Sunday, January 25, 2015

स्वातंत्र्य : मर्यादित

लोकमान्य : खूप सुंदर बनवलेला सिनेमा आहे … सुबोध भावे चा काम वाखाणण्याजोगा आहे … एकंदरीत सगळं खूप छान जमून आलय …

टिळकांची famous वाक्य तर खूप छान घेतालीयेत … स्वराज्य हा माझा …. किंवा केवढा हा ईंग्लंड देश … हि आणि अनेक वाक्य …  टिळकांची ठळक भाषणं मस्त घेतालीयेत

मला एक concept खूप भावली … स्वातंत्र्याची : मर्यादित स्वातंत्र्याची !

स्वातंत्र्य मर्यादित अस … अगदी पिंजर्यातल्या पक्ष्यासारख. … कदाचित त्याला माहीतच नसत कि स्वातंत्र्य काय असत ते … त्याच्यासाठी कदाचित अन्न , तो पिंजरा हेच स्वातंत्र्य असेल … मोकळ्या आकाशात उडण म्हणजे काय हे माहीतच नसेल तर त्याला बंदिवास म्हणजे सुद्धा स्वातंत्र्यच वाटत असेल …

अमर्याद स्वातंत्र्य म्हणे स्वैराचार का ? माहित नाही … आपण मिळालेल्या स्वातंत्र्याचा कसा वापर करतो त्यावर ते अवलंबून असेल … हे मर्यादित स्वातंत्र्य काही परकीय सत्ता किंवा राजे/ राजवाडे यांच्यापुरतच लागू होत असा नाही … तर आपल्या नात्यांमधला स्वातंत्र्य , आपल्या नोकरी मधल स्वातंत्र्य … पण सगळा मिळतंय म्हणून किंवा काहीही बंधने नाहीत म्हणून मनाला यॆइल तस वागणं म्हणजे स्वातंत्र्य का ?


व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळी बंधन धुडकावून लावावीत का ? आणि कोणती बंधने म्हणजे स्वातंत्र्य ?

अनेक प्रश्न डोक्यात येतायत … या प्रश्नांना उत्तरे असतीलच असा नाही … किंवा हे प्रश्न योग्य असतील असाही नाही …

असाच थोडासा प्रकट विचार …


Sunday, January 18, 2015

पोस्टाची गम्मत !

आपण पुणेकर नेहमी स्वतःची स्तुती करत असतो ! आपला वागणं , टोमणे , पाट्या वगैरे वगैरे …

ह्या वेळी मला पोस्टामुळे खूप वेगळा अनुभव मिळाला … This time I was on the other side of the table :(

तर आता जर नाट्यमय किस्सा

मी पोस्टात गेले होते , बाबांनी काही काम सांगितल होतं आणि ते माझ्या साहिनेच होणार होतं !
मग बुधवार सकाळी १० वाजता मी गेले पोस्टात … पहिली गोष्ट , एवढ्या कोपर्यात आहे ते ऑफिस , कि मला दिसलाच नाहि आत कुठून जायच … आत गेले तर ऑफिस फक्त आतली लोक बसतील एवढी खोली होती आणि मी आणि माझ्यासारखी बाकीची लोकं बाहेर उभी होती !

मग खूप वेळाने , साधारण ५० मिनिटांनी माझा नंबर आला आणि मी माझा काम काय आहे ते सांगितल… त्यांनी एक फॉर्म दिला , जो भरून त्यांना परत द्यायचा होता … मी फॉर्म भरला , सही केली आणि काकूंना कागद दिला … काकूंनी हातानेच तिथे जाउन बस अस सांगितल… तब्बल २५ मिनिटांनी मला काकूंनी पुन्हा बोलावलं आणि म्हणाल्या कि अजून एक address proof लागणार आहे , आता मी जेव्हा पहिल्यांदा विचारला होता , काय काय लागता तेव्हा काकू म्हणाल्या आधार कार्ड पुरेस आहे… आता ५० + २५ मिनीट थांबल्यावर अजून एक address proof. मग मी आईला  फोन केला , ती driver काकांना पाठवणार होती वीज बिल घेऊन …. आता माझ्या कडे  २ address proofs होती … मी काकूंना ती दिली … तर काकू म्हणाल्या कि फोटो सुद्धा लागतो …. ह्यांना सगळं एकत्र सांगायला काय झाला होत ?  मग आता पासपोर्ट चा फोटो आणायला पुन्हा कोणाला तरी सांगणार ? एव्हाना १२:२५ झाले होते …आणि १ वाजता पोस्ट बंद होणार :( ….

