Sunday, July 9, 2017

युद्ध !

काय सुंदर संध्याकाळ होती ! अतिशय वेगळी ...
आकाशाच्या रंगमंचावरचं काळ्या पांढऱ्या ढगांचं घनघोर युद्ध ... मधेच धो धो  पाऊस ..... थोडंसं ऊन ... आणि सुंदर गाणी .... बालगंधर्वाचं वद जाऊ कुणाला शरण ..... पुन्हा पुन्हा तेच सुंदर पद - वद जाऊ कुणाला शरण....मस्त!

----

घनघोर युद्ध सुरु आह आज आकाशात ! जणू काही ह्या युद्धाच्या परिणामावर आयुष्य अवलंबून आहे अनेकांचं ! ना भूतो ना भविष्यती .... अस म्हणणं चुकीचं ठरेल .... काळे- पांढरे ढग ... आपापली खिंड लढवतायत .... एखाद्या लढाईत पांढरे ढग जिंकून आपल्या सीमा विस्तारित करतायत तर दुसरीकडे काळे मेघ आपली शक्ती दाखवतयात .... कुणी कमी नाही आणि कुणी जास्ती नाही .... घनघोर युद्ध चालू आहे. आणि त्यातच माझं मन म्हणताय वद जाऊ कुणाला शरण ? हे तुमच्या लढाईचं संकट नको मला ....पण ढगांच्या मनात फक्त जिंकण्याचे वेध ...

कोसळणारा पाऊस मधेच पूर्णपणे बंद होतो , आणि काही मिनिटातच पुन्हा बरसू लागतो .... कदाचित पाऊस ढगांची विजय गर्जना असेल...  एखादी छोटी लढाई जिंकली कि पाऊस. पण पुन्हा दुसरी लढाई .... एक म्हणावं लागेल ... अतिशय नाट्यमय आणि क्षणाक्षणाला वळणं घेणारी लढाई ... जिंकू किंवा मरू .. अशा त्वेषाने लढणारी दोन्ही सैन्य आणि स्वतःला महान समजणारी आम्ही मानवजात त्यांच्या युद्धाचे फटकारे झेलण्याशिवाय काहीही करू शकत नाही

------

खरंच अशी सुंदर संध्याकाळ ... आणि एक तास , प्रचंड नाट्यमय लढाई.. खरं तर शब्दात नाही सांगता आलाय मला...