या अवेळी आलेल्या पावसात भिजून चिंब मी
या हिरव्यागार झाडाखाली अशी उभी चिंब मी
ओल्या ओल्या गार वाऱ्यावर झोकून देऊन चिंब मी
हिरव्या हिरव्या पानांची सळसळ आणि चिंब मी
मातीचा हा दरवळणारा सुंगध अनुभवत चिंब मी
वेळेचं भान कधीच हरवून गेलेली चिंब मी
अजून थोडं भिजावं...पावसात भटकावं...
एकटच फिरावं..विचारांमध्ये रमाव...
हळूच हसावं थोडसं..आपल्याच जगात हरवावं..
चहा-भजी खावीत..जुनी गाणी ऐकावीत..
कोण जाणे हा पाउस..हि वेळ..हा सुगंध ..
आणि हि अशी मी..पुन्हा कधी एकत्र येतील..
Waaah!
ReplyDelete