Sunday, October 13, 2013

On Making Choices - 2

     Sometime back I had written about making choices and the availability of multiple options..Not sure how useful is having/not having multiple choices is.. We had a nice discussion in the office the other day, one of my colleagues had a very interesting point of view. It was not about having multiple choices , it was about having a choice of saying "NO"!

     She said, "If you have an option of saying "NO" , you will try to find the ways/reasons of not doing it but if you do not have that option, you will make it happen! "..I kept thinking about it later in the day and in the week. Was trying to debate from both sides, I guess.. Yes there have been some situations where I had an option of saying no, and may be that's the reason I did not say "YES"..Or there have been situations where I didn't have an option of saying "NO" and although it was tough, I could pull it through.. Also there have been situations where inspite of having the option of saying "NO" , we made it happen!


WoW , too many thoughts in my mind.. It really is a very simple yet powerful thought..It's all about how you tackle every situation.

Sunday, October 6, 2013

Gravity

गुरुत्वाकर्षण - Gravity - एक अशी शक्ती जी आपण गृहीत धरतो..पण जर खरच हि शक्ती नसेल तर …. अगदी सोप्या शब्दात -  आपल अस्तित्वच नसेल !!

आता सगळ्या जगातल्या गोष्टी सोडून मी गुरुत्वाकर्षणाच्या का मागे लागले असेन ? Just watched that Sandra Bullock - George Clooney movie "Gravity".. The movie is alright , lets not talk about that.. What struck me was the thought of not having the gravitational force.. Just imagine, what of there is no force of Gravity..It is derived from an old Latin word gravitas which means weight/seriousness..The name is truly appropriate as we need to understand the seriousness of existence of gravitational force..


किती गृहीत धरलय आपण गुरुत्वाकर्षणाला !! बाप रे - तो पिक्चर बघून लक्षात आल , जर नसेलच हि शक्ती तर काय जाम वाट लागेल … नासा मध्ये ह्या सगळ्याची माहिती घेताना मस्त वाटत पण खरच जिती अवघड असेल हे सगळ … सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर ठीक आहे नाहीतर …

असो , मला इथे कोणताही मुद्दा मांडायचा नाहीये , किंवा चित्रपट चांगला / वाईट असाहो म्हणायचा नाहीये ! सहज आपल , गुरुत्वाकार्षाणाला  धन्यवाद !! :) :) :)



Sunday, September 22, 2013

Being Princess!

Once upon a time, there lived a .......Lets chuck the "Once upon time"..I talking about the present..Now!

I read an interesting article about Bentley's challenge.. Bentley being a respectable brand , sure had n number of challenges before they could establish themselves as a successful brand.. I am not talking about their challenges during manufacturing processes , their quality measures, safety measures..I dont think I am the right person for that.. I am referring to an interesting challenge Bentley had..The challenge to paint a customized car with the exact same shade of royal nail polish!!

Yes Nail polish! Bentley had a challenge to paint a car with a shade that matched the princess's nail polish.. WoW! When I read this article for the first time, I was awestruck! Stunned may be..Then I started thinking about the princess..

I am sure being Princess is much more than wearing those beautiful dresses, expensive jewelry and the prestigious tiara..I think we are so used to think of princesses with all these attributes attached to them.. Sometimes I wonder, their life might not be as glittery as it seems.. Being princess means losing your freedom to roam around. Thousands of eyes are set on you, on your every move...Every word you say is going to be a "breaking news"..Every dress you wear is going to be highly criticized or it might be a trend setter..
Even the blink of your eye is noticed!

With the extravagant life style, there are many responsibilities. She has to be a role model..She needs to take every step with utmost care and thinking it through. A true princess might not be able to follow her heart's calling..Might not be able to enjoy the sunset on the beach in shorts..Might not be able to roam on the streets at midnight..

That reminds me of the anne hathway movie  "The Princess Diaries"..I totally adored that movie while growing up and still love to watch it..This one has always been my favorite.Let me leave you with some lines from one of the soundtracks from the movie.


Seems like a dream
But there's one thing missing
Nobody's here with me
(Here with me)
To share in all that
I've been given
I need someone
That's strong enough for me


Sunday, August 25, 2013

On Making choices!

Was watching the latest episode of suits yesterday.
Jessica says, "Sometimes you have to put your family in such a situation where there wont be other choices.It will be the only choice"..It is so true sometimes.

