एक पक्षी : बंदिस्त
हो… उडायचं होत मला सुध्दा…. घ्यायची होती उंच आकाशात झेप….
मी सुद्धा पहिली होती स्वप्न अनेक…काही झाली पूर्ण पण काही….
ज्याने कधी झेपच घेतली नाही त्याला कधी न उडण्याचे दुःख होते का नाही
माहित नाही… पण उडता येत असून फक्त कोणीतरी स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थासाठी
आज मला या पिंजऱ्यात कैद करून ठेवले अहे… सोन्याचा पिंजरा आणि त्यात मी …
पिंजरा सोन्याचा असो कि लोखंडी … पिंजरा तो पिंजराच…. माझ्याही आशा होत्या…
मला सातासमुद्रापार प्रवास करायचा होता… अजून उंच उडायच होतं…. स्वतःला झोकून
द्यायचं होतं…. माझ्यातही जिद्द होति…. माझी ध्येय गाठायची ताकद होती…. पण आता
हा पिंजरा…. पिंजरा आणि कैद…. ज्या क्षणी मी ह्या पिंजर्यात बंदिस्त झालो, माझं स्वत्व हरवलं …
मी स्वतःला हरवलं …. आयुष्य खूप आहे अजून पण फक्त प्रवास …दिवसाकडून रात्रीकडे आणि
रात्रीकडून पुन्हा एकदा दिवसाकडे ……ज्यांनी कधी भरारीच घेतली नाही त्यांना कधीच पिंजर्यात
राहण्याचे दुःख कळणार नाही…. त्यांना दिसतं ते फक्त पिंजर्यातल सोनं …पिंजार्यातली कैद त्यांना
चांगली वाटते कारण त्यांच लक्ष सोन्यावर असत…. त्यातला पक्षी …त्या पक्ष्याचं स्वत्व…सोन्याच्या
पिंजर्यापुढे त्याची किंमत नसते …. आता उरलाय फक्त पिंजर्यातला आयुष्य…कुढत कुढत जगण्यासाठीच ….
..............................................................................................................................................................
आज संध्याकाळी मी एका लहान मुलीला पक्ष्याला त्रास देताना पहिल…. आपण कधी पक्ष्यांना जीव म्हणून बघणार? कधी त्यांना पिंजर्यातून मुक्त करणार? माझी अगदी मनापसून सगळ्यांना विनंती आहे कि आपण पक्षी पिंजऱ्यात कैद नको करायला…पक्षी हि काही शोभेची गोष्ट नाही ….

true!!
ReplyDelete