Sunday, August 5, 2018

Unagi!

All the FRIENDS fans might know the One with Unagi , where Ross won't give up on teaching a lesson to Phoebe and Rachel and ends up getting all beaten up! :) :)

For others , here is a definition of Unagi

Complete awareness; Total state of awareness. Coming from from the Japanese fighting style, Karate. When you have achieved Unagi, you can defend & prepare yourself from any danger at any given moment. (https://www.urbandictionary.com/define.php?term=Unagi )

Now coming back to today. I was in Mexico city last week. My colleague was warning me about being safe and watching out for other people while walking on the road. Then we went out for lunch and he did try to surprise me from the back! Guess what happened after that... I will leave it to your imagination!!

Unagi! I have had so much fun with the word recently! One evening I was walking in Mexico city and a real nice lady passed by, it was crowded so she almost pushed me (In my mind I said Unagi! I am ready ha ha  ) but she immediately apologized आणि मी उनागी खिशात ठेवून घरी गेले !



PS : Whatever you imagine my response to be, the reality wont be able to match the execrations!

Sunday, July 22, 2018

विट्ठल विठ्ठल ....

धरिला पंढरीचा चोर !

पैल आले हरी , शंख - चक्र .....

या विठूचा गजर हरिनामाचा ... झेंडा रोविला ....

 चंद्रभागेचे वाळवंट , दुसरे नकोच वैकुंठ .... माधव भरला आकंठ ....  हासून नाचून
मनात भरली पंढरी.... जाऊन यावे दरबारी ..... विठ्ठलाच्या मंदिरी..

ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम

खेळ मांडीयेला वाळवंटी ......

असे शेकडो अभंग असतील ,  अजूनही कितीतरी अभंग माझ्या डोक्यात येतायंत ....  उद्या आषाढी एकादशी ! मला वारकरी आणि त्यांचा भाव खूप .....

किती मनमोकळ , हक्काचं नातं आहे भक्त आणि विठ्ठलाचं ! त्यात हट्ट आहे , प्रेम आहे , खेळकरपणा  आहे ! ते निखळ नातं खूप भावतं मला ....  कित्येक वर्ष झाली हे सगळं अनुभवून पण दर वर्षी  आठवण येतेच !

अभंगांचे ते भाबडे भाव , विठूमाऊली जवळ मांडलेली गाऱ्हाणी आणि सर्वात महत्वाचा विश्वास .... माझं गाऱ्हाणं विठोबा ऐकणार कि नाही अशी शंका कुठेच मनात नाही , एक विश्वास कि आपला विठोबा कमरेवर हात ठेवून  आपलं ऐकण्यासाठी उभा आहे ....

अभंग आवडण्याच अजून एक कारण म्हणजे खूप सरळ साधे आणि सोप्पे  असतात! अगदी

कांदा मुळा  आणि भाजी अवघी विठाबाई माझी

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ...  काय भुललासी वरलीया रंगा

रोजच्या उदाहरणातले अभंग !

किती समृद्ध परंपरा आहे , आणि किती सरळ आणि सोप्पी शिकवण आहे !


----

जस सुचत गेलं , तसं लिहिलंय .... हा पोस्ट एडिट केला नाहीये ...

Sunday, March 18, 2018

मला कधीतरी मावशीने एक concept सांगितली होती ...  The concept of Time Zone.. 


अमेरिकेत तुम्ही जिथे राहता त्याप्रमाणे तुमचं घड्याळ वेगळं असतं .... आत्ता इथे डॅलस मध्ये २ वाजतायत ... न्यू यॉर्क मध्ये ३ तर कॅलिफोर्निया मध्ये बारा वाजतायत .... सूर्योदयाप्रमाणे घड्याळ बदलतं.. 


मावशी म्हणाली होती , कि जसे न्यू यॉर्क मध्ये ३ वाजलेत याचा अर्थ ते डॅलस च्या पुढे आहे असा होत नाही ! तसंच प्रत्येक माणसाचा एक time zone असतो .... कुणी पुढे किंवा मागे असत नाही ... 


असो ... सध्या spring सुरु होत असल्यनाने ... झाडांना पालवी फुटतिये ... हातात चहाचा कप घेऊन मी बाहेर बघत होते आणि मला जाणवलं कि एका रेषेत तीन झाडं आहेत. .. एका झाडावर एक सुद्धा पान नाही... दुसरं झाड पांढऱ्या फुलांनी संपूर्ण भरलंय .... आणि तिसऱ्या झाडावरची पांढरी फुलं जाऊन हिरवीगार पालवी फुटलीये ! 

या दोन्ही गोष्टी किती एकमेकांशी जोडलेल्या आहेत .... Nature has such a wonderful way of teaching us.. We just need to keep our eyes open and listen in! 



Sunday, February 11, 2018

नामस्मरणाचा sureshot उपाय !!

wait wait wait.. Before drawing any conclusions about what's up with me and the नामस्मरण ... 

मागच्या आठव्ड्यात आमच्या bootcamp मध्ये ६ आठवड्यांचा challenge सुरु झालाय ... सगळे जण असेल नसेल तेवढा उत्साह ओतून workout करतोय ... आता याचा आणि नामस्मरणाचा संबंध ? चला काही उदाहरणं बघूया !!


During the session! 

  • अर्रे देवा आता डेड़लिफ्ट्स ?
  • देवा ट्रेनर ला सद्बुद्धी दे - आज नको फिनिशर !
  • हनुमानाला  उचलताना जेवढा त्रास झाला नसेल तेवढा ह्या dumbells ने होतोय 
  • I hope i make it today !

After the session : Especially the next morning 

  • देवा नारायणा - शरीरात नक्की किती मसल्स असतात ? 
  • विठ्ठला पांडुरंगा प्रत्येक ab दुखतोय 
  • आई ग , प्रत्येक पाऊल टाकताना अर्रे देवा काय म्हणू 
  • हिल्स - अर्रे देवा ... हिल्स का घालतो माणूस 
  • अर्रे देवा हात हालेनात .... काय करू !

------

आहे ना नामस्मरणाचा guaranteed उपाय !