Sunday, March 16, 2014

आशा ...

Malaysian Airlines Flight 370.. खरी न वाटणारी घटना , खरच अस सुद्धा होउ शकत? एखादी घटना आणि त्यामागची असंख्य कारण ! खरच जगाला हादरवणारी घटनाच म्हणावी लागेल…

विमान लापत्ता होणे कमी कि काय म्हणून विमान चालकाच्या घरी "simulator" सापडणे … २ लोकांकडे खोटे पासपोर्ट , विमानाची बदललेली दिशा , २० लोक एकाच कंपनीचे … आणि असंख्य गोष्टी !

या  बातम्या बघताना खरच काही कळेनास होतंय मला…. आपण चंद्रावर आणि मंगळावर गेलो पण आज त्या २००+ कुटुंबांना दिलासा देण्यासाठी समुद्राच्या तळाशी नाही जाऊ शकत … असो हा विषय नाही…

मला या घटनेवरून एक स्पष्ट दिसतंय कि कोणत्याही गोष्टीच विश्लेषण हि खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे … एखादी घटना सरळ साधी नसते , त्यामागे खूप खूप कारणे /  छुपे motives असू शकतात …

आज आपण सगळे इतक्या विचारात आहोत तर या २००+ कुटुंबियांची मनस्थिती कशी असेल याचा  अंदाज लावण सुद्धा अवघड आहे … खूप मनापासून वाटतंय कि  विमान मिळाव आणि सर्व हे सर्व लोक आपल्या आपल्या घरी  पोचावेत … जोपर्यंत काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत आशा कायम आहे …

-------

आशा

जर आशा आहे तोपर्यंत सगळ काही शक्य आहे , या आशेच्या बळावरच तर आपणा चालत असतो …
मला  हिंदी शब्द "उम्मीद " प्रचंड आवडतो … "उम्मीद ही तो सब कुछ है !"

सगळे गुंते सुटतील , बंद दरवाजे उघडतील ,
अर्धवट गणित सुटतील , अवघड प्रश्न सुद्धा सुटतील
पण हि आशा नको सोडूस , हरून नको जाउस

रणरणत्या उन्हात असलेल्या माणसाला मावळत्या सूर्याची आशा
थंडीत कुडकुडत असलेल्याला त्या तापलेल्या सूर्याची आशा
हि आशा आहे म्हणूनच तर ….

कुणाला प्रीयाजानांनी सुखरूप परतायची आशा
कुणाला संकटे टाळून जायची आशा
कुणी भेटेल अशी आशा … सर्व काही आधीसारखं होईल अशीशी आशाच !

-----





No comments:

Post a Comment