अगदी खर सांगायच तर बरेच पर्याय असल्यावर निर्णय घेण फार फार अवघड होऊन जातं ! मग वाटत , कि नकोच इतके पर्याय !

These days its really crazy, there are hundreds and thousands of options for everything , even if you just want to buy a simple cellphone cover , you will at least find ten thousand different options! These is not just aboiut shopping..Its applicable to everything..

अगदी जन्मल्यापासून आपल्याकडे हजारो पर्याय असतात , कळत - नकळत आपण समोर आलेल्या पर्यायांमधून "योग्य" असा पर्याय निवडायला शिकतो… मला योग्य वाटणारा पर्याय "योग्य " या व्याख्येप्रमाणे असायलाच हवा अस काही नाही … असो तो एक वेगळा मुद्दा आहे…

तर , खरच खूप पर्याय असले तर सर्वात आधी कोण-कोणते पर्याय आहेत त्याचा विचार मग कोणता निवडायचा आणि कोणता नाही निवडायचा याचा विचार , मग जो निवडायचा नाहीये तो नक्की चांगला नाही ना यावर शिक्कामोर्तब आणि मग कुठे आपल्या "योग्य" निवडलेल्या पर्यायाच्या योग्यतेवर विचार…इथे संपत नाही हि साखळी , यानंतर आपण निवडलेल्या पर्यायाच उत्तर दायित्व सुद्धा आपल्यावरच येत ! कारण अनेक गोष्टींमधून आपण हि गोष्ट / हि वाट निवडलेली असते… त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही अस म्हणून नशिबाच्या/परिस्थितीच्या माथ्यावर पण मारता येत नाही !!

बापरे , वेड लागायची वेळ येईल अशाने !!

वाचायला जरी जड आणि मोठ्ठी असेल तरी मनात आपण हे सगळे विचार कैक क्षणांमध्ये करून टाकतो !


Seriously , having too many options isn't the best option.. It looks very very helpful but it is not! Having more options just confuses me and then I have to think through all the "GOOD" options.. I know so many people who just procrastinate the decision waiting on availability of more choices...

माझ सरळ असोप्पा मत आहे , जे काही वाटत ते करून टाकाव ! (मत असण आणि तस वागणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत !!  :) :) )






Sunday, August 11, 2013

काही रोजच्या प्रश्नांची पुणेरी उत्तरे ! खरच पुणेरी बाण्याला तोड नाही … सर्वात महत्वाच, इथे मी कोणाही व्यक्ती किंवा प्रसंगाबद्दल लिहित नाहीये !! आणि काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा !!
 सर्वात महत्वाच , हे प्रश्न मला विचारलेले गेलेले नाहीत !! मी जे आसपास बघतीये त्यातून हे प्रश्न दिसले आणि केवळ गम्मत म्हणून त्यांची पुणेरी उत्तर लिहित आहे.
हे काही रोजचे प्रश्न आणि त्यांची पुणेरी उत्तर!

१. There are "quality" issues here
"एकदा विकलेला माल बदलून मिळणार नाही "

 2. No one replied to my email
"email फुकट आहे म्हणून कितीही पाठवू नयेत, आम्ही इथे रिकामे बसलेले नसतो. फालतू emails ना उत्तर देण्याचे वेगळे पैसे लागतील "

3. You have attitude problems
" स्वाभिमान !! बाप जन्मात मराठी माणूस झुकला नाही आणि झुकणार सुद्धा नाही "

4. This was messed up
"इतका त्रास होत असल्यास स्वतः काम करावे "

5. I need a conference call everyday
"इथे फोन वर बोलण्या व्यतिरिक्त इतर कामे देखील होतात. त्यामुळे सारखा सारखा फोन करून वेळ वाया  घालवू नये "

6. You need to spend more here
"आमचे आडनाव पेशवे नाही किंवा पेशव्यांनी आमच्यासाठी खजिना पुरून ठेवला नाही. त्यामुळे पेशवाई सारखे खर्च चालवून घेतले जाणार नाहीत "

Sunday, July 7, 2013

Wimbledon Wimbledon!!


What a match!! what a match, especially the last game , fantastic..I think the last game was more difficult for Murray than the entire match..Djo was very very tough!! Numerous drops, superb concentration , truly unbelievable !! I am stunned , speechless and almost crazy!

