Sunday, July 17, 2016

कुरुक्षेत्र ते धर्मक्षेत्र

आयुष्यभर जी काही कर्म आपण करू त्याचा हिशेब चित्रगुप्ताच्या दरबारी  द्यावा लागतो असं म्हणतात .. कुणीतरी याच्यावर विचार केला आणि युग-युगांपासून  सांगितली जाणारी महाभारताची गोष्ट आणि त्याची पात्रे - ही लोक चित्रगुप्तासमोर काय बोलतील ? त्यांनी जे काही केल , ते का ? कसं ? अशी सगळी उत्तरं देतील का ? त्या क्षणी त्यांच्या मनात नक्की काय चालू होतं ? असे हजारो प्रश्न आपल्या मनातले .... आणि त्यांची उत्तरे !

मला महाभारत बघायला अगदी लहानपणापासून आवडतं .... कदाचित बाबांमुळे .... ते मनापासून महाभारत बघतात... आम्ही ते जुनं महाभारत (बी आर चोप्रा ) इतके वेळा बघितलंय की काही सीडी खराब होऊन गेल्या !
गीता आणि आजूबाजूचे भाग तर पाठ व्हायचेच राहीलेत....  कुरुक्षेत्र आणि त्या निगडित साऱ्या घटना फार सुंदर दाखवलेल्या
आहेत ..

आता पुन्हा वळूया धर्मक्षेत्रा कडे ... Netflix वर ही series आहे .... Its such a wonderful concept.. प्रत्येक पात्र आणि ते माणूस म्हणून , आई म्हणून , भाऊ म्हणून , बायको म्हणून , मित्र म्हणून , काका म्हणून आणि अशी अगणित नाती निभावताना त्याने काय योग्य केला काय अयोग्य केला .... याच विश्लेषण .. चर्चा ..... जे आरोप इथे त्यांना एकमेकांवर लावता आले नाहीत ... ते सुद्धा लावले गेले ....   कधीही न व्यक्त केलेल्या भावना ... न ढाळलेले अश्रू .... सर्वात महत्वाच चित्रगुप्ताचे भावना नाही तर तथ्यांवर चा विश्वास !


एक एक पात्र ,  म्हणून  येत ... द्यूतक्रीडेचा विषय आल्यावर प्रत्येकाच्या त्याबद्दलच्या भावना आणि राग दिसून येतो ... शेवटी  स्वतः कृष्ण समोर येतो त्यावेळी खोपा गोष्टींचा खुलासा होतो.. व्यास आणि त्यांनी  लिहिले ? किंवा विदुराची द्विधा मनस्थिती .... भीष्मांची प्रतिज्ञा आणि असहायता

कुंती आणि कर्णाचा संवाद ... भीम आणि दुर्योधनाची भांडणे .. Its nicely captured.. Well written .. Very focused





1 comment:

  1. Lucky Club Casino Site Review 2021 | Lucky Club
    Welcome to the Lucky Club luckyclub Casino site and welcome you to an unforgettable experience like never before! Lucky Club offers a wide range of casino games and live  Rating: 7.8/10 · ‎Review by Lucky Club · ‎Price range: from Rp.

    ReplyDelete