Sunday, April 21, 2013

बंदिस्त

एक पक्षी : बंदिस्त 

हो… उडायचं होत मला सुध्दा…. घ्यायची होती उंच आकाशात झेप…. 
मी सुद्धा पहिली होती स्वप्न अनेक…काही झाली पूर्ण पण काही…. 
ज्याने कधी झेपच घेतली नाही त्याला कधी न उडण्याचे दुःख होते का नाही 
माहित नाही… पण उडता येत असून फक्त कोणीतरी स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थासाठी 
आज मला या पिंजऱ्यात कैद करून ठेवले अहे… सोन्याचा पिंजरा आणि त्यात मी … 
पिंजरा सोन्याचा असो कि लोखंडी … पिंजरा तो पिंजराच…. माझ्याही आशा होत्या…
मला सातासमुद्रापार प्रवास करायचा होता… अजून उंच उडायच होतं…. स्वतःला झोकून 
द्यायचं होतं…. माझ्यातही जिद्द होति…. माझी ध्येय गाठायची ताकद होती…. पण आता 
हा पिंजरा…. पिंजरा आणि कैद…. ज्या क्षणी मी ह्या पिंजर्यात बंदिस्त झालो, माझं स्वत्व हरवलं … 
मी स्वतःला हरवलं …. आयुष्य खूप आहे अजून पण फक्त प्रवास …दिवसाकडून रात्रीकडे  आणि 
रात्रीकडून पुन्हा एकदा दिवसाकडे ……ज्यांनी कधी भरारीच घेतली नाही त्यांना कधीच पिंजर्यात
राहण्याचे दुःख कळणार नाही…. त्यांना दिसतं ते फक्त पिंजर्यातल सोनं …पिंजार्यातली कैद त्यांना 
चांगली वाटते कारण त्यांच लक्ष सोन्यावर असत…. त्यातला पक्षी …त्या पक्ष्याचं स्वत्व…सोन्याच्या 
पिंजर्यापुढे त्याची किंमत नसते …. आता उरलाय फक्त पिंजर्यातला आयुष्य…कुढत कुढत जगण्यासाठीच ….
 ..............................................................................................................................................................
आज संध्याकाळी मी एका लहान मुलीला पक्ष्याला त्रास देताना पहिल…. आपण कधी पक्ष्यांना जीव म्हणून बघणार? कधी त्यांना पिंजर्यातून मुक्त करणार? माझी अगदी मनापसून सगळ्यांना विनंती आहे कि आपण पक्षी पिंजऱ्यात कैद नको करायला…पक्षी हि काही शोभेची गोष्ट नाही ….

Sunday, April 14, 2013

My fantastic direction sense

Me and directions : हमारी जनम जनम की दुश्मनी है !! मला दोनच दिशा समजतात , वर आणि खाली !!
पण एवढा असून सुद्धा मी हे जायच असत तिथे नक्की पोचते (कशी ते मात्र मलाच माहितीये )

आता उदाहरण बघूया 

Preston वरून coit वर जाने म्हणजे "वर ".… Preston पासून toll way म्हणजे खाली . plano वरून parker म्हणजे वर आणि plano वरून frankford म्हणजे खाली!! 

आता जेव्हा लोक रस्ता विचारतात तेव्हा माझी भयंकर तारांबळ उडते कारण सगळ्यांना पूर्व - पश्चिम अशा दिशा हव्या असतात… मग मला विचार करावा लागतो सुर्य कुठे उगवतो वगैरे वगैरे …. 
खरच ज्याने कोणी GPS चा विचार केला त्याला मानला मी !! 


हि पूर्व पश्चिम वाली लोक तरी बरी , त्याहून वैताग देणारी लोक म्हणजे शेजारी बसून रस्ता सांगणारी लोक … " आता उजवीकडे वळ " आणि हे सांगताना डावा हात दाखवणार , जरी तो हात उजव्या दिशेलाच दाखवत असतील पण मग डावा हात का वापरावा ? किती confusing आहे हे !! ज्या दिशेला जायच त्या तो हात नको दाखवायला ?

पुढंच म्हणजे नकाशातून रस्ते शोधा… ते तर फारच डोकेदुखीच काम… तिथे न गेलेलाच बरं !!

Sunday, April 7, 2013

Peter Burke

Yes , I am referring to the character from White Collar.. This character from White collar is one of my favorites..
I really admire him as a person..He is a truly amazing boss..He is a no nonsense person who is very passionate about his work..Someone who cares for his subordinates, someone who thinks of everyone, thinks for the team..Too good to be true :P ..Someone whom you can trust , someone who inspires you to walk that extra mile (even after you are completely exhausted )., someone who motivates you...

He is that kind of boss who wont ask you to work , but when you see him working you want to work harder..Someone who will check on you if you are not ok or low..someone who will guide you in the right direction..who is deserving of your admiration/respect , who will fight for you...who will be with you and will trust you..



(Am I writing about Peter Burke ?? Do I know someone like him ?  )