Sunday, February 22, 2015

Troubleshooting!

I am involved in a lot of troubleshooting as a part of my job profile. Pure technical troubleshooting. Its time consuming but adventurous ! I love the challenges it has. Last week we had a troubleshooting going on almost for the entire night. It was funny though! Would like to explain it in simple terms 

कधी कधी आपण काही basic assumptions मांडतो … म्हणजे जर "गायत्री शिरुरे " या नावाने माझ्या नावावर पत्र आल , तर ते कुणीतरी मला पाठवलेल आहे ! आता कोणीही विचार करेल , ह्यात सांगण्यासारखा काय आहे … पत्रच तर आलय आणि तेही तुझ्याच नावाने ! पण एक समजलंय मला , कि जस माझ्या पत्त्यावर आलेल , माझ नाव असलेलं पत्र मी वाचेन… पण  तसं सगळी लोकं नाही करत !

तर आम्ही सुरु केलं काम साधारण रात्री ९ वाजता … आता सगळ काही अगदी व्यवस्थित होत होतं … एकदाही एकही चूक नाही… मग आम्ही प्रत्येक तुकडा  वेगळा वेगळा तपासून पहिला … तरीही चूक नाही !
मग आम्ही एका दुसऱ्या व्यक्तीला विचारला , तू कस टेस्ट केल होत ते 

तो म्हणतो (सकाळी ३ वाजता !)

आता जर माझ्या पत्त्यावर पत्र आल आणि त्यावर माझा नाव असेल आणि मला ते अपेक्षित नसेल तर ते मी न वाचता फेकून देईन ! किंवा मी म्हणेन कि तो मी नव्हेच !!

आता यावर मी काय म्हणावं तेच मला सुचेना ! फक्त हसून हसून वेड  लागायची वेळ आली होती ! आणि कानाला खडा ! अजिबात पुन्हा कोणतही assumption , basic म्हणून वापरणार नाही !!

:) :) :)

Sunday, February 15, 2015

वेडं मन

खरच मनाच्या गोष्टी त्यालाच कळतात !

वेडं माझ मन , काय कळतंय त्याला ?
वेड्या या जगात ते सुद्धा वेडावलं !
वेडे विचार , वेडी स्वप्न , वेडे श्वास …
वेडे शब्द  आणि वेड्याच  भावना …

वेडी गाणी म्हणणार…
वेड्या तालावर नाचणारं …
आपल्याच तंद्रीत असलेलं
कधी माझ आणि कधी माझ्यापासून खूप लांब … माझ मन

वेडावलेल्या मनाला शहाणपण नको
आणि नकोच बाहेर यायला त्याच्या जगातून
असच रमूदेत स्वप्नांच्या दुनियेत …
खेळत बागडत , हसत आणि ….


Sunday, February 8, 2015

मला न वाटे भय उंचीचे..
तर तिथून पडल्यावरचे भय मला!
(आता यात उंचीचा काय दोष )

मला न वाटे भय जळाचे
तर बुडेन का मी त्यात वाटे मला
बुडण्याच्या भीतीला पाणी जबाबदार का?


मला न वाटे भय प्रयत्नांचे 
तर भय असफल होण्याचे
या भीतीने मी प्रयत्नच करणार नाही का?

मला नाही भीती भविष्याची
तर त्यातल्या नको असलेल्या गोष्टींची


खरच भय इथले संपत नाही..

थोड विचित्र वाटेल वाचायला पण खरच , आपण फार छाती ठोकपणे शूरवीर असल्याचा दावा करत असतो , आणि नेमका प्रसंग आला कि फुस्स ! खरा तर आपण प्रयत्नच करत नाही निर्भीड होण्याचा !

आपल्या सारखी लोकं , कशा न कशाला घाबरूनच (आणि तेही उगीच ) चालत राहतात …. अर्रे किती वेळ आपण असाच घाबरणार ? आपल्या मनाला असाच गोंजारणार ? कधीतरी एकदम बिनधास्त राहूया !

येऊ देत , बघू काय होईल ते… जमला तर ठीक, नाही तर दुसरा काही तरी बघता येईल


Sunday, February 1, 2015

एक घर पत्त्यांच


काही घर अशीहि बनतात … पत्त्यांची ! बाकीच जग काबाडकष्ट करून ,जीवाच रान करून , पै पै जोडून स्वप्नांच घर बनवण्यात आयुष्य घालवतात ! 

एका माणसाची गोष्ट , त्याच घर दिसायला पत्त्यांच असेल कदाचित , वर्षा दोन वर्षात त्यानं जगातला सर्वात सुंदर  महाल बनवला …  तो महाल बनवताना काही विटा फुटल्या , काही चांगल्या काचा मुद्दामून फेकून दिल्या … तो महाल बनविण्याची जिद्द आली  फक्त एक घर नाकारल्यामुळे … हो …. एक छोटस घर नाकारला होता … ते घर अगदी त्याचाच होतं , खूप कष्ट केले होते त्याने त्या घरासाठी , पण तरीही ते नाकारला गेला…. आता या नाकारातुन निराश होण्यापेक्षा त्याने जिद्दीने , त्याला ज्यांनी तुच्छ मानल होत , त्यांच्या नाकावर टिच्चून महाल बनवला … कुणाच्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं कि हा माणूस महाल बनवेल ! हो पण त्याने बनवला … जिद्दीनं , मेहनतीनं  , कपटानं … आता त्याने जे केल , ते नैतिक दृष्ट्या किती योग्य आणि किती अयोग्य याबद्दल मला माहित नाही , पण मला दिसतीये ती त्याची जिद्द … शांतपणे पराभव आणि अपमान पचवण्याची शक्ती … एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून खचून न जाता अजून जिद्दीने प्रयत्न करण्याची तयारी … 


आता तो त्या महालात आहे … पुढे काय होईल त्याच ? तो या मिळालेल्या यशान हुरळून जाइल? त्याचं हे पत्यांच घर वाऱ्याच्या एका झुळुकेन कोलमडून जाइल ? का तो नवीन ध्येय ठेवेल ?  लवकर बांधल तरी त्याचं घर पत्त्यांच नाही हे सिद्ध करेल ?

--------------
This is based on what I feel about House of cards...I am desperately waiting for season 3!