Sunday, January 20, 2013

काही गोष्टी हातातल्या...



अगदी मनापासून बरच काही लिहावास वाटतंय..

आत्ताच एक पुस्तक वाचलं... वपुंच..नाव सुद्धा अगदी सुरेख आहे.."गोष्ट हातातली होती "
छोट्या छोट्या गोष्टींचं हे पुस्तक , पुस्तक नाही तर हा अगदी एक आरसा आहे..
एक वेगळ्या प्रकारचा , पट आहे नव्या जुन्या आठवणींचा ,
आपल्या आयुष्यात असतील - नसतील त्या लोकांचा मेळावा आहे ,
आणि सर्वात महत्वाच , प्रतिबिंब आहे आपल्या मनाच, विचारांच..

पुस्तकाच्या प्रत्येक पानासोबत आठवणी उलगड जातात, नाती समजत  जातात..
स्वतःला पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात..लोक समजत जातात..

पुस्तकात यातली कोणतीही उत्तरं नाहीत आणि प्रश्न तर अजिबात नाहीत..
हे दोन्ही कुठेतरी खोल दडलेले असतात प्रत्येकाच्या मनात..माझ्याही मनात..
आणि मग अस काही वाचनात आल कि तेच प्रश्न पुन्हा पडतात..मग असा वाटत कि
पुन्हा पुन्हा तेच प्रश्न पडणं म्हणजे तिथेच अडकणं नाही का ? पण मला वाटतंय पुन्हा पुन्हा
तेच प्रश्न पडणं आणि त्याची वेगळी उत्तरं मिळत जाणं म्हणजेच प्रवास..

आज असंच बरंच काही लिहावंसं वाटतंय..पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या प्रश्नचिन्हांना पूर्णविराम
मिळाला तर काय? (हा हि एक प्रश्नच नाही का !!) कुणाला वाटेल काय विक्षिप्त मुलगी आहे ,
कसले प्रश्न , कुठली उत्तरं..

विचार हे फक्त विचार असतात , त्यांना चिह्न मन देतं, कधी प्रश्नचिन्ह , कधी उद्गारवाचक,
कधी स्वल्पविराम आणि कधी सगळं सगळं संपवायला पूर्णविराम.. खरं बघायला गेलं तर
पूर्णविराम सुरुवात असते नवीन वाक्याची!! सगळं काही संपवणारा
पूर्णविराम नवीन सुरुवातीचा संकेत असतो.


असो..या सगळ्याचा पुस्तकाशी काहीही संबंध नाही, हा फक्त एक नमुना आहे कि पुस्तक वाचताना
कित्येक हातातच राहिलेल्या गोष्टी, नकळत हातातून निसटलेल्या गोष्टी , आणि मुद्दामून हातातातून सोडलेल्या गोष्टी
आठवत जातात आणि पुस्तकातल्या गोष्टींसोबत एक स्वतःची अशी गोष्ट नकळत तयार होत जाते/आठवत जाते