Me and directions : हमारी जनम जनम की दुश्मनी है !! मला दोनच दिशा समजतात , वर आणि खाली !!
पण एवढा असून सुद्धा मी हे जायच असत तिथे नक्की पोचते (कशी ते मात्र मलाच माहितीये )
आता उदाहरण बघूया
Preston वरून coit वर जाने म्हणजे "वर ".… Preston पासून toll way म्हणजे खाली . plano वरून parker म्हणजे वर आणि plano वरून frankford म्हणजे खाली!!
आता जेव्हा लोक रस्ता विचारतात तेव्हा माझी भयंकर तारांबळ उडते कारण सगळ्यांना पूर्व - पश्चिम अशा दिशा हव्या असतात… मग मला विचार करावा लागतो सुर्य कुठे उगवतो वगैरे वगैरे ….
खरच ज्याने कोणी GPS चा विचार केला त्याला मानला मी !!
हि पूर्व पश्चिम वाली लोक तरी बरी , त्याहून वैताग देणारी लोक म्हणजे शेजारी बसून रस्ता सांगणारी लोक … " आता उजवीकडे वळ " आणि हे सांगताना डावा हात दाखवणार , जरी तो हात उजव्या दिशेलाच दाखवत असतील पण मग डावा हात का वापरावा ? किती confusing आहे हे !! ज्या दिशेला जायच त्या तो हात नको दाखवायला ?
पुढंच म्हणजे नकाशातून रस्ते शोधा… ते तर फारच डोकेदुखीच काम… तिथे न गेलेलाच बरं !!
No comments:
Post a Comment