एवढ्यात मी एका ठिकाणी हे ऐकलं अंधाराबद्दल आणि त्यावरून जे सुचलं ते लिहित आहे..
भरून आलेलं आभाळ..मिट्ट काळोख..
भरलेले डोळे आणि त्याहूनही जास्त मन..
या अंधारात सावली देणारं झाड काळ
आणि त्या पडलेल्या सावल्याही काळ्याच..
मनातल्या पडद्यावरची स्वप्नं सुद्धा काळी
आणि त्यावर पडणारा पडदा सुद्धा काळाच
अंधारलेल्या या क्षणी स्वच्छ काही काही दिसत नाही
काळ्या कुट्ट अंधारात आरसा सुद्धा खरं बोलत नाही..
ओथंबून वाहणाऱ्या भावना सुद्धा गडद व्हायला लागतात..
आणि कदाचित त्यासोबत वाहत जाणारा सुद्धा..
No comments:
Post a Comment