मग मी एक सेल्फी काढला , आणि जवळच एक प्रिंटींग च दुकान होत… तिथे गेले , त्यांना तो फोटो इमेल केला … मग काकांनी हळू हळू आपला वेळ घेत , एक एक अक्षर type करत इमेल उघडला …. आणि त्यांना म्हणल कि मला एक पासपोर्ट च्या आकाराचा फोटो हवा आहे …. काका म्हणाले आमच्याकडे फक्त a३ कागद आहेत… मी म्हणाले कि असू देत तरी मला एकाच फोटो हवा आहे… तर काका म्हणतात कि असेही तेवढेच पैसे लागणार आहेत तर जास्त प्रिंट काढून घे… मग ५० एक फोटो येतील …. आता माझ्याकडे फक्या २५ मिनिट उरली आहेत…. मग ते पन्नास एक फोटो मिळाले तर ते फोटो बघून काका म्हणतात , background काही बरोबर नाही …. आता माझ्याकडे अजिबात वेळ नवता चर्चा करायला आणि काकाची माझ्या फोटोवर विशेष टिपण्णी सुरु …

मी कशीबशी तिथून निघाले आणि धावतच पुन्हा पोस्टात गेले… आता माझ्याकडे त्यांनी मागितलेल सगळ होता … आता जर काकूंनी काही अजून आन अस म्हणाल असत तर …

मला बघून त्यांनी पुन्हा हातानेच खूण केली ये म्हणून …. एक बरं झाला कि पुन्हा थांबायला लागल नाही …
आता एक ला १० मिनिटे कमी होती …

मला वाटल चल एकदाच काम झाल…. पण काकू मला म्हणतात तुझ हस्ताक्षर खूप खराब झालाय … जुनी सही आणि नवीन सही जुळत नाहीये … आता तर कहर झाला ! १२ वर्षांपुर्णी केलेली सही आणि आजची सही यात फरक येणारच ना?

त्या म्हणाल्या मी हे काम करू शकत नाही , सही जुळली नाही तर ….पुन्हा फॉर्म भरावा लागेल आणि आता एक ला ६ मिनिटे कमी होती ….  मग मी पुन्हा फॉर्म भरला आणि त्यांनाच विचारला कि जुना नमुना दाखवता का ? त्यांनी चिडून ती जुनी सही दाखवली आणि मग मी ती सही केली … आता एक ला २ मिनिटे कमी होती … जर आता हे काम झाला नसता तर …… पण नशिबाने त्यांनी माझा काम पूर्ण केल ….


हुश्श …. एकदाची बाहेर पडले त्या पोस्टातून


Sunday, January 11, 2015

अर्धविराम


हो , मी  थांबत आहे पण पुन्हा प्रवास करण्यासाठी … हो मी थकले आहे, पण अजून संपलेले नाही … 
हा अर्धविराम आहे , पूर्णत्वाकडे नेणारा … 
पुन्हा एकदा उठण्यासाठी ताकद जोडणारा … वादळामुळे झालेल्या नुकसानाची डागडुजी करण्यासाठीचा…
कदाचित जगासाठी संपले असेन मी , कारण त्यांना दिसतीये स्तब्धता …. पण हा विराम म्हणजे फक्त काही घटकांची स्तब्धता…. काही सेकंदांच मौन…. आणि काही क्षणांसाठी रोखलेले श्वास …. डोळे उघडून अनुभवायचाय जग … पुढच्या प्रवास आधी … अर्धविराम , कारण काही क्षण फक्त स्वतःसाठी …. स्वत्वाची जाणीव करण्यासाठी …. आणि याच जोरावर पुढील वाटचालीसाठी …. रक्ताळलेल्या पायांवर  नाल  ठोकण्यासाठी … पुन्हा एकदा उंच उडी घेण्यासाठी … 
ह्या क्षणिक विश्रान्तिनेच तर लंच पल्ला गाठण्याची शक्ती मिळते …. ह्याच वेळी नवीन कल्पना सुचतात … काही जुन्या गोष्टी चेहऱ्यावर हसू उमटवून जातात … काही आठवणी डोळ्यात पाणी आणतात 

अर्धविराम , काही क्षणांचा