Sunday, June 4, 2017

The frog and the nightingale!

I remember this poem from High School. I always loved it.. The poem is about a frog teaching nightingale to sing! The frog claims that he can sing better and keeps telling the nightingale that she doesn't know how to sing.. She gives into it and after trying extremely hard to learn from frog ....one day she .... a sad ending..

----

नाही येत ग तुला गाता .... कदाचित तू शिकलीच नाहीस कधी ..... बेडकासारखा आवाज असावा लागतो ! मी शिकवतो तुला.. शिकवीन तुला गायचं कस... अतिशय गर्वाने बेडूक बोलत होता..  आणि त्याने आवाज काढला डररराववव .....

कोकिळा ऐकत होती बेडकाचं हे बोलणं .... ज्या पद्धतीने , ज्या आत्मविश्वासानं बेडूक बोलत होता , कोकिळेला धन्य धन्य वाटलं ... अर्रे वा असे गुरु मिळाले आपल्याला ...


आणि मग सुरु झाली तिची वाटचाल , कदाचित अंताकडे ... पण तिला माहित नव्हतं अजून .... बेडूक अतिशय गर्विष्ठपणे .... अतिशय गुर्मीत तिला कमी दाखवत तिला गाणं शिकवत होता .... ती जीव तोडून मेहनत करत होती ....

कालांतराने ती क्षीण होत गेली , कितीही प्रयत्न केले तरीही बेडकासारखा आवाज काही येईना .... प्रचंड मेहनत आणि कमीपणाची जाणीव ... हे सगळं सुरूच होतं ....

एक दिवस खूप पाऊस पडला , जंगलातलं तळ अगदी भरून गेलं होतं .... सगळे प्राणी पक्षी तळ्याच्या आसपास दिसत होते..
कोकिळेने तळ्यावरून उडताना , स्वतःच प्रतिबिंब पाण्यात पहिलं ... कशी होते मी आणि कशी झालीये !

तिच्या मनात विचार आला.. आणि त्या क्षणी , त्या एका क्षणात तिने ठरवले कि आता बेडकाच्या तालावर नाचणे बंद! मी माझा आवाज , कसाही असो तो.. मी माझ्या आवाजात गाईन ..

ती पुन्हा त्यांच्या नेहमीच्या जागेवर गेली , बेडूक कडाडला , "हि काही वेळ झाली यायायची ?" त्यावर कोकिळा म्हणाली , "धन्यवाद , आयुष्यातला सर्वात महत्वाचा धडा शिकवण्यासाठी ! "....एवढे बोलून ती उडून गेली ...  बेडकाला काही कळेना.... ती उडून गेली आणि स्वतःच आयुष्य मजेत घालवायला लागली .....

------

I had always wanted a happy ending to that beautiful poem we learnt it school and hence the blog!