Sunday, May 27, 2012

खिडकी


आज संदीप खरेच्या कवितेतल्या या दोन ओळी अगदी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतायत!!

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी..
धरे सर काचभर तडा!!

खरंच..खिडकी..मला माझी खिडकी फार फार आवडायची..
माझ्या रूम मधल्या खिडकीतून सुंदर चाफ्याचं झाड दिसायचं..
पौर्णिमेच्या रात्री त्या फुलांवर पसरलेला चंद्रप्रकाश!!
काय सुंदर दिसायचं सगळं..

खिडकी..जग दाखवणारी..
मनाची असेल किंवा घराची..

आज खिडकी वेगळी आहे समोर..
पण आकाश मात्र तेच आहे..
दिसत नसेल चाफ्याचं झाड समोर..
पण त्याचा वास अजून मनात दरवळत आहे..

याच खिडकीत स्वप्नं पहिली..
काही पूर्ण झाली तर काही..
याच खिडकीतून उडणारे पक्षी पहिले..
पडणारे पतंग सुद्धा इथूनच दिसले..

याच खिडकीत कित्येक प्रश्न पडले..
उत्तरं शोधत किती तास घालवले..
काही उत्तर मिळत गेली..
तर काही प्रश्न गुंतत गेले..

बाहेर तर जग पाहिलंच या खिडकीतून
पण मनात सुद्धा इथेच डोकावलं..
हरवलेल्या गोष्टी शोधता शोधता..
सगळं काही इथेच सापडलं..

खरंच आज खिडकी तर आहे इथे पण ते चाफ्याचं झाड मात्र नाहीये..

