे कसा विसरतो आपण ? सगळ काही आपल्या आयुष्याशी जोडायलाच पाहिजे का ?

उगीच आपल !






Sunday, March 16, 2014

आशा ...

Malaysian Airlines Flight 370.. खरी न वाटणारी घटना , खरच अस सुद्धा होउ शकत? एखादी घटना आणि त्यामागची असंख्य कारण ! खरच जगाला हादरवणारी घटनाच म्हणावी लागेल…

विमान लापत्ता होणे कमी कि काय म्हणून विमान चालकाच्या घरी "simulator" सापडणे … २ लोकांकडे खोटे पासपोर्ट , विमानाची बदललेली दिशा , २० लोक एकाच कंपनीचे … आणि असंख्य गोष्टी !

या  बातम्या बघताना खरच काही कळेनास होतंय मला…. आपण चंद्रावर आणि मंगळावर गेलो पण आज त्या २००+ कुटुंबांना दिलासा देण्यासाठी समुद्राच्या तळाशी नाही जाऊ शकत … असो हा विषय नाही…

मला या घटनेवरून एक स्पष्ट दिसतंय कि कोणत्याही गोष्टीच विश्लेषण हि खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे … एखादी घटना सरळ साधी नसते , त्यामागे खूप खूप कारणे /  छुपे motives असू शकतात …

आज आपण सगळे इतक्या विचारात आहोत तर या २००+ कुटुंबियांची मनस्थिती कशी असेल याचा  अंदाज लावण सुद्धा अवघड आहे … खूप मनापासून वाटतंय कि  विमान मिळाव आणि सर्व हे सर्व लोक आपल्या आपल्या घरी  पोचावेत … जोपर्यंत काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत आशा कायम आहे …

-------

आशा

जर आशा आहे तोपर्यंत सगळ काही शक्य आहे , या आशेच्या बळावरच तर आपणा चालत असतो …
मला  हिंदी शब्द "उम्मीद " प्रचंड आवडतो … "उम्मीद ही तो सब कुछ है !"

सगळे गुंते सुटतील , बंद दरवाजे उघडतील ,
अर्धवट गणित सुटतील , अवघड प्रश्न सुद्धा सुटतील
पण हि आशा नको सोडूस , हरून नको जाउस

रणरणत्या उन्हात असलेल्या माणसाला मावळत्या सूर्याची आशा
थंडीत कुडकुडत असलेल्याला त्या तापलेल्या सूर्याची आशा
हि आशा आहे म्हणूनच तर ….

कुणाला प्रीयाजानांनी सुखरूप परतायची आशा
कुणाला संकटे टाळून जायची आशा
कुणी भेटेल अशी आशा … सर्व काही आधीसारखं होईल अशीशी आशाच !

-----





Sunday, March 9, 2014

The Big if else Phenomenon!

 Well, well well look who is getting into programming! Let me explain a little about the "if else" statements in programming languages for some of us who do not have any background in programming. When you are writing a code, you need to account for all possible situations and conditions. You are building your logic for what if this happens, what if that happens! So the widely followed syntax is

If (a happens)
         {Do B}
Else
         {Do C}

To make it a little more complex

If ( A happens)
         {Do B}
Else If (C happens)
          {Do C}
Else
          {Do D}



Hmmm.. Interesting! Are we not following a big big "If Else" code in our lives!! Its a built in code that determines everything in life!

For example : If I am hungry, I eat else I do not eat
or If you hit me , I will be hurt else (I will hit you back!!)

or If this happens , I am in good mood else .....

Wow! This is amazing.. Now that I am looking at everything as If else code, I have tons and tons of examples!

I love this concept of applying If else to everything!






Sunday, March 2, 2014

मला सुद्धा पडलेत काही प्रश्न … उत्तरे शोधावीत कि नाही हा सुद्धा त्यातलाच एक!!

जीवाची होणारी घालमेल , कधी अचानक पणे स्वतःच अस्तित्व दाखवणारा "ताण"… काही गोष्टींसाठी कितीही केली तरी कमी पडणारी मेहनत …. आणि बरच काही … खर तर मी आत्ता जे लिहित आहे , ते लिहावं का हा सुद्धा एक प्रश्न , मला माहित नाही मी लिहित काय आहे आणि लिहायच काय आहे !

