Sunday, August 25, 2013

On Making choices!

Was watching the latest episode of suits yesterday.
Jessica says, "Sometimes you have to put your family in such a situation where there wont be other choices.It will be the only choice"..It is so true sometimes.

अगदी खर सांगायच तर बरेच पर्याय असल्यावर निर्णय घेण फार फार अवघड होऊन जातं ! मग वाटत , कि नकोच इतके पर्याय !

These days its really crazy, there are hundreds and thousands of options for everything , even if you just want to buy a simple cellphone cover , you will at least find ten thousand different options! These is not just aboiut shopping..Its applicable to everything..

अगदी जन्मल्यापासून आपल्याकडे हजारो पर्याय असतात , कळत - नकळत आपण समोर आलेल्या पर्यायांमधून "योग्य" असा पर्याय निवडायला शिकतो… मला योग्य वाटणारा पर्याय "योग्य " या व्याख्येप्रमाणे असायलाच हवा अस काही नाही … असो तो एक वेगळा मुद्दा आहे…

तर , खरच खूप पर्याय असले तर सर्वात आधी कोण-कोणते पर्याय आहेत त्याचा विचार मग कोणता निवडायचा आणि कोणता नाही निवडायचा याचा विचार , मग जो निवडायचा नाहीये तो नक्की चांगला नाही ना यावर शिक्कामोर्तब आणि मग कुठे आपल्या "योग्य" निवडलेल्या पर्यायाच्या योग्यतेवर विचार…इथे संपत नाही हि साखळी , यानंतर आपण निवडलेल्या पर्यायाच उत्तर दायित्व सुद्धा आपल्यावरच येत ! कारण अनेक गोष्टींमधून आपण हि गोष्ट / हि वाट निवडलेली असते… त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही अस म्हणून नशिबाच्या/परिस्थितीच्या माथ्यावर पण मारता येत नाही !!

बापरे , वेड लागायची वेळ येईल अशाने !!

वाचायला जरी जड आणि मोठ्ठी असेल तरी मनात आपण हे सगळे विचार कैक क्षणांमध्ये करून टाकतो !


Seriously , having too many options isn't the best option.. It looks very very helpful but it is not! Having more options just confuses me and then I have to think through all the "GOOD" options.. I know so many people who just procrastinate the decision waiting on availability of more choices...

माझ सरळ असोप्पा मत आहे , जे काही वाटत ते करून टाकाव ! (मत असण आणि तस वागणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत !!  :) :) )






Sunday, August 11, 2013

काही रोजच्या प्रश्नांची पुणेरी उत्तरे ! खरच पुणेरी बाण्याला तोड नाही … सर्वात महत्वाच, इथे मी कोणाही व्यक्ती किंवा प्रसंगाबद्दल लिहित नाहीये !! आणि काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा !!
 सर्वात महत्वाच , हे प्रश्न मला विचारलेले गेलेले नाहीत !! मी जे आसपास बघतीये त्यातून हे प्रश्न दिसले आणि केवळ गम्मत म्हणून त्यांची पुणेरी उत्तर लिहित आहे.
हे काही रोजचे प्रश्न आणि त्यांची पुणेरी उत्तर!

१. There are "quality" issues here
"एकदा विकलेला माल बदलून मिळणार नाही "

 2. No one replied to my email
"email फुकट आहे म्हणून कितीही पाठवू नयेत, आम्ही इथे रिकामे बसलेले नसतो. फालतू emails ना उत्तर देण्याचे वेगळे पैसे लागतील "

3. You have attitude problems
" स्वाभिमान !! बाप जन्मात मराठी माणूस झुकला नाही आणि झुकणार सुद्धा नाही "

4. This was messed up
"इतका त्रास होत असल्यास स्वतः काम करावे "

5. I need a conference call everyday
"इथे फोन वर बोलण्या व्यतिरिक्त इतर कामे देखील होतात. त्यामुळे सारखा सारखा फोन करून वेळ वाया  घालवू नये "

6. You need to spend more here
"आमचे आडनाव पेशवे नाही किंवा पेशव्यांनी आमच्यासाठी खजिना पुरून ठेवला नाही. त्यामुळे पेशवाई सारखे खर्च चालवून घेतले जाणार नाहीत "