I was prepared for the match , मस्त चहा - खारी , laid back Sunday morning!!

I wont write about Murray/audience support/atmosphere etc etc as its "THE Wimbledon Final" , all this is expected !!

I think the first two sets were not very difficult for Murray, जोको आज एवढा का धडपडत होता देव जाणे...
Andy Murray despite of the pressure of 77 years was mesmerizing!! He was focused, confident and swift..

The last game was the epitome of excellence! Murray earned the victory as djo made it very very difficult! The first championship point of the day was in the third set 0-40, Djo pulled it from 0-40 to multiple deuces..I just had a feeling of cricket, the game was turning like a cricket match and I was a little worried as you never know anything can happen in last over..You never know, Yuvi can score 37 runs in the last over! Felt for a moment that dJo is coming back with a BANG!!

One thing is clear from todays match , the finish line is always the toughest !! The last couple of meters are always the most difficult ones!! Its darkest before dawn etc etc!




Sunday, June 9, 2013

सेनापती

युद्धापूर्वी

युद्ध करण्याची खरच गरज आहे का ते तपासून पाहणारा तो सेनापती…
युद्ध अटळ असल्यास सैन्याचं नियोजन करणारा तो सेनापती….
सैन्याकडून कसून तयारी करून घेणारा तो सेनापती….
प्रत्येक सैनिकाकडे जातीनं लक्ष देणारा तो सेनापती….


युद्धभूमीवर

शंखनाद करून त्या युद्धाचा आरंभ करणारा तो सेनापती….
स्वतःच्या सैन्याची योग्य रचना करणारा तो सेनापती….
शत्रुपक्षाच्या डावपेचांपासून सैन्याचं रक्षण करणारा तो सेनापती ….
प्रत्येकाचं मनोधैर्य वाढवणारा तो सेनापती….
सैन्याला एकवटून ठेवणारा तो सेनापती…
सगळ्यात पहिला वर अंगावर झेलणारा तोच सेनापती….

युद्धानंतर

स्वतःचे वर विसरून जखमींना मलमपट्टी करणारा
प्रत्येकाची विचारपूस करणारा तो सेनापती…
युद्धाच्या थकव्यानंतरही उत्साही असणारा तो सेनापती…
आणि दूरवर उभं राहून सैन्याकडे कौतुकाने पाहणारा तो सेनापती…


कविता नाहीये हि… हे एका सेनापतींचे शब्द एका सेनापतींसाठी…. 

Sunday, June 2, 2013

The ultimate answer!!

Many of us have a tendency to look for the ultimate answer, the answer to the current situation, successes/failures etc etc...What we fail to realize is there is NO ULTIMATE question!!

जर एक प्रश्न नसेल तर एक उत्तर कस मिळणार ? Especially during tough times, we look for ONE ULTIMATE solution , but is it ONE SINGLE problem? हे म्हणजे संपूर्ण शब्दकोड्याचं उत्तर एका शब्दामध्ये शोधण्यासारख आहे!! शब्दकोड्यासारखे उभे आडवे शब्द एक एक करत भरावे लागतात…
एका शब्दाने पूर्ण कोड नाही सुटत ना ( म्हणजे तो शेवटचा शब्द नसेल तर )

तसंच एका उत्तराने प्रश्न सुटत नाहीत!!



Sunday, May 26, 2013

प्रवास वर्णन !

खूप दिवसांनी मस्त "प्रवास वर्णन" आहे माझ्याकडे लिहिण्यासाठी … तस प्रत्येक प्रवासात काहीना काहीतरी होतच असतं माझ्यासोबत !! पण दर वेळी लिहिल जात नाही… हा माझ्या ४ राज्यांच्या (states) धावत्या दौऱ्यातला काही भाग … मी काढलेली सगळी तिकिटे मी या दौर्यामध्ये रद्द केली…मला वाटतंय आता मी "airline charity" वगैरे काहीतरी सुरु कराव… प्रत्येक वेळी काही न काही कारणांमुळे मला नवीन तिकीट घ्यावच लागत !! असो त्याबद्दल नंतर कधीतरी …

