Sunday, June 1, 2014

श्वास !

खर तर आज वरच्या आयुष्यात सगळ्यात गृहीत धरलेली गोष्ट म्हणजे श्वास ! आपण श्वास घेतच असतो जन्मल्यापासून , त्यात होण्या न होण्यासारखं काय आहे ? एका सेकंदाला कित्येक वेळा श्वास घेत असतो आपण … त्यात काय एवढ ? आपण त्या श्वासाला महत्व सुद्धा देत नाही . असाच या आठवड्यात विचार आला आणि लक्षात आलं कि किती गृहीत धरतो या श्वासाला आपण …


---

जगण्याची सुरुवात करताना घेतलेला तो पहिला श्वास…
आणि तो ऐकून बाकीच्यांनी घेतलेला सुटकेचा श्वास…

अतिशय सुंदर कलाकृती बघताना रोखलेला श्वास…
सर्कशीतल "थ्रिल" बघताना खिळलेला श्वास …

पहिल्यांदा प्रेमाची जाणीव झाल्यावर चुकलेला श्वास…
विरहात सुद्धा मोजलेला प्रत्येक अन प्रत्येक श्वास …

भयानक संकटाला तोंड देताना हरवलेला श्वास …
आणि त्यातून बाहेर आल्यावर सुटकेचा श्वास …

खोल समुद्रात घट्ट धरून ठेवलेला श्वास …
वर आल्यावर घेतलेला मोकळा श्वास …

पिंजर्यात अडकलेला तो घुसमटलेला श्वास..
आणि स्वतंत्र झाल्यावर घेतलेला हि मोकळ श्वास …

आयुष्य संपताना घेतलेला तो शेवटचा श्वास …
आणि तो ऐकताना खिळलेला बाकीच्यांचा श्वास…

----

अगदी " झीन्दगि न मिलेगी दोबारा " मध्ये सांगितल्यासारख , " बस सास लेते रहो !"
खरच अवघड प्रसंगी श्वास घेत राहिलं कि मार्ग हळूहळू सापडत जातील

---




No comments:

Post a Comment