Sunday, July 22, 2018

विट्ठल विठ्ठल ....

धरिला पंढरीचा चोर !

पैल आले हरी , शंख - चक्र .....

या विठूचा गजर हरिनामाचा ... झेंडा रोविला ....

 चंद्रभागेचे वाळवंट , दुसरे नकोच वैकुंठ .... माधव भरला आकंठ ....  हासून नाचून
मनात भरली पंढरी.... जाऊन यावे दरबारी ..... विठ्ठलाच्या मंदिरी..

ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम

खेळ मांडीयेला वाळवंटी ......

असे शेकडो अभंग असतील ,  अजूनही कितीतरी अभंग माझ्या डोक्यात येतायंत ....  उद्या आषाढी एकादशी ! मला वारकरी आणि त्यांचा भाव खूप .....

किती मनमोकळ , हक्काचं नातं आहे भक्त आणि विठ्ठलाचं ! त्यात हट्ट आहे , प्रेम आहे , खेळकरपणा  आहे ! ते निखळ नातं खूप भावतं मला ....  कित्येक वर्ष झाली हे सगळं अनुभवून पण दर वर्षी  आठवण येतेच !

अभंगांचे ते भाबडे भाव , विठूमाऊली जवळ मांडलेली गाऱ्हाणी आणि सर्वात महत्वाचा विश्वास .... माझं गाऱ्हाणं विठोबा ऐकणार कि नाही अशी शंका कुठेच मनात नाही , एक विश्वास कि आपला विठोबा कमरेवर हात ठेवून  आपलं ऐकण्यासाठी उभा आहे ....

अभंग आवडण्याच अजून एक कारण म्हणजे खूप सरळ साधे आणि सोप्पे  असतात! अगदी

कांदा मुळा  आणि भाजी अवघी विठाबाई माझी

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ...  काय भुललासी वरलीया रंगा

रोजच्या उदाहरणातले अभंग !

किती समृद्ध परंपरा आहे , आणि किती सरळ आणि सोप्पी शिकवण आहे !


----

जस सुचत गेलं , तसं लिहिलंय .... हा पोस्ट एडिट केला नाहीये ...

No comments:

Post a Comment