स्थळ : फिनिक्स च विमानतळ
वेळ : सकाळी ६

आदल्या रात्री रागिणी सोबत गप्पा मारत बसल्यामुळे मला उठायला आणि निघायला थोडा उशीर झाला… तिचं graduation होत , म्हणून मी अरिझोना ला गेले होते… तो एक अजून मजेशीर किस्सा आहे…
तर सकाळी मी गाडी परत केली आणि पळत पळत security च्या इथे पोचले… काढ इकध ईत्क उच्छाद येतो या सगळ्या security प्रकरणाचा , काय सांगू … मग नेहमी प्रमाणे jacket , liquids, laptop , shoes अशा सर्व गोष्टी मांडून ठेवल्या आणि त्या security च्या गेट मधून आत आले… आता काढलेल्या गोष्टी पुन्हा घालाव्या /ठेवाव्या पण लागतात ना !! त्यात अजून वेळ गेला…

मग गेट जवळ आले आणि लक्षात आलं कि आपल्याकडे अजून १० मिनिटे वेळ आहे… भुकेची जाणीव आधीच झाली होती पण वेळ आहे म्हणाल्यावर ती तीव्र झाली !! मग आसपास बघितल तर cinnabon दिसल… म्हणल चला , आता चं कॉफी आणि सिनमन रोल खाऊया ! तिथे गेले आणि त्यांना सांगितल , " एक कॉफी  आणि एक सिनमन रोल "… काय हळू होता तो माणूस, मला वाटल , कि आता हा शेतात जाणार कॉफी बिन्स आणणार मग त्यापासून कॉफी बनवणार , मग कॉफी च्या मशीनचा शोध लावणार , मग कॉफी बृ करून        मला देणार !! असाच विचार मी सिनमन रोल बद्दल पण केला, आणि गमतीचा भाग असा, कि मी हा सगळा विचार करेपर्यंत त्या माणसाने या दोन्ही पैकी काहीच मला दिल नव्हतं !! मग मी जर वैतागूनच त्याला म्हणाले , कि माझी फ्लाईट आहे, तुम्ही कृपया जरा लवकर द्याल का ? मी असं म्हनाल्यावर त्याला एवढा राग आला कि त्याने जवळ जवळ कॉफी आपटली !! जाऊदे आत्ता या माणसाच्या नदी लागण्यात काय अर्थ आहे ? आपण भलं , आपली कॉफी भली आणि आपली फ्लाईट सुद्धा !

मग गेट मधून आत जाताना विचार आला, एकदा गौरीला सांगावं मी निघत आहे म्हणून … फोन काढायला पर्स मध्ये हात घातला तर फोन काही मिळेना ! असाही माझ्या पर्स मध्ये गोष्टी पटकन मिळत नाही , पण मिळतात नक्की… पण फोन का मिळेना म्हणून मी अस्वस्थ ! मग जाऊन सीट वर बसले आणि पुन्हा फोन शोधणं सुरु…फोन काही मिळेना , मग मला वाटल कि मी त्या मंद सिनबन च्या इथे फोन विसरले कि काय ?
मग मी पळत पळत गेले , तर गेटच्या इथला माणूस मला सांगतो कि आता बाहेर नाही जाऊ शकत , मी त्याला म्हणाले, जाऊ शकत नाही म्हणजे काय , मला फोन हवाय … आलेच मी

आता परत त्या सिनमन च्या माणसाकडे जाव लागणार , असो । अडला हरी गाढवाचे पाय धरी !!
मग मी त्याला विचारल , "माझा फोन इथे राहिला का?"… तर हा माणूस मला सांगतो , "तुला इतकी घाई होती कि फोन विसरायला सुद्धा वेळ नव्हता !! एक तर माझा फोन सापडत नाहीये , त्यातून या माणसाचे टोमणे ऐका… या जगात खरच किती विचित्र माणस असतात ना…

आता याच्याकडे नाही म्हणजे मी security च्या इथे फोन विसरले असणार , मग मी धावत धावत तिथे गेले, आणि विचारल्यावर तिथल्या माणसाने helpdesk कडे हात दाखवला… मी तिथे गेले आणि तो helpdesk वरचा
मनुष्य काही बोलायच्या आत बोलायला सुरुवात केली…मी श्वास सुद्धा न घेता किमान १० - १ २ वाक्य सलग बोलले… म्हणजे त्याच्या मनात तो फोन माझा आहे कि नाही अशी शंकाच नको यायला ! एवढा बोलल्यावर त्यानेच मला थांबवलं आणि म्हणाला हा घे तुझा फोन !! मी आपलं धन्यवाद म्हणून पुन्हा पळत सुटले ….

