Sunday, November 25, 2012

Shopping Shopping and some more shopping


Black friday is my favorite holiday!!
It reminds me of a song from English-vinglish.,

To to to to..
To your left is Prada
To your right is Zara
Giorgio Armani, Thank God it’s Friday
Gucci and Versace
Jimmy Choo, Givenchy
Diesel, Dior, Hokey Pokey, Gap and Bloomingdale
Louis Vuitton, Vuitton Vuitton.. Vuita Vuita Vuitton Vuitton..
Moschino, chino chino.. chi chi chino chino..
Valentino tino tino ti ti tino tino..

Seriously all the brands , midnight madness , entire friday!! Its just too good to be true..
Well I am sure you guessed how much I love shopping!! :)

But I am a very choosy person  , चोखंदळ पुणेकर न शेवटी.!! जोपर्यंत मनासारखी गोष्ट मिळत नाही
तोपर्यंत पाहत राहायच..फिरत राहायच..

रस्त्यावरची गर्दी बहुन मला फार लक्ष्मी रोडची आठवण येते..काय छान  वाटायचं तिथे..एक नुसती चक्कर मारून
आल तरी अगदी मूड बदलून जायचा..

So, my Black Friday was fantastic as usual..Planned/unplanned shopping..I think I love the feel more than
the actual shopping..Its so good to shop around midnight , those long lines (I could not even get into Coach :( )
Its just in the air..Its the feel of that Thursday night..Late night/early morning breakfast..lots of bags!!

Shoes, bags, accessories , clothes, colors , (dollars :( ) and much more,.,
Its so much fun..त्यावेळचा उत्साह..ते अनुभवायलाच पाहिजे..शब्दांमध्ये लिहिण थोड अवघड आहे..


Sunday, November 18, 2012

पुन्हा एकदा वपुर्झा




खरच कुठलं हि पण काढावं आणि वाचावं..

माझ्या अगदी आवडीचं पुस्तक आहे..तसं कधीच पूर्ण वाचलेलं नाही..
आणि तसा प्रयत्न सुद्धा करणार नाही कदाचित..

माझं आणि बाबांचं अतिशय आवडतं पुस्तक आहे..आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा वपुर्झा उघडलं..
आता इतकं चांगलं वाचून झाल्यावर मी काय लिहिणार ?
म्हणूनच काही ओळी वपुर्झा मधून..

"मी भगवद्गीता , रामायण वाचलेलं नाही, पण मी माझ्यापुरती एक व्याख्या केली आहे..प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत.महाभारत शब्दाला
समांतर शब्द म्हणजे "षडरिपू " आणि माणसाला त्या शक्तीचा शोध घ्यावासा वाटला , ध्यास लागला कि भगवद्गीता सुरु झाली असं समजावं "


"आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही.आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत..ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे
सुसाट वाहत आणि उतार गवसेल तसं..त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही.म्हणून आयुष्यालाही दिशा नाही.आपण ठरवलेल्या
दिशेनेच जात राहू , मुक्कामाचं ठिकाण जे निश्चित करू , तिथंच पोचू , हि शाश्वती नाही."

किती खर खरं लिहिलंय ना या पुस्तकात..जे रोज घडतं ते..आयुष्य आहे तसं...काही फंडे न देता सुद्धा सर्व काही सांगणार पुस्तक आहे हे..
अस करा म्हणजे तस होईल अशी बरीच पुस्तक आहेत..पण हे असा आहे अस सांगणरी फारच मोजकी..
आयुष्य बदलण्यापेक्षा जगण महत्वाचं नाही का ?

Sunday, November 11, 2012

असंच

प्रतिबिंब 

मनाच आयुष्यात कि आयुष्याचं मनात. .
नक्की काय आहे , 
नक्की कोणत खरं ? कोणत प्रतिबिंब?
जे  दिसतं ते का जे वाटतं ते ?
दिसण्यामुळे वाटतं कि वाटतं तसं दिसतं ?

स्वप्न
कधी कधी कळतंच नाही..
स्वप्नं खरी होतात ?
 कि खऱ्याच असणाऱ्या गोष्टी स्वप्नात दिसतात ?

प्रवास  
म्हणे "Journey is more important than destination"
 पण मुळात destination  च नसेल तर प्रवास कुठे ?
अज्ञाताकडे जाताना करता येईल हा प्रवास enjoy??
आणि प्रवास करण्याचं मुळ कारण destination नाही का ?

Sunday, November 4, 2012



काही व्यक्ती आयुष्यात येतात आणि आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोणच बदलून जातो..

काही दिवसांपूर्वीची गोष्ट..न्यू-योर्क ची..
एम्पायर स्टेट बिल्डींग ला जाण्यासाठी आम्ही सगळे रांगेत थांबलो होतो...आता आम्ही खूप जण म्हणजे आम्ही दोघीच आणि बाकीची अनोळखी लोक..पण एकंदरीत काय तर सगळे आपले प्रचंड मोठ्या रांगेमध्ये उन्भे राहून शेवटी त्या   ८६व्या मजल्यावर पोचलेले..ले..न्यूयोर्क बद्दल तर म्हणले लच  आहे कि इथे सगळ्या प्रकारची लोक सापडतात..सगळे देश. वर्ण, वंश , सामाजिक स्तर..आणि त्याचं उदाहरण तिथे दिसत होतं..

आम्ही दोघी तर तिथून न्यू यॉर्क चा व्हीव बघून वेद्याच झालो होतो..Central park, statue of liberty,उंच बिल्डींग्स..टेक्सास मध्ये राहिल्यावर उंच इमारती पाहण्याची सवयच राहत नाही !!

त्यातच माझ लक्ष एका भारतीय कुटुंबाकडे गेलं..तिघ जण होती ती..आई बाबा आणि मुलगी..
नंतर बोलताना कळलं कि ते फिरण्यासाठी काही दिवस इथे आलेले आहेत..
जगातलं सर्वात महत्वाचं शहर बघायला..आणि हा तर "one of the best views of the city" आहे..

त्या मुलीबद्दल हेवा वाटावा इतकी सुंदर होती ती दिसायला.. उंचीपुरी , लांब सडक अगदी कंबरेएवढे  केस..
दोघी माय  लेकी बोलत होत्या..काकू सांगत होत्या तो समोर स्टाचू ऑफ़ लिबर्टी आहे..तिकडच्या बाजूला खूप उंच इमारती आहेत..
समोर सेन्ट्रल पार्क आहे..आणि बराच काही..

इथे आमच्या दोघींच्या गप्पा, एका फोटोत हे सगळ कस बसवायचा? तो पानोरामा मोड का चालत नाहीये, 
दुर्बीण आणली असती तर बरं झाल असत..अजून नीट  दिसलं असतं..

पण जेंव्हा त्या मुलीकडे वळून पहिल तेंव्हा कळल कि ती मुलगी जन्मापासून आंधळी आहे..
काका काकू किती प्रेमाने तिला सगळं दाखवत होते..आणि ती सुद्धा खूप मनापासून सगळ ऐकत होती..

तेव्हा लक्षात आलं कि हे कॅमेरा , दुर्बीण असल्या क्षुल्लक गोष्टींबद्दल कुरकुर करणारे आम्ही आणि डोळे नसताना सुद्धा 
न्यूयॉर्क बघणारी ती..किती फरक आहे ना.

माझ्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं ह्याचा खरा अर्थ तिथे समजला..

There is a famous saying , "“I complained about having no shoes until I saw a man who had no feet."