पहिला उरला नाहीस तू ….
खूप दिवसांनी १०फ मधली हि कविता ऐकली! खरच ध्येयवेड्या माणसाला अस बघायची सवयच आहे आपल्याला… असाच दोन मित्रांची मनोगते , एक ध्येयवेडा आणि दुसरा त्याचा मित्र… दोघांनाही एकमेकांची साथ द्यायची आहे, पण मनात गोंधळ सुरु आहे, कुणी कुणाला बोलून दाखवत नाहीये … हे त्यांच्या मनातले गोंधळ
----
तुझ्या ध्येयामागे तू एवढा वेद झालायस कि आधीसारखा राहिलाच नाहीस तू … तू आधीचा …. खरच आधीच्या "तू" मध्ये अस काय होतं जे आताच्या तुझ्यात नाही ? निरर्थक गोष्टींमध्ये गुंतलेला तू …. स्वप्नांकडे जाताना नक्की कुठे चाललायस तू ?
खर तर जेव्हा मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतोय तेंव्हाच स्वतःला शोधतोय…. आधीचा मी आणि आत्ताचा मी … कोण आहे मी … अशावेळी मला सर्वात जास्त गरज आहे ती माझ्या माणसांची , मित्रांची , घराची , कुटुंबियांची … स्वतःला शोधताना जगापासून लांब जावच लागतं का ?
हे स्वतःला शोधण म्हणजे नक्की तरी काय ? स्वतःला नवीन नजरेने पाहणं कि जगाला ?
भरारी घेताना दिसत असत उत्तुंग आकाश पण जमिनीवरची नजर कधी हटत नाही ! जर एखादा अशी उंच भरारी घेत असेल तर आपण त्याला साथ द्यायची , सांभाळून घ्यायचा का ध्येयासक्ति पासून प्रवृत्त करायच?
या नवीन "तू " ला समजून घेण्यासाठी , त्याच्या ध्येयांना, स्वप्नांना समजून घ्याव लागेल… त्याच्या स्वप्नांना त्याच्या नजरेने पहाव लागेल !
--
कधी आपण "तू" असतो तर कधी "तू" चा मित्र !
No comments:
Post a Comment