काही व्यक्ती आयुष्यात येतात आणि आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोणच बदलून जातो..
काही दिवसांपूर्वीची गोष्ट..न्यू-योर्क ची..
एम्पायर स्टेट बिल्डींग ला जाण्यासाठी आम्ही सगळे रांगेत थांबलो होतो...आता आम्ही खूप जण म्हणजे आम्ही दोघीच आणि बाकीची अनोळखी लोक..पण एकंदरीत काय तर सगळे आपले प्रचंड मोठ्या रांगेमध्ये उन्भे राहून शेवटी त्या ८६व्या मजल्यावर पोचलेले..ले..न्यूयोर्क बद्दल तर म्हणले लच आहे कि इथे सगळ्या प्रकारची लोक सापडतात..सगळे देश. वर्ण, वंश , सामाजिक स्तर..आणि त्याचं उदाहरण तिथे दिसत होतं..
आम्ही दोघी तर तिथून न्यू यॉर्क चा व्हीव बघून वेद्याच झालो होतो..Central park, statue of liberty,उंच बिल्डींग्स..टेक्सास मध्ये राहिल्यावर उंच इमारती पाहण्याची सवयच राहत नाही !!
त्यातच माझ लक्ष एका भारतीय कुटुंबाकडे गेलं..तिघ जण होती ती..आई बाबा आणि मुलगी..
नंतर बोलताना कळलं कि ते फिरण्यासाठी काही दिवस इथे आलेले आहेत..
जगातलं सर्वात महत्वाचं शहर बघायला..आणि हा तर "one of the best views of the city" आहे..
त्या मुलीबद्दल हेवा वाटावा इतकी सुंदर होती ती दिसायला.. उंचीपुरी , लांब सडक अगदी कंबरेएवढे केस..
दोघी माय लेकी बोलत होत्या..काकू सांगत होत्या तो समोर स्टाचू ऑफ़ लिबर्टी आहे..तिकडच्या बाजूला खूप उंच इमारती आहेत..
समोर सेन्ट्रल पार्क आहे..आणि बराच काही..
इथे आमच्या दोघींच्या गप्पा, एका फोटोत हे सगळ कस बसवायचा? तो पानोरामा मोड का चालत नाहीये,
दुर्बीण आणली असती तर बरं झाल असत..अजून नीट दिसलं असतं..
पण जेंव्हा त्या मुलीकडे वळून पहिल तेंव्हा कळल कि ती मुलगी जन्मापासून आंधळी आहे..
काका काकू किती प्रेमाने तिला सगळं दाखवत होते..आणि ती सुद्धा खूप मनापासून सगळ ऐकत होती..
तेव्हा लक्षात आलं कि हे कॅमेरा , दुर्बीण असल्या क्षुल्लक गोष्टींबद्दल कुरकुर करणारे आम्ही आणि डोळे नसताना सुद्धा
न्यूयॉर्क बघणारी ती..किती फरक आहे ना.
माझ्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं ह्याचा खरा अर्थ तिथे समजला..
There is a famous saying , "“I complained about having no shoes until I saw a man who had no feet."
kharch heart touching....
ReplyDeleteThanks hrishikeh
ReplyDelete