आतापर्यंत boarding पूर्ण झाल होत… रस्त्यात पुन्हा सिनाबन लागलच , मग मी हि इथल्या त्या विचित्र माणसाला फोन दाखवत म्हणाले, मिळाला बरं का मला माझा फोन !! इतका मस्त वाटलं त्याला असं म्हणाल्यावर !! विक्षिप्तच होता तो …

मग आता तो गेटवर चा माणूस मला काही म्हणायच्या आत मी संपूर्ण वेगाने धावत त्या metal tunnel मध्ये शिरले… आणि पळत पळत कशी बशी विमानात पोचले , मला अस धावत येताना पाहून आणि एवढ्या धापा टाकताना पाहून , त्या airhostess ने प्रेमाने विचारल , पाणी देऊ का ? , एवढ्या गडबडीत पण मला तिला म्हणावसं वाटल , "हो चालेल ना ,  लिंबू टाकून!! " … या विचाराने माझं मलाच हसू आलं … नशिबाने मी तिला पाणी नको अस खुणेनेच सांगितल, आणि धन्यवाद म्हणून जागेवर जाऊन बसले …


आता मस्त कॉफी आणि सिनमन रोल खात , खिडकीतून खाली बघताना मला तो गेटवरचा माणूस , सिनबन चा माणूस , security च्या इथला माणूस दिसत होता !! मी आजच किस्सा , गेले  ४८ तास आणि त्यातला अभूतपूर्व गोंधळ आठवत असतानाच , मला air hostess ने विचारल , "Would you like to drink anything ?"
आणि मी हसत हसत उत्तर दिल , "Water please , with some lemon in it!! "  तिला काही कळलच नाही… मग मी म्हणाले, "Thank you , I am good"

------------------------------------------------------------------------------------------------------




Sunday, May 19, 2013

Carmayoga , Causation and Correlation!!

Yes Karmayoga with a "C"..Its "Carmayoga"!! Just to make the theory little more interesting!! So here is the theory..Not so intelligent people like me confuse all these three phenomena and most importantly try to apply the same "confused" logic to all the situations we face in life..Well "taaa daaa!!! It doesn't work that way!! (I am still trying to apply more than one to justify my situations)

I hope, I have succeeded in building up your curiosity.So lets start with the definitions.

'C'armayoga :

नेकी कर पुत्तर!! नेकी पा !! Unfortunately this is the most commonly confused translation.. :(
life is a little different than this..( अरे वा !! आयुष्यावर philosophy झाडायला कसल भारी  वाटत !)  कृष्णाने सांगितल्याप्रमाणे "कर्म करो , फळ कि अपेक्षा न करो ! निष्काम कर्म करो  पार्थ " किंवा "कर्म करना तुम्हारी कार्य सीमा के अंदर है , फळ मिलना वा ना मिलना तुम्हारी कक्षा के बाहर है । " मी जर सुरु झाले तर BR Chopra च्या महाभारतातला  ७२  आणि ७३ वेसंपूर्ण भाग लिहून काढेन :) :) विषयांतर नको.. उदाहरणार्थ कष्ट करणं आपल्या हातात आहे , त्याच फळ मिळणं , न मिळणं आपल्या पलीकडे आहे …

Correlation : 

" a relation existing between phenomena or things or between mathematical or statistical variables which tend to vary, be associated, or occur together in a way not expected on the  basis of chance alone"- says merriam-webster.com. So the gist is two or multiple actions  and/or outcomes can be correlated. Foe example : The quantity and quality of masalas and salt is directly related to the taste of the curry ..

Causation :

This is a simple theory of cause and effect. It is a direct relationship between cause and effect.For example (the classic one ! ) If you study well , your results will be good. There are  some flaws in this example , पण ढोबळ मानाने सत्य आहे…

तर…आपल्यासारखी सामान्य लोक सगळीकडे एकच logic लावत बसतात।अनि सगळ्यात वाईट…. मी काय वाईट केलाय म्हणून माझ्यासोबत वाईट होतंय ? किंवा काही न चांगला करता कसा काय चांगला होऊ शकत ??  I believe whatever you give to life , life gives back! Its the boomerang effect and I still honestly believe in that..


