Sunday, May 6, 2012


वादळापूर्वीची ती भयाण शांतता..
जणू काही निसर्ग स्वतःचाच 
रुप एकदा न्याहाळतोय..शेवटच..
काळ-कुट्ट झालेलं आकाश 
भरून आलेलं आकाशाचं मन..
त्यात सगळं दाटलाय..
भावनांनी थैमान घातलंय..



आणि मग..तो क्षण..
होत्याच नव्हतं करणारा.. 
अनेकांचं आयुष्य बदलणारा..
वर्षानुवर्षांची मेहनत उध्वस्त करणारा..
अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह आणणारा..



तो क्षण..आता मात्र भूतकाळात गेलेला..
आता जणू काही पहिल्यांदाच 
आकाश स्वच्छं दिसतंय..
ते काळे ढग दूर निघून गेलेत..
मन मोकळं करून आकाश शांत झालंय..
दमून गेलंय..निरभ्र आकाश..
एक नवीन उमेद देतंय..
पुन्हा एक नवीन सुरुवात करण्याची..
आकाशाच्या आरशात स्वताला पाहण्याची..
सर्वस्व गमावलं तरीही नवा डाव मांडण्याची..

No comments:

Post a Comment