Sunday, March 1, 2015

आज एक कोडं ऐकलं ,

"किस चिड़ियाकेँ सरपर पैर होते है ?"  … (KD)

आणि मग माझ्यासारखी माणसं विचार करतात कि कोणती  हि चिमणी ? पण खर उत्तर  तर आहे 

"सब चिड़ियाँ के सर , पर और पैर होते है "!! .......(KD)

खरच छोट्याश्या या प्रश्नाला केवढ अवघड करून टाकलं ! साध्या साध्या गोष्टींना कसा आणि किती अवघड बनवता येईल यात तर PHD मिळवता येईल एवढा काम केलेलं असतं आपण !


फार चिकित्सक वृत्तीने पाहिलं , कि कधी कधी सगळा स्वच्छ नाही दिसत , एखाद्या छोट्या गोष्टीत गुंतून जाऊन डोळ्यासमोर असलेली एवढी मोठी गोष्ट दिसेनाशी होते … पूर्ण वाक्यावर लक्ष दिलं असतं , तर लगेच कळलं असतं  ….  पण आपण generally  जी गोष्ट आवडत नाही किंवा खटकते त्यावर सगळ लक्ष केंद्रित करणार तर मग जस आहे तस कस काय दिसणार ?

अगदी नवीन लोकांबद्दल मत बनवताना सुद्धा असंच , जी गोष्ट आवडत नाही किंवा खटकते त्यावरच कशाला 
सगळा focus ? कदाचित तो गोष्ट सोडून १०० अजून चांगल्या गोष्टी असतील त्या माणसात !


प्रत्येक जण माझ्या ऑफिसमध्ये काय वाईट आहे यावर चर्चा करणार , अर्रे पण कदाचित ४ वाईट  गोष्टींबरोबर  ४००चांगल्या गोष्टी सुद्धा असतील , त्याच काय ?

आता यात मी काही नवीन सांगतीये का ? तर अजिबात नाही … शब्दांमधे किंवा स्वतःच्याच मतांमध्ये अडकून बघत राहिलं तर सगळ आहे तस दिसणं अवघड आहे , नाही का ?

-----------------------------


No comments:

Post a Comment