Sohan Kale taught me to apply these three theories to the right situation..प्रत्येक प्रसंगाचं विश्लेषण करताना वेगळ्या प्रकारे विचार करायला हवा… वेगळे प्रसंग , वेगळी कारण आणि वेगळे विचार…. प्रत्येक वेळी जस परिस्थितीला दोष देण चुकीच आहे तसंच स्वतःलाही !! जर सगळ्या प्रसंगांच outcome आपल्या हातात असतं तर  त्या कर्त्या करवित्या ची गरज उरलीच नसती…

There is always a balance between Being and Doing..And sometimes you are the cause , sometimes you are the effect, Sometimes actions and reactions are correlated but this is not the rule of thumb!!

Sunday, May 5, 2013

The Blind Spot

            Good drivers/bad drivers/novice drivers..and everyone..Everyone brings it up..Sometimes you honk someone or get honked!! This whole "Blind spot" concept amuses me..I really wonder about this word "blind spot"..
            Its something that is right next to you but you cant see it..The car is almost next to you but you can't see it..The care is almost next to you but you can't see it in the mirror. Isn't it interesting? Does it not corelate to life?

Actually it happens to me many times, the answer is next to me (Not right next to me but close , may be diagonal). थोडीशी मन वाकडी करून बघायची गरज असते ना !! तेच तर अवघड आहे… आम्ही आपले पूर्व -पश्चिम-उत्तर - दक्षिण एवढ्याच दिशांमध्ये बघणारे … अग्नेय - नैऋत्य - वायव्य - ईशान्य या दिशा विसरून गेलेले।प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच चार दिशांमध्ये शोधण्याचा प्रयत्न !! आणि या चार दिशांना काही दिसल नाही तर पुढे !!
I think before writing more about it , I need to stop to look around and detect my blind spots!!
खरच आपल्याला पण एक "Blind spot monitoring system" असती तर ? जस लेन बदलताना BSM आपल्याला सतर्क करते तसंच चुकीचे निर्णय /प्रसंगांमध्ये जाताना सतर्क करेल अशी व्यवस्था हवी !! तस आई बाबा ते करत असतातच…. आणि त्यांची efficiency आणि accuracy कोणत्याही BSM पेक्षा कित्येक पटींनी चांगली आहे !!

           

Sunday, April 21, 2013

बंदिस्त

एक पक्षी : बंदिस्त 

हो… उडायचं होत मला सुध्दा…. घ्यायची होती उंच आकाशात झेप…. 
मी सुद्धा पहिली होती स्वप्न अनेक…काही झाली पूर्ण पण काही…. 
ज्याने कधी झेपच घेतली नाही त्याला कधी न उडण्याचे दुःख होते का नाही 
माहित नाही… पण उडता येत असून फक्त कोणीतरी स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थासाठी 
आज मला या पिंजऱ्यात कैद करून ठेवले अहे… सोन्याचा पिंजरा आणि त्यात मी … 
पिंजरा सोन्याचा असो कि लोखंडी … पिंजरा तो पिंजराच…. माझ्याही आशा होत्या…
मला सातासमुद्रापार प्रवास करायचा होता… अजून उंच उडायच होतं…. स्वतःला झोकून 
द्यायचं होतं…. माझ्यातही जिद्द होति…. माझी ध्येय गाठायची ताकद होती…. पण आता 
हा पिंजरा…. पिंजरा आणि कैद…. ज्या क्षणी मी ह्या पिंजर्यात बंदिस्त झालो, माझं स्वत्व हरवलं … 
मी स्वतःला हरवलं …. आयुष्य खूप आहे अजून पण फक्त प्रवास …दिवसाकडून रात्रीकडे  आणि 
रात्रीकडून पुन्हा एकदा दिवसाकडे ……ज्यांनी कधी भरारीच घेतली नाही त्यांना कधीच पिंजर्यात
राहण्याचे दुःख कळणार नाही…. त्यांना दिसतं ते फक्त पिंजर्यातल सोनं …पिंजार्यातली कैद त्यांना 
चांगली वाटते कारण त्यांच लक्ष सोन्यावर असत…. त्यातला पक्षी …त्या पक्ष्याचं स्वत्व…सोन्याच्या 
पिंजर्यापुढे त्याची किंमत नसते …. आता उरलाय फक्त पिंजर्यातला आयुष्य…कुढत कुढत जगण्यासाठीच ….
 ..............................................................................................................................................................
आज संध्याकाळी मी एका लहान मुलीला पक्ष्याला त्रास देताना पहिल…. आपण कधी पक्ष्यांना जीव म्हणून बघणार? कधी त्यांना पिंजर्यातून मुक्त करणार? माझी अगदी मनापसून सगळ्यांना विनंती आहे कि आपण पक्षी पिंजऱ्यात कैद नको करायला…पक्षी हि काही शोभेची गोष्ट नाही ….

