आज खूप दिवसांनी महाभारतातल्या एका पात्राची आठवण आली … कर्ण …
आणि लक्षात आल कि खरच महाभारत हि एका कोणत्या युगात घडलेली गोष्ट नाही , हा आपला इतिहास नाही ! हि पुन्हा पुन्हा प्रत्येकाच्या मनात घडणारी गोष्ट आहे … कधी आपण अतिशय एकाग्र असणारे अर्जुन असतो , कधी समोरच्याला संजून घेणारे -संयमी असे धर्म , कधी आपल्याच शब्दात प्रतिज्ञेत अडकलेले भीष्म तर कधी कृष्ण !
आज माझ्या मनात कर्ण आहे … शस्त्रस्पर्धेच्या वेळेचा
***
आज मी या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करून आलो आहे … माझी वर्षांची मेहनत , तपस्या सगळ काही सोबत घेऊन , आज मला या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करायच आहे … जेव्हा माझ्या आसपासची लोकं इतरत्र वेळ वाया घालवत होती , मी मात्र सराव केला … माझ मन माझ्या ध्येयापासून हलु दिलं नाही … फक्त आणि फक्त माझ ध्येय माझ्यासाठी महत्वाच होत ! आणि अजूनही आहे … पण आज फक्त आणि फक्त मी सूतपुत्र आहे म्हणून माझा अपमान होतो ? माझी गुणवत्ता न तपासता ? जर मी कशात कमी पडत असेन आणि म्हणून माझा अपमान झाला किंवा जर माझी योग्यता नाही म्हणून मी नाकारला गेलो तर मला वाईट वाटणार नाही … उलट आनंदच होईल कि एका पराक्रमी विराकडून माझा पराजय झाला , पण फक्त माझं कुळ / जात अशा गोष्टींवरून मला नाकारल जावं ?
एखाद्या माणसाचा स्वभाव , त्याची गुणवत्ता फक्त त्याच्या जात / कुळ /रंग अशा गोष्टींवरून ठरवली जाणार असेल तर काय अर्थ आहे ? मला स्वतःच म्हणणं मांडायची संधी तर द्या… मी नक्की कोण आहे कसा आहे हे तर समजून घ्या … तुमच्या राजघराण्यातल्या लोकांपेक्षा देखील उत्तम धनुर्विद्या मी प्राप्त केलेली आहे ….
पण केवळ राधेय असल्यामुळे आज … पण आज जे काही मी आहे ते केवळ त्या राधेमुळेच … सूतपुत्र असण्याची मला अजिबात लाज नाही फक्त आणि फक्त अभिमान आहे ….

No comments:
Post a Comment