भकास !
आज खरच भकास / उदास शहर म्हणजे काय मी आज पहिल ! बापरे त्या जुन्या भिंती , रिकामे रस्ते , जागा दिसेल तिथे केलेली ग्राफिटी , कचरा आणि चहूकडे पसरलेली उदासीनता !
कितीतरी अर्धवट पडलेल्या इमारती , फुटलेल्या काचा , मला माहित नाही कि हे शहर त्याच्या चांगल्या काळात कस होत? पण आत्ता मात्र अगदी न बघावाणारी स्थिती आहे ,
अशाच एका इमारतीच मनोगत
-------
हो मीच बोलतीये … खर तर आता बोलायला काही उरल नाहीये आणि त्यापेक्षाही आता माझं ऐकायला कुणी उरला नाहीये … कुण्या एके काळी लोकं मला ओळखायची … माझ्या आसपास गर्दी असायची …. कित्येकांची स्वप्न , कुटुंब , आशा - निराशा माझ्याशी जोडलेल्या होत्या ! इथेच बघून कुणी निराशेच्या वादळातून सावरल … कुणी त्यात वाहत जाउन स्वतःला हरवलं …. कुणी उंच उंच आकाशात झेप घेतली तर कुणी त्याच उंचीवरून उडी मारून सर्वस्व गमावलं !
पण आज इथे कुणीच नाही , माझ्याशी बोलायला , त्यांच्या व्यथा सांगायला , त्यांची सुखं - दुःखं मांडायला …
माझा अस्तित्वच जणू नकोस झालाय सगळ्यांना … समोरच्या इमारतीच्या आरशात स्वतःला बघण्याच सुख सुद्धा नाही माझ्या नशिबी आता … तीही बिचारी अगदीच कोलमडली आहे …
माझीही काही स्वप्न असतील ना? मलाही कित्येकांना मोठ होताना बघायचा होत , आकाशात उंच उडताना पहायच होत … पण सगळ सगळ संपल!
आता आहे मी आणि माझा एकटेपणा … आणि वाट बघतोय आम्ही …
-----
Detroit downtown
Bhari lihlyes...
ReplyDelete