Sunday, April 14, 2013

My fantastic direction sense

Me and directions : हमारी जनम जनम की दुश्मनी है !! मला दोनच दिशा समजतात , वर आणि खाली !!
पण एवढा असून सुद्धा मी हे जायच असत तिथे नक्की पोचते (कशी ते मात्र मलाच माहितीये )

आता उदाहरण बघूया 

Preston वरून coit वर जाने म्हणजे "वर ".… Preston पासून toll way म्हणजे खाली . plano वरून parker म्हणजे वर आणि plano वरून frankford म्हणजे खाली!! 

आता जेव्हा लोक रस्ता विचारतात तेव्हा माझी भयंकर तारांबळ उडते कारण सगळ्यांना पूर्व - पश्चिम अशा दिशा हव्या असतात… मग मला विचार करावा लागतो सुर्य कुठे उगवतो वगैरे वगैरे …. 
खरच ज्याने कोणी GPS चा विचार केला त्याला मानला मी !! 


हि पूर्व पश्चिम वाली लोक तरी बरी , त्याहून वैताग देणारी लोक म्हणजे शेजारी बसून रस्ता सांगणारी लोक … " आता उजवीकडे वळ " आणि हे सांगताना डावा हात दाखवणार , जरी तो हात उजव्या दिशेलाच दाखवत असतील पण मग डावा हात का वापरावा ? किती confusing आहे हे !! ज्या दिशेला जायच त्या तो हात नको दाखवायला ?

पुढंच म्हणजे नकाशातून रस्ते शोधा… ते तर फारच डोकेदुखीच काम… तिथे न गेलेलाच बरं !!

Sunday, April 7, 2013

Peter Burke

Yes , I am referring to the character from White Collar.. This character from White collar is one of my favorites..
I really admire him as a person..He is a truly amazing boss..He is a no nonsense person who is very passionate about his work..Someone who cares for his subordinates, someone who thinks of everyone, thinks for the team..Too good to be true :P ..Someone whom you can trust , someone who inspires you to walk that extra mile (even after you are completely exhausted )., someone who motivates you...

He is that kind of boss who wont ask you to work , but when you see him working you want to work harder..Someone who will check on you if you are not ok or low..someone who will guide you in the right direction..who is deserving of your admiration/respect , who will fight for you...who will be with you and will trust you..



(Am I writing about Peter Burke ?? Do I know someone like him ?  )

Sunday, February 3, 2013

Movies


मला बर्याच लोकांचं कळतच नाही कि आपण बघितलेला प्रत्येक सिनेमा दर्जेदारच हवा असा हट्ट कशाला ?
मला दर्जेदार किंवा चांगले सिनेमे आवडत नाहीत अस अजिबात नाहीये पण म्हणून मला अगदी non-sense आणि मसालेदार ड्रामा असलेले चित्रपट वर्ज्य वगैरे अजिबातच नाहीत..कधी कधी तर मला वाटत कि डोकं बाजूला ठेवून बघत येतील असले सिनेमेच जास्त निघायला पाहिजेत..याबाबतीत माझं मत कायम बदलत असतं , त्यामुळे मी थोड्या वेळाने कुणाशी दर्जेदार सिनेमे कसे महत्वाचे आहेत या विषयावर वाद घातला तरीही काही नवीन नसेल..बाकी बर्याच गोष्टींवर मी ठाम असते पण सिनेमे (LoL) मी माझा मत कोणत्याही क्षणी बदलू शकते !!

माझ्यासोबत इथे फार चांगली लोक आहेत त्यामुळे आम्ही बहुतेक दर शुक्रवारी रात्री कोणता न कोणता पिक्चर बघतोच..अगदी 'Lincoln' पासून 'mama' , अस काहीही असो..

