Sunday, May 27, 2012

खिडकी


आज संदीप खरेच्या कवितेतल्या या दोन ओळी अगदी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतायत!!

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी..
धरे सर काचभर तडा!!

खरंच..खिडकी..मला माझी खिडकी फार फार आवडायची..
माझ्या रूम मधल्या खिडकीतून सुंदर चाफ्याचं झाड दिसायचं..
पौर्णिमेच्या रात्री त्या फुलांवर पसरलेला चंद्रप्रकाश!!
काय सुंदर दिसायचं सगळं..

खिडकी..जग दाखवणारी..
मनाची असेल किंवा घराची..

आज खिडकी वेगळी आहे समोर..
पण आकाश मात्र तेच आहे..
दिसत नसेल चाफ्याचं झाड समोर..
पण त्याचा वास अजून मनात दरवळत आहे..

याच खिडकीत स्वप्नं पहिली..
काही पूर्ण झाली तर काही..
याच खिडकीतून उडणारे पक्षी पहिले..
पडणारे पतंग सुद्धा इथूनच दिसले..

याच खिडकीत कित्येक प्रश्न पडले..
उत्तरं शोधत किती तास घालवले..
काही उत्तर मिळत गेली..
तर काही प्रश्न गुंतत गेले..

बाहेर तर जग पाहिलंच या खिडकीतून
पण मनात सुद्धा इथेच डोकावलं..
हरवलेल्या गोष्टी शोधता शोधता..
सगळं काही इथेच सापडलं..

खरंच आज खिडकी तर आहे इथे पण ते चाफ्याचं झाड मात्र नाहीये..

No comments:

Post a Comment