---


अचानक बदलणार वातावरण , कधी खूप ऊन , कधी गारठा , कधी बर्फ तर कधी पाउस ! धो धो पाउस , प्रचंड वारा … मला तर वाटतंय निसर्ग सुद्धा सगळे प्रयत्न करून बघतोय ! बघू बर , काय होतंय म्हणून …. 
हे जग जणू काही त्याचा "test bed" आहे !


---

Sunday, February 23, 2014

हीरा

हीरा

highway चित्रपटात एक खूप सुंदर कबिरांचा दोहा  वापरलाय… प्रचंड philosophy अगदी थोडक्यात सांगणारा दोहा आहे हा !
पहिली चारोळी सांगते कि हिरा खूप ठोकून ठोकून बनवला जातो  , हि गोष्ट आपण समजून घ्यायला हवी … त्या हिऱ्याचा आदर करायला हवा … तसच  एखादा माणूस आपल्या समोर जेव्हा येतो , तो तसा बनण्यासाठी त्याने कष्ट घेतलेले असतात , आपण त्याचा आदर करायला हवा … दुसर्या दोन ओळींमध्ये अस लिहिल आहे कि कितीही पारखून पहिला तरी हिरा तो हिराच ! खोटेपणा कधीतरी बाहेर येतोच पण ज्या हिर्याने इतका त्रास सोसून आकार घेतला त्यात खोत नाही काढता येत


दुसरी चारोळी :
आपला हिरा भाजीच्या बाजारात मांडून ठेवू नये , भाजीच्या बाजारात असताना तो आपल्या जवळ जपून ठेवावा आणि आपल्या मार्गावर चालत राहावे … किती मस्त अर्थ आहे याला ! आपला शहाणपणा कदर नसलेल्या ठिकाणी स्वतःजवळ ठेवावा आणि आपल्या मार्गावर चालत राहावे , कधी न कधी तरी त्या हिर्याला पारखी भेटणारच !

तिसरी चारोळी :
अशाच एका बाजारात एक हिरा रस्त्यावर पडलेला असतो , अनेक लोक त्या रस्त्यावरून ये - जा करतात पण त्यांच्या लक्षात येत नाही तो हिरा , फक्त ज्याला पारख आहे असाच मनुष्य तो हिरा उचलून घेतो !

त्यामुळे आपल्या कडे कुणी लक्ष देत नसल्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आपल्या कडे योग्य व्यक्तीने  लक्ष देण्याचा  आनंद मोठा नाही का ?

Sunday, February 16, 2014

पहिला उरला नाहीस तू ….

पहिला उरला नाहीस तू …. 

खूप दिवसांनी १०फ मधली हि कविता ऐकली! खरच ध्येयवेड्या माणसाला अस बघायची सवयच आहे आपल्याला… असाच दोन मित्रांची मनोगते , एक ध्येयवेडा आणि दुसरा त्याचा मित्र… दोघांनाही एकमेकांची साथ द्यायची आहे, पण मनात गोंधळ सुरु आहे, कुणी कुणाला बोलून दाखवत नाहीये … हे त्यांच्या मनातले गोंधळ 

----
 

तुझ्या ध्येयामागे तू एवढा वेद झालायस कि आधीसारखा राहिलाच नाहीस तू … तू आधीचा …. खरच आधीच्या "तू" मध्ये अस काय होतं जे आताच्या तुझ्यात नाही ? निरर्थक गोष्टींमध्ये गुंतलेला तू …. स्वप्नांकडे जाताना नक्की कुठे चाललायस तू ?


खर तर जेव्हा मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतोय तेंव्हाच स्वतःला शोधतोय…. आधीचा मी आणि आत्ताचा मी … कोण आहे मी … अशावेळी मला सर्वात जास्त गरज आहे ती माझ्या माणसांची , मित्रांची , घराची , कुटुंबियांची … स्वतःला शोधताना जगापासून लांब जावच लागतं का ?
हे स्वतःला शोधण म्हणजे नक्की तरी काय ? स्वतःला नवीन नजरेने पाहणं कि जगाला ?



भरारी घेताना दिसत असत उत्तुंग आकाश पण जमिनीवरची नजर कधी हटत नाही ! जर एखादा अशी उंच भरारी घेत  असेल तर आपण त्याला साथ द्यायची , सांभाळून घ्यायचा  का ध्येयासक्ति पासून प्रवृत्त करायच? 



या नवीन "तू " ला समजून घेण्यासाठी , त्याच्या ध्येयांना, स्वप्नांना समजून घ्याव लागेल… त्याच्या स्वप्नांना त्याच्या नजरेने पहाव लागेल !

