हो , मी थांबत आहे पण पुन्हा प्रवास करण्यासाठी … हो मी थकले आहे, पण अजून संपलेले नाही …
हा अर्धविराम आहे , पूर्णत्वाकडे नेणारा …
पुन्हा एकदा उठण्यासाठी ताकद जोडणारा … वादळामुळे झालेल्या नुकसानाची डागडुजी करण्यासाठीचा…
कदाचित जगासाठी संपले असेन मी , कारण त्यांना दिसतीये स्तब्धता …. पण हा विराम म्हणजे फक्त काही घटकांची स्तब्धता…. काही सेकंदांच मौन…. आणि काही क्षणांसाठी रोखलेले श्वास …. डोळे उघडून अनुभवायचाय जग … पुढच्या प्रवास आधी … अर्धविराम , कारण काही क्षण फक्त स्वतःसाठी …. स्वत्वाची जाणीव करण्यासाठी …. आणि याच जोरावर पुढील वाटचालीसाठी …. रक्ताळलेल्या पायांवर नाल ठोकण्यासाठी … पुन्हा एकदा उंच उडी घेण्यासाठी …
ह्या क्षणिक विश्रान्तिनेच तर लंच पल्ला गाठण्याची शक्ती मिळते …. ह्याच वेळी नवीन कल्पना सुचतात … काही जुन्या गोष्टी चेहऱ्यावर हसू उमटवून जातात … काही आठवणी डोळ्यात पाणी आणतात
अर्धविराम , काही क्षणांचा
बरा असतो …. काही कालासाठी …
ReplyDelete