Sunday, June 22, 2014

मनोगत - आजच्या कर्णाचं

आज खूप दिवसांनी महाभारतातल्या एका  पात्राची आठवण आली … कर्ण …

आणि लक्षात आल कि खरच महाभारत हि एका कोणत्या युगात घडलेली गोष्ट नाही , हा आपला इतिहास नाही ! हि पुन्हा पुन्हा प्रत्येकाच्या मनात घडणारी गोष्ट आहे … कधी आपण अतिशय एकाग्र असणारे  अर्जुन असतो , कधी समोरच्याला संजून घेणारे -संयमी असे  धर्म , कधी आपल्याच शब्दात प्रतिज्ञेत  अडकलेले भीष्म तर कधी कृष्ण !

आज माझ्या मनात कर्ण आहे … शस्त्रस्पर्धेच्या वेळेचा

***

आज मी या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करून आलो आहे … माझी वर्षांची मेहनत , तपस्या सगळ काही सोबत घेऊन , आज मला या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करायच आहे … जेव्हा माझ्या आसपासची लोकं इतरत्र वेळ  वाया घालवत होती , मी मात्र सराव केला … माझ मन माझ्या ध्येयापासून हलु दिलं नाही … फक्त आणि फक्त माझ ध्येय माझ्यासाठी महत्वाच होत ! आणि अजूनही आहे … पण आज फक्त आणि फक्त मी सूतपुत्र आहे म्हणून माझा अपमान होतो ? माझी गुणवत्ता न तपासता ? जर मी कशात कमी पडत असेन आणि म्हणून माझा अपमान झाला किंवा जर माझी योग्यता नाही म्हणून मी नाकारला गेलो तर मला वाईट वाटणार नाही … उलट आनंदच होईल कि एका पराक्रमी विराकडून माझा पराजय झाला , पण फक्त माझं कुळ / जात अशा गोष्टींवरून मला नाकारल जावं ?

एखाद्या माणसाचा स्वभाव , त्याची गुणवत्ता फक्त त्याच्या जात / कुळ /रंग अशा गोष्टींवरून ठरवली जाणार असेल तर काय अर्थ आहे ? मला स्वतःच म्हणणं मांडायची संधी तर द्या… मी नक्की कोण आहे कसा आहे हे तर समजून घ्या … तुमच्या राजघराण्यातल्या लोकांपेक्षा देखील उत्तम धनुर्विद्या मी प्राप्त केलेली आहे ….

पण केवळ राधेय असल्यामुळे आज … पण आज जे काही मी आहे ते केवळ त्या राधेमुळेच … सूतपुत्र असण्याची मला अजिबात लाज नाही फक्त आणि फक्त अभिमान आहे ….

***

Sunday, June 15, 2014

Random - अगदीच random

आज सुर्य आहे तळपणारा पण त्याची उष्णता जाणवत नाहीये 
मन बेभान होऊन नाचतंय त्याला दम लागत नाहीये !

जोरदार वारा सुटलाय वादळ सुद्धा येईल कदाचित 
पण या बेधुंद मनामुळे तेही जाणवत नाहीये !

किती गर्दी आहे आजूबाजूला , किती वेळ वाया जातोय 
उडणार्या मनाला मात्र एक वेगळच आकाश दिसतंय !

तळपणारा सुर्य , सुटलेला वारा , आजूबाजूची माणस
कशाचा कशाचा परिणाम होईना 
अर्रे मना मला तुझ वागणं काही केल्या समजेना !

कितीही अडथळे येउदेत समोर , मन काही थकेना 
उंच उंच उडण्याची हि मनाची उमेद काही केल्या तुटेना !

सुंदर स्वप्न बघण्यासाठी आता झोपायची गरज नाही 
उघड्या डोळ्यांना दिसणारं जग त्याहीपेक्षा सुंदर आहे !


Sunday, June 8, 2014

The unknown unknowns!

Recently we had a heated discussion in the office..Unfortunately our side kind of won the argument. :(
Now you will say why am I sad for that? Because later my mentor told me that you are playing with unknown unknowns.. Be very very careful!

WoW!

Unknown-unknowns! (It was almost a mentos moment for me! - दिमाग की बत्ती जल गयी  ! )

Hmm now I am thinking... Unknown unknowns , what a weird concept.. Although it sounds weird , its a very wonderful concept.

Originally this phrase comes from  United States Secretary of Defense Donald Rumsfeld.. He had once said,

"that something hasn't happened are always interesting to me, because as we know, there are known knowns; there are things that we know that we know. We also know there are known unknowns; that is to say we know there are some things we do not know. But there are also unknown unknowns, the ones we don't know we don't know."

Isn't it worth giving a thought..It just changed a lot of things for me..We know that we are unaware of some things and we assume that we know what we are unaware of!

खरच जर आपण हे मान्य केल कि खरच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित सुद्धा नाही कि माहित नाहीयेत तर लोकांकडे , परिस्थितीकडे बघायला किती सोप जाइल ना? उगीचच आपल्या परीने लोकांच्या वागण्याचे बोलण्याचे अर्थ लावण बंद होईल !

Anyways enough philosophy ! But truly it is something to think about..Something to ponder upon and surely something to keep in mind every single day!


Sunday, June 1, 2014

श्वास !

खर तर आज वरच्या आयुष्यात सगळ्यात गृहीत धरलेली गोष्ट म्हणजे श्वास ! आपण श्वास घेतच असतो जन्मल्यापासून , त्यात होण्या न होण्यासारखं काय आहे ? एका सेकंदाला कित्येक वेळा श्वास घेत असतो आपण … त्यात काय एवढ ? आपण त्या श्वासाला महत्व सुद्धा देत नाही . असाच या आठवड्यात विचार आला आणि लक्षात आलं कि किती गृहीत धरतो या श्वासाला आपण …


---

जगण्याची सुरुवात करताना घेतलेला तो पहिला श्वास…
आणि तो ऐकून बाकीच्यांनी घेतलेला सुटकेचा श्वास…

अतिशय सुंदर कलाकृती बघताना रोखलेला श्वास…
सर्कशीतल "थ्रिल" बघताना खिळलेला श्वास …

पहिल्यांदा प्रेमाची जाणीव झाल्यावर चुकलेला श्वास…
विरहात सुद्धा मोजलेला प्रत्येक अन प्रत्येक श्वास …

भयानक संकटाला तोंड देताना हरवलेला श्वास …
आणि त्यातून बाहेर आल्यावर सुटकेचा श्वास …

खोल समुद्रात घट्ट धरून ठेवलेला श्वास …
वर आल्यावर घेतलेला मोकळा श्वास …

पिंजर्यात अडकलेला तो घुसमटलेला श्वास..
आणि स्वतंत्र झाल्यावर घेतलेला हि मोकळ श्वास …

आयुष्य संपताना घेतलेला तो शेवटचा श्वास …
आणि तो ऐकताना खिळलेला बाकीच्यांचा श्वास…

----

अगदी " झीन्दगि न मिलेगी दोबारा " मध्ये सांगितल्यासारख , " बस सास लेते रहो !"
खरच अवघड प्रसंगी श्वास घेत राहिलं कि मार्ग हळूहळू सापडत जातील

---