Yes I love chic-flicks , whats so wrong about watching chic-flicks? I find those entertaining!! Its like an extended fashion show.. You get see all new collections of many famous brands, make ups, shoes,jewelry..Oh my God!! I cant get enough of it ever!! It's like my dreamland!! But that doesn't mean I hate action movies..Actually quite surprisingly I love action movies..The gadgets /cars / dialogues etc etc..And super heroes ! They are my favorites!! I am not a comic fan (rather I am faar faar away from that world!!) but I like the movies..So actions, super-heroes, chic-flicks, bollywood masalas, marathi thought provoking movies , Marathi random comedy (अशी हि बनवा बनवी !! :) )

Not that I watch lots and lots of movies (I definitely know where I stand there) but I like to watch movies..
Sometimes I am soo involved in the movie that I barely sense the surroundings..(ARGO) , sometimes I just keep watching people/theater/coffee/chairs/ceiling/nails etc along with the movie..(Paranormal Activity 3)..

Now I am going to be super-cheesy..I will try my best to be cheesy about movies..

Every movie is a different experience , If you ask me I find atleast one good thought/lesson (Well , talikng about lessons is soooooo easy, lets not go to the following part of it!!) Let me give you some examples.

Vivaah : Life can be picture perfect (sometimes it is better it's not)
Dabangg : Akal ke aane k liye shakal ke bigadne ka kyon intezar kar rahe the tum ?
Aishaa : Love your clothes , love your cosmetics and most importantly stop poking your nose.
Agneepath : Really ?? Aiiyn!!
Love Happens : Things happen!!
Mumbai Pune Mumbai : :)
Argo : If you need good stories, go to CIA!! Tremendous Respect !!

enough of non-sense I guess..






Sunday, January 20, 2013

काही गोष्टी हातातल्या...



अगदी मनापासून बरच काही लिहावास वाटतंय..

आत्ताच एक पुस्तक वाचलं... वपुंच..नाव सुद्धा अगदी सुरेख आहे.."गोष्ट हातातली होती "
छोट्या छोट्या गोष्टींचं हे पुस्तक , पुस्तक नाही तर हा अगदी एक आरसा आहे..
एक वेगळ्या प्रकारचा , पट आहे नव्या जुन्या आठवणींचा ,
आपल्या आयुष्यात असतील - नसतील त्या लोकांचा मेळावा आहे ,
आणि सर्वात महत्वाच , प्रतिबिंब आहे आपल्या मनाच, विचारांच..

पुस्तकाच्या प्रत्येक पानासोबत आठवणी उलगड जातात, नाती समजत  जातात..
स्वतःला पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात..लोक समजत जातात..

पुस्तकात यातली कोणतीही उत्तरं नाहीत आणि प्रश्न तर अजिबात नाहीत..
हे दोन्ही कुठेतरी खोल दडलेले असतात प्रत्येकाच्या मनात..माझ्याही मनात..
आणि मग अस काही वाचनात आल कि तेच प्रश्न पुन्हा पडतात..मग असा वाटत कि
पुन्हा पुन्हा तेच प्रश्न पडणं म्हणजे तिथेच अडकणं नाही का ? पण मला वाटतंय पुन्हा पुन्हा
तेच प्रश्न पडणं आणि त्याची वेगळी उत्तरं मिळत जाणं म्हणजेच प्रवास..

आज असंच बरंच काही लिहावंसं वाटतंय..पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या प्रश्नचिन्हांना पूर्णविराम
मिळाला तर काय? (हा हि एक प्रश्नच नाही का !!) कुणाला वाटेल काय विक्षिप्त मुलगी आहे ,
कसले प्रश्न , कुठली उत्तरं..

विचार हे फक्त विचार असतात , त्यांना चिह्न मन देतं, कधी प्रश्नचिन्ह , कधी उद्गारवाचक,
कधी स्वल्पविराम आणि कधी सगळं सगळं संपवायला पूर्णविराम.. खरं बघायला गेलं तर
पूर्णविराम सुरुवात असते नवीन वाक्याची!! सगळं काही संपवणारा
पूर्णविराम नवीन सुरुवातीचा संकेत असतो.


असो..या सगळ्याचा पुस्तकाशी काहीही संबंध नाही, हा फक्त एक नमुना आहे कि पुस्तक वाचताना
कित्येक हातातच राहिलेल्या गोष्टी, नकळत हातातून निसटलेल्या गोष्टी , आणि मुद्दामून हातातातून सोडलेल्या गोष्टी
आठवत जातात आणि पुस्तकातल्या गोष्टींसोबत एक स्वतःची अशी गोष्ट नकळत तयार होत जाते/आठवत जाते