Sunday, March 18, 2018

मला कधीतरी मावशीने एक concept सांगितली होती ...  The concept of Time Zone.. 


अमेरिकेत तुम्ही जिथे राहता त्याप्रमाणे तुमचं घड्याळ वेगळं असतं .... आत्ता इथे डॅलस मध्ये २ वाजतायत ... न्यू यॉर्क मध्ये ३ तर कॅलिफोर्निया मध्ये बारा वाजतायत .... सूर्योदयाप्रमाणे घड्याळ बदलतं.. 


मावशी म्हणाली होती , कि जसे न्यू यॉर्क मध्ये ३ वाजलेत याचा अर्थ ते डॅलस च्या पुढे आहे असा होत नाही ! तसंच प्रत्येक माणसाचा एक time zone असतो .... कुणी पुढे किंवा मागे असत नाही ... 


असो ... सध्या spring सुरु होत असल्यनाने ... झाडांना पालवी फुटतिये ... हातात चहाचा कप घेऊन मी बाहेर बघत होते आणि मला जाणवलं कि एका रेषेत तीन झाडं आहेत. .. एका झाडावर एक सुद्धा पान नाही... दुसरं झाड पांढऱ्या फुलांनी संपूर्ण भरलंय .... आणि तिसऱ्या झाडावरची पांढरी फुलं जाऊन हिरवीगार पालवी फुटलीये ! 

या दोन्ही गोष्टी किती एकमेकांशी जोडलेल्या आहेत .... Nature has such a wonderful way of teaching us.. We just need to keep our eyes open and listen in!