Sunday, August 14, 2016

या ढगांच्या मागे चंद्र आहे हे मला माहितीच नसत तर कदाचित मी त्याची वाटच बघितली नसती
उगीचच बघितला चंद्र ... आता ढग कधी जातील आणि पुन्हा चंद्र केव्हा दिसेल याची ओढ !

पण जर मला माहीतच नसतं चंद्र आहे , ढगांमागे का असेना , आहे नक्की तर....
तर वाटच पहिली नसती मी त्याची ... थांबले नसते त्यासाठी ...

पण मग ते सुंदर प्रतिबिंब ... ते सुद्धा नसतं पाहायला मिळालं ना ?
शांत तलाव , बोटी , चंद्रबिंब ... आणि मंद वर ... आहाहा

कशाला हवयं असलं क्षणिक सुख .. नकोच ते प्रतिबिंब
नकोच तो चंद्र आणि नकोच आस , पुन्हा ढग दूर होण्याची !

-----

काय मजेशीर असत ना मन , हेही हवय आणि तेही !

-----

आज संध्याकाळी मस्त Ray hubbard lake च्या इथे जेवायला गेलो होतो आम्ही,... पोचलो तेव्हा सुंदर चारदा दिसत होता , पाण्यात  प्रतिबिंब सुद्धा दिसत होत आणि काही वेळाने चंद्र दिसेनासा झाला. भरून आल होता आकाश ... खूप खूप ढगाळ वातावरण !
----