वासंसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्य न्यानि संयाति नवानि देही।
गीता , अध्याय २ रा श्लोक २२
सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे
मनुष्य घेतो दुसरी नवीन
तशीच टाकुनी जुनी शरीरे
आत्मा हो घेतो दुसरी निराळी
गीताई , अध्याय दुसरा , श्लोक २२
----
गीतेतल्या या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आत्मा अमर आहे , तो फक्त शरीरे बदलतो , त्याप्रमाणे इथे कुणालाही मरण नाही …
याच आठवड्यात मी आईसोबत "चापि " नावाचा सिनेमा बघितला … ह्या सिनेमात देव पटेल एक थिंकिंग रोबॉट (चापि ) बनवतो … A robot with consciousness.. अगदी लहान मुलासारखा , तो सर्व काही शिकत असतो … हा चापि खरा तर एका माणसासारखाच असतो फक्त त्याच शरीर हे धातूचा बनलेल आहे …
अमर , ज्याला अंत नाही असा तो चापि ! कारण एखादा शरीरच भाग बिघडला तरी तो पुन्हा पुन्हा दुरुस्त करता येऊ शकतो …. त्याला भावना आहेत , तो चांगल्या वाईटाचा विचार करू शकतो … त्याचा हात तुटतो तेव्हा त्याला दुखत नाही पण त्याला भावना आहेत त्यामुळे त्याला रडू येतं … त्याला त्याचे आई बाबा आणि त्याचा निर्माता ह्यांच्याबद्दल असलेल्या भावना … त्याच एका लहान मुलासारखा भाव विश्व …
खूप विचार करायला लावतं …. गीतेत सांगितल्यासारखं अमर आत्मा आणि बदलणारी शरीरं …
देव पटेल , ह्या चापिचा निर्माता देव पटेल , consciousness.dat नावाची file compile करतो आणि ती एका रोबोट मध्ये टाकतो … आणि स्वताचाही consciousness एका दुसर्या रोबोट मध्ये टाकतो , जरीही त्याचा मृत्यू झाला तरीही तो आहे , एका रोबोट च्या शरीरात का होईना तो आहे …. त्याचा अस्तित्व कायम आहे !
बापरे …. आत्मा शरीरे बदलतात यावर विश्वास ठेवणं आणि जेव्हा खरोखर तसा काही (सिनेमात का होईना )
डोळ्यासमोर आल कि जे वाटत ते खूप खूप वेगळा आहे !
That may be the reason to follow this principle:
ReplyDeleteकर्मणयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।
Check this : http://www.spiritscienceandmetaphysics.com/harvard-neurosurgeon-confirms-the-afterlife-exists/
ReplyDelete