--

कधी आपण "तू" असतो तर कधी "तू" चा मित्र ! 

Sunday, February 9, 2014

पुन्हा एकदा..White Rock Lake..

आजचा white rock lake खूप खूप वेगळा आहे नेहमी पेक्षा … सूर्यास्त झालाय आधीच आणि खूप खूप थंडी आहे त्यामुळे आसपास चिटपाखरू सुद्धा नाहीये…कडाक्याची थंडी , बेभान सुटलेला वारा , त्यामुळे निर्माण झालेल्या त्या पाण्याच्या लाटा , हातात कॉफी चा कप आणि मी !

आवाज नाही कुठलाच , फक्त वार्याचा झंझावात , गाड्यांचा आवाज नाही , माणसांचा गोंधळ नाही , काही काही  नाही….अगदी सामसूम सगळीकडे …पाण्याच्या लाटांचा तो अगदी हळू आवाज … एवढ्या थंडीत पक्षी सुद्धा नाहीयेत आसपास, बदकं  सुद्धा दिसेनात पाण्यात …

खर तर मी प्रचंड कुडकुडतीये इथे , लिहिताना अगदी हात थरथरतायत ! पण तरीही बसावसं वाटतंय इथे , हि शांतता आवडतीये … हा बोचरा वारा अनुभवायचा आहे … काय माहित पुन्हा असा योग कधी येईल ?

एवढा वाहणारा वर असून सुद्धा एक स्तब्धता आहे वातावरणात , ती आवडतीये मला मनापासून ! खर तर अजून पुढे जाउन पाण्याच्या अगदी जवळ बसायच आहे…

खर तर सगळ गोठलाय माझ , विचार सुद्धा बहुतेक ,त्यामुळे फार काही सुचतच नाहीये…

माझ आणि या जागेच अस एक वेगळा नात आहे, इथून दिसणार आकाश मला स्वतःचं वाटतं ! इथली झाडं मला माझी वाटतात… इथे आल्यावर एक छान "familiar" feeling येतं ! आणि मग एकदम "philosophical" type वाटायला लागतं ! मजेशीर असतो  आपण अगदी ! शांत जागा , निसर्ग वगैरे दिसला कि अचानक आयुष्याबद्दल विचार सुरु !! :) :) :) अचानक आयुष्यातले प्रश्न, त्यांची उत्तरं , अनुभव, आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी वगैरे वगैरे ! अस करायला हव मी , तस व्हायला हव वगैरे वगैरे , सगळ तत्वज्ञान कस घडाघडा आठवायला लागत !! एकदम स्फुरण चढत , आपण म्हणजे एकदम भारी वगैरे वगैरे वाटण्याचे chances वाढायला लागतात !

बापरे , माझ्या बाबतीत अस होण्याच्या आधी इथून उठलेल बरं ! कारण हे सगळ वाटणं ठीक आहे , पण एकदा इथून उठल्यावर त्याचा संपूर्णपणे विसर पडणार असतो ! घरी जाउन पुन्हा आपल नेहमीच सुरु!!








Sunday, February 2, 2014

Catching Fire!

Hunger Games! खरच एक विलक्षण गोष्ट आहे ही !
अजून मी पुस्तक वाचल नाहीये एकही , पण गोष्ट सुंदर आहे…चित्रपट कसे आहेत , याबद्दल इथे चर्चा करायचा अजिबात मानस नाही माझा !

(And knowing the films I watch, I don't think my little "Film Critique" will be valued!)

It is an extra ordinary story of possibilities, imagining the future, human tendencies to react towards fear..The attitude towards systems.. The story captures the human element of all of this very very well.. It is the story of Katnis Everdeen ,the girl on fire.. A story of ordinary girl with extra ordinary will power to survive! Here love for her sister..The moment she participates in the "Hunger Games" , her life changes..and so does everyone elses..People start to think, people start to imagine the possibilities , they start imagining the concept of "FREEDOM", The concept almost unheard of in all the districts.. The hidden fighter starts to find his way out after been entrapped in people for ages..

Amazing storyline and I am sure the books are also a great piece of work.. Planning on reading the books sometime..For now, Cant wait for the next movie!

Sunday, January 26, 2014

अजूनही..


आरसा तोच आहे अजूनही
चेहरे मात्र बदललेत..