Sunday, May 13, 2012

Damsels in Distress


                 What an adventurous day we had!! We can not forget this day..This is the glorious day when my dear friend decided to get married!! This is the day when w e roamed around Dallas, Irving, Lovefield airport and whatever you can think of!! This is the day when we just trusted on intuitions..This is the day when I actually said, "प्लीज भगवान जी अब तो हद पार हो चुकी है अब इस दिन में बहोत excitement हो गयी..बोरिंग बना दो जी इस दिन को!!"
              आता अजून न ताणता आपण आजच्या दिवसाकडे येऊया!! So here we are, Sunday the 13th!! 13th OMG!! Now the morning was quiet usual..Tea and old hindi songs..As I am moving to another place, I went ahead and shifted some of my stuff..Now the adventure begins..Now the situation is we have to go to National to get Sonia's car. It is open till 4. We start at 2.45, half way through I just asked Sonia if she had her credit card!! Dear Ms Patil realized that she had left it back home..So we come back and pick it up..Then we try our best to find the National outlet but just can't! Thanks to google maps for the directions..we are lost now..Sunday afternoon..Downtown Dallas!! As the National outlet closes at 4, we decide to head towards LoveField Airport!! Dallas दर्शन!! The American Airlines Center..Place we have never been to!!
रणरणत्या या उन्हात आम्ही फिरतोय..Then finally we reach the LoveField Airport..There Sonia gets in and decides to rent a car from National..Dear god..Thanks a lot, I said in the car..But sometimes relief is a momentary phenomenon I guess!! Looks are soooo deceptive!! The good looking guy at the counter charged Sonia's credit card for ALAMO!! Really!! आणि आता त्या कार्डच लिमिट सुद्धा संपलंय..उद्या काका काकू येणार आहेत..काय करायचं आणि कसं ??
             काही दिवस खूप मजेशीर असतात त्यातलाच हा एक !! मग आता आम्ही घरी यायचं ठरवलं..
             एकदाचं घरी जाऊन चहा प्यावासा वाटतोय..पण पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त!!
             थोडं पुढे आलो..आणि गाडीतून आवाज यायला लागले..आता हे काय नवीन म्हणून मी चुकीच्या लेन मधून गाडी कशीबशी, एका काकांचा कर्कश हॉर्न ऐकून बाहेर काढून पार्क केली..आणि जय हो!! गाडी बंद!! आता काय??
The new scene is me and sonia sitting on a footpath..आणि माझी आयुष्यभराची सगळी महत्वाची कागदपत्र!!
आता मला खरच हसू येतंय..आणि सगळ्यात महत्वाचं..हि गाडी बंद पडण्याची जागा..
We are at one of the best shopping places in Dallas..Highland Park Village!!
In the worst possible attire, we are at the Shoppers paradise..And look it starts raining!!
दिवसभराच्या कडक उन्हानंतर आम्ही फुटपाथ वर असताना पाउस!! नशिबाने माझ्याकडे जिथून गाडी घेतली त्यांचा 
कार्ड होतं..Pure luck!! आता त्यांनी फोने उचलला तर ना..खूप वेळाने त्यांनी फोन उचलला आणि मग towing van ची व्यवस्था केली..त्याला अजून तास दीड तास नक्की लागेल..आता मग काय करायचं? मग सोनिया गाडीजवळ थांबली आणि मी गेले कॉफी आणायला..
              सकाळपासून २ ब्रेड चे तुकडे खाल्ले होते..आता तर भूक सुद्धा मेली होती..I entered Highland Park village..It is super classy..Jimmy Choo, Escada, Five and Ten, Bang & Olufsen and what not..Amazing luxury shops..and I didn't even think of going in..My credit card is going to be happy for that..:) Finally reached starbucks..Got coffee and muffins..Good to go..Most importantly WATER..ये सोडा-शोडा सब अपनी जगह..पाणी का काम पाणी हि कर सकता है!!
              खरच जब वी मेट ची आठवण येत होती..मग मी गेले परत गाडीच्या इथे..
आम्ही खरच छान गप्पा मारल्या इथे बसून..आणि ठरवलं..It is time to take life second by second..Not month by month, day by day, minute by minute as we didn't know what adventure is in store for us next moment!!
The most important thing!! This day should be engraved in GOLD as my dearest friend finally finally decides to get married..देवा संकटांनी का होईना..लोकांना सुबुद्धी सुचते !! Yes! Now you know this is the where Sonia decides to get married..आता यंदा कर्तव्य आहे!! म्हणा जर २०१२ मध्ये सर्वनाश नाही झाला तर..:):):)
            Ohh..Back to our story..SO this towing truck..आजोबा आले एक towing truck घेऊन..मी इतनी प्लीस्ड किसीसे मिलकर नाही हुई ठी जितनी आज  आजोबा से मिलकर हुं...आता त्यांनी गाडी त्या ट्रक मध्ये लोड केली..माझ्या मनात धाकधूक..सगळं काचेचा सामान होतं ना त्यात..मग आम्ही दोघी त्या ट्रक च्या एका फ्रंट सीट वर बसलो..आणि सीट बेल्ट मध्ये पण मावलो..मी आणि सोनिया!! I know..Very hard to imagine!! आता घरी जायच्या रस्त्यात..आजोबांना बोर होऊ नये म्हणून आम्ही मध्ये मध्ये बोलत होतो त्यांच्याशी..पण खास काही नाही..ते फार जोरात गाडी चालवत होते..मला वाटतंय विसरले असावेत कि हा ट्रक आहे!! आम्ही  कसेबसे घरी आलो..गाडीतून सामान काढलं..आता माझा या घरी गरजेचं काहीही सामान नाही..उद्या घालायला कपडे पण नाहीत..मग साईसोबत आम्ही walmart मध्ये गेलो, माझ्यासाठी कपडे घ्यायला नाही
सोनियाला सामान घ्यायचं होतं..मग दुसऱ्या घरी जाऊन कपडे आणले..आता बास..आता भूक लागली आहे..घरी आलो आणि मग पिझ्झा मागवला..तो सुद्धा उशीराच आला..
              आणि आता मी झोपतीये..संपला आजचा दिवस!!संपला एकदाचा हा दिवस..आता उद्या काय होईल माहित नाही!!

Sunday, May 6, 2012


वादळापूर्वीची ती भयाण शांतता..
जणू काही निसर्ग स्वतःचाच 
रुप एकदा न्याहाळतोय..शेवटच..
काळ-कुट्ट झालेलं आकाश 
भरून आलेलं आकाशाचं मन..
त्यात सगळं दाटलाय..
भावनांनी थैमान घातलंय..



आणि मग..तो क्षण..
होत्याच नव्हतं करणारा.. 
अनेकांचं आयुष्य बदलणारा..
वर्षानुवर्षांची मेहनत उध्वस्त करणारा..
अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह आणणारा..



तो क्षण..आता मात्र भूतकाळात गेलेला..
आता जणू काही पहिल्यांदाच 
आकाश स्वच्छं दिसतंय..
ते काळे ढग दूर निघून गेलेत..
मन मोकळं करून आकाश शांत झालंय..
दमून गेलंय..निरभ्र आकाश..
एक नवीन उमेद देतंय..
पुन्हा एक नवीन सुरुवात करण्याची..
आकाशाच्या आरशात स्वताला पाहण्याची..
सर्वस्व गमावलं तरीही नवा डाव मांडण्याची..