पावसाला पण मन असतं?
कुणासाठी नवीन आयुष्य घेऊन येतो हा..
तर कुणाचं आयुष्य उध्वस्त करतो हा..
त्यालाही मन असेलच कि..
पावसाच मन..कुणी न समजून घेणारं..
या नवीन चैतन्याने तरारून उठलेलं मन..
नवी पालवी..नवं आयुष्य..नवी उमेद..
पावसाचं मन..प्रसन्न..उत्साही..
थेंबाथेंबातून सळसळणाऱ्या चैतन्यासारखं..
बडबडगीतं म्हणत कुणीतरी सोडलेल्या बोटीसारखं
ना कालची आठवण ना उद्याची चिंता
पावसाचं मन..निरागस..गोंडस..
त्याच हेलाकावणाऱ्या बोटीसारखं..
अश्रू लपवण्यासाठी भिजणाऱ्या तिच्यासारखं
थेंब काय अन अश्रू काय दोन्हीही पाणीच..
पावसाचं मन..त्या वेदनेसारखं..
बोचणाऱ्या त्या प्रत्येक थेंबासारखं..
No comments:
Post a Comment