रस्ते तिथेच आहेत अजूनही
सोबती मात्र हरवलेत

आठवणी तशाच आहेत अजूनही
जोडलेल्या भावना मात्र बदलल्यायत..

उत्तरेचा तो ध्रुव अढळच आहे अजूनही
दिशा मात्र हरवल्यायत..

सूर्य उगवतोय रोज अजूनही...
दिवस मात्र हरवलेत..

रात्रराणीची जादू तशीच आहे अजूनही..
तिचा सखा मात्र हरवलाय..

खूप खूप सुचतंय अजूनही..
पेनातली शाई मात्र संपतीये..

Sunday, January 19, 2014

That thing!



That thing
           wakes you up every single morning
That thing
            keeps the desire burning
That thing
            makes you strive for excellence
That thing
            brings smile on your face even when you are totally exhausted
That thing
            makes your life truly fabulous
That thing
            brings twinkle in your eyes
That thing
            makes you play harder
That thing
            finds inspiration for you everywhere
That thing
            makes you see the best in everyone!



Sunday, January 12, 2014

काही गोष्टी न बदलणाऱ्या …

खरच… काही गोष्टी कधीही न बदलणाऱ्या असतात… कितीही वर्ष उलटली तरीही त्या गोष्टींमध्ये तसूभर सुद्धा फरक जाणवत नाही ! या वेळी जाणवलेल्या काही गोष्टी

मागच्या महिन्यात नाशिकला गेले होते…एका मैत्रिणीच्या  निमित्ताने … अगदी २४ तासांपेक्षाही  कमी वेळ होते… पण खरंच खूप मस्त वाटलं !! कित्येक जण कॉलेज नंतर आत्ताच भेटले… एवढ्या वर्षांनी  सुद्धा तेच जोक्स , त्याच गप्पा आणि तरीही सगळ हवं हवंसं वाटत होतं !!



याआधी नाशिकला मी २००६ मध्ये गेले होते… तब्बल ८ वर्षांनी पुन्हा गेले … सगळ्यात न बदललेली गोष्टं म्हणजे नागलकर काका काकू , दीदी , तुषार आणि घर! मी अगदी लहान असल्यापासून जातीये तिथे ! खरच खूप खूप छान वाटलं … आणि योग योगाने दीदी आणि तुषार ची सुद्धा भेट झाली… इतक्या वर्षांनी जाउन सुद्धा मला तिथे अजिबात नवीन वाटत नव्हतं ! अगदी "At peace , at home" वाटत होतं…अगदी सकाळी बसून पेपर वाचण्याची जागा , नेहमी च्या dining table वरच्या गप्पा , आजीबात न बदललेली खालची रूम !
मस्त एकदम !खरच असच राहील का हे सगळं कायम ? आपली माणसं … आपल्या जागा… सगळ अगदी तसच्या तस !!



आम्ही नेह्मो लातूर ला जायचा रस्ता , भिगवण च तेच हॉटेल…. तिथला तोच नाश्ता ….गेल्या १५ वर्षांपासून आम्ही लातूरला त्याच रस्त्यावरून जातो आणि त्याच ठिकाणी "हॉटेल सागर " मध्ये नाश्ता करतो आणि पुढे तेम्भूर्णी ला "संत सावतामाळी " टपरी वरचा चहा !! I am a BIG fan of that tea! Its been there since I dont know when, I just love their TEA! इतक्या वर्षात त्यांनी टपरी सुद्धा बदलली नाहीये!!
खिडकीतून बाहेर बघताना सुद्धा त्याच ओळखीच्या गोष्टी,  दूर वरून दिसणाऱ्या निळ्या छप्परांच्या पेपर कंपनीच्या ईमारती … ती कंपनी दोनदा विकली गेली , ज्याने कोणी घेतली त्याने कधीही निळ्या रंगाच छप्पर बदलण्याचा विचार केला नाही वाटतं …. येडशीच्या घाटा नंतर चा cold drink spot! तिथे नेहमी MRP पेक्षा जास्त किमतीत विकल जाणार पाणी आणि कोक! आणि माझा नेहमीच उत्तर माहित असून सुद्धा वाद घालायचा अट्टाहास!! गाडीतली नेहमीची चर्चा आणि कधी हि न संपणारे विषय / वाद !!


काही काही म्हणून बदलत नाही …खरच आणि काही बदलाव असा वाटत सुद्धा नाही !! असू देत असच सगळ!