Sunday, May 25, 2014

निबंध : मोर

मोरावारचा निबंध आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असणार …

माझा आवडता पक्षी "मोर "… मग मोराच्या सौंदर्याचा वर्णन , पिसार्याचा वर्णन , निळ्या मानेबाद्दलचा वर्णन आलच ! त्यानंतर त्याचा मिआओ मिआओ असा आवाज… मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी , पावसात नाचणारा मोर वगैरे वगैरे !!

खर तर आवडता पक्षी होण्यासाठी , आपल्या पैकी किती जणांनी तो नाचणारा मोर पाहिलाय ? मी तर कायम मंदपणे हळू हळू पिसार्याने जमीन झाडत चालणारच मोर पहिला … आपला दुगु दुगु चालतोय मोर!

काल पहिल्यांदा मी नाचणारा पिसारा फुलवलेला मोर पहिला तोहो अगदी जवळून आणि माझा मोराचा निबंधच बदलून गेला ! तर हा नव्याने लिहिलेला मोराचा निबंध !


निबंध : मोर (पुन्हा एकदा )

मोर , खरच किती सुंदर पिसारा आहे त्याचा , अगदी मस्त ! त्यावरचे ते रंगीत डोळे , तो मऊसुत पिसे अप्रतिम!
ती निळीशार मान , त्यावरचा तो रुबाबदार तुरा ! सुंदर ! जणू काही निसर्गाने सुंदर रंगांची उधळणच केलीये त्यावर ! तो फुललेला पिसारा… थरथरणारा मोर … कदाचित त्या ओइसनच्य ओझ्याने थरथरत असेल का तो ?
एवढी पिसं उभी करण , खूप खूप अवघड आहे !

इतका सुंदर असेल तरी त्या लांडोरीला पटवता पटवता जीव जातोय बिचार्याचा …. किती वेळ हा बिचारा तिच्या मागे लागलाय , पिसाराच फुलव … तिच्या जवळच जा … तिला पिसार्याचा स्पर्श तर कर … पण लांडोर बाई काडीचा सुद्धा लक्ष देत नाहीत पठ्याकडे ! ह्याचा आपला चालू आहे !

मोराचे काही भाग खूप सुंदर असले तरी त्याला बर्यापैकी कुरूप अवयव सुद्धा आहेत बरं का !! :) :)
त्याचे पाय अतिशय विचित्र दिसतात आणि आवाज कर्ण कर्कश ! अतिशय मोठा ! बरं पिसारा खूप सुंदर पण तो फुलवला कि मागून मोर फार विचित्र दिसतो !

तात्पर्य असे कि एवढ्या सुंदर मोराला सुद्धा काही कुरूप अवयव असतातच कि तर मग आपण कशाला रडायच ?
बर्याच सौंदर्य शास्त्रांच्या पुस्तकांमध्ये लिहिलंय , "तुमच सगळ्यात सुंदर feature highlight करा !"

असो मोर खराच खूप खूप सुंदर असतो , ते कुरुप अवयवांच वर्णन फक्त याच्यासाठी कि आपल्यासारखे लोक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी रडत बसतात , माझ नाकच चाफेकळी नाही किंवा माझा रंगच गोरा नाही …. पण एकदा स्वतःकडे बघून कळेल कि आपल्याकडच्या काही गोष्टी कुणाकडेच  नाहीत !


No comments:

Post a Comment