Sunday, July 15, 2012

Journey



आज मी खूप साधी गोष्ट लिहिणार आहे..
जी मी अनुभवली आहे..या आठवड्यात मी नवीन फोन घेतला..Finally!! २ वर्ष ज्या गोष्टीसाठी थांबले होते ती झाली..
सुरुवातीला जेव्हा इथे आले तेव्हा लगेच चांगला फोन नाही घेतला आणि मग कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे २१ महिन्यांनी मला नवीन फोन मिळाला..

मी हे २१ महिने संपण्याची अगदी मनापसून वाट बघत होते..जेव्हा मी हा फोन घेतला तेव्हा मला समजलं
It is not about your destination, it is about the journey!!

I know a lot has been said/written about this Journey..But trust me, one won't understand the journey unless
one experiences it..हे मिळालं कि माझ्या आयुष्यात "stability" येईल..या गोष्टी झाल्या कि मी आनंदी असेन..
मी कित्येक वेळा म्हणायचे, नवीन फोन मिळाला कि मी असं करेन आणि हे APP वापरेन..पण नवीन फोन मिळेपर्यंत चा काळ,
हे २१ महिने..त्याचं काय ? आज कळतंय कि ते ही तेवढेच महत्वाचे होते..ते ही मी तेवढेच आनंदाने काढले..
खरच नवीन फोन मिळाला म्हणून काही आयुष्य बदलत नाही,व्यक्ती म्हणून मी बदलत नाही , तसंच आहे बाकी सगळ्या गोष्टींचं सुद्धा..
ध्येय पूर्ण झालं म्हणजेच आनंद मिळेल असं नाहीये..तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी कदाचित माहित असतील
पण मी मात्र अनुभवातून शिकणाऱ्यापैकी  एक आहे..जर मी आज आनंदी नसेन तर मी अमुक एक गोष्ट पूर्ण झाल्यावर
आनंदी असेनच अशी guarantee आहे का ?


जास्त नाही लिहिणार फक्त एवढाच म्हणायचं आहे
It is not the destination!! It is the journey!!

No comments:

Post a Comment