Traveler , A journey from Indian classical music to Spanish flamenco!! Enchanting !! मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय याचा खूप खूप दिवसांनी अनुभव आला..भैरवी पासून झालेली सुरुवात वेगळ्याच उंचीवर पोचलेलं मध्यांतर..आणि परत त्याच उंचीवरून सगळ्या अपेक्षांपेक्षा खूप पलीकडे संपलेला कार्यक्रम...आजची संध्याकाळ खरंच अविस्मरणीय आहे..अजूनही डोक्यात तीच धून आहे..तेच ताल आहेत..बऱ्याच दिवसांनी अशी छान सतार ऐकायला मिळाली..पखवाज , spanish आलाप, ड्रम्स, गिटार आणि मंतरलेली संध्याकाळ...अशा लोकांना बघून कळत कि effortless performance काय असतो ते..उस्ताद उस्मान खा एकदा म्हणाले होते, सतारीसोबत एक नातं जुळायला हवं गायत्री...आज जेव्हा भानावर आले तेव्हा त्याचा अर्थ कळला...अशा कार्यक्रमांचा सगळ्यात मोठा वैशिष्ट्य असं असतं कि अर्थ तुम्ही काढायचा असतो..तुम्हाला त्या रचनेचे नाव सुद्धा माहित नसतं..त्यावर तुम्ही विचार करता..तुमच्या मनातले अर्थ लावता..काही गोष्टी लिहिता येत नाहीत आणि वाचून समजत नाहीत, त्या अनुभवायलाच हव्या..त्यातलीच हि एक..मी अनुष्का शंकरान्बद्दल काय बोलणार किंवा लिहिणार..मी इथे फक्त मला काय वाटला त्यातलं थोडसं लिहिणार आहे..
एक रचना सादर होत होती..तेव्हाचे माझ्या मनातले काही विचार..
हो..आज..आत्ताच..मनातलं सगळं संचित उधळून मुक्तपणे नाचणारी ती..
एक काळा पडदा..तिच्यावरचा तो spot light..
तिचं बेधुंद होऊन नाचणं बघायला कोणी नाही..
तिच्या घुन्गरूंचा तो आवाज..ऐकायला फक्त तीच..
मनातल्या सगळ्या भावनांचा तो खेळ..
हे आयुष्य माझं आहे..यातला प्रत्येक क्षण..
आता हळूहळू त्यातल्या व्यक्ती, अनुभव बाजूला जात आहेत..
आयुष्यातली ध्येयं..चुका..विजय..पराभव..सगळं सगळं..
भूत आणि भविष्याच्या मध्ये फक्त ती..
तिच्यासाठीच ती..आणि घुंगरू..सतार..
त्या तालासोबत एकरूप झालेली ती..तिचं मन..
आसमंतात भरून राहिलेला तो आवाज..
मनातल्या सगळ्या अव्यक्ताची एक अभिव्यक्ती..
त्या प्रत्येक क्षणातला आनंद..
ती जुगलबंदी..कुणी बघेल..काही म्हणेल..
या सगळ्याच्या पलीकडे असलेली ती..
काळ-वेळ सगळ्याच्या पलीकडे..फक्त स्वतसाठीच आज..
आत्ता..."मी"...तिच्यातला स्वाभिमान..जिद्द..
स्वप्नं..इच्छा..आकांक्षा..
आज सगळं थांबलंय फक्त तिच्यासाठी..
--------------------------------------------------------------------
हि रचना ऐकली आणि घरी येऊन त्याचं नाव पाहिलं,
"Dancing in Madness"
---------------------------------------------------------------------
Please do checkout her latest album.The tunes are also available on her official website..
No comments:
Post a Comment