Sunday, July 3, 2011

शिरुरे कुलावृतांत!

                   मला माझा आडनाव खरच खूप आवडतं.. काय छान वाटतं म्हणताना.. " शिरुरे"  अगदी वेगळं आणि मस्त वाटतं..In Barney's language, "It is awsome!! I love it!!"So this one is especially for all the shirures over there..
                  जेवढं भारी आडनाव आहे तेवढाच मोठा इतिहास सुद्धा आहे..शिरूर अनंतपाळ नावाच्या छोट्याश्या गावामुळे आम्हाला हे आडनाव पडलं..आता ते गाव सोडून सुद्धा सात पिढ्या झाल्या..पण तिथे अजूनही एक मोठा वाडा आहे शिरुरेंचा.. पडलाय आता तो..पण खरच खूप सुंदर वाडा होता तो असा म्हणतात..खरं तर शिरुर अनंतपाळ चे खूप शिरुरे आहेत आणि मला फक्त मागच्या सातच पिढ्यानबद्दल  माहित आहे..त्यामुळे जेवढी मला माहिती आहे ती पूर्ण नक्कीच नाहीये..
                 शाळेत असताना कुलावृतांत लिहिला होता, त्यामुळेच का होईना, सात पिढ्यान्पासुनाचे  कोण आणि कुठे आहेत याची माहिती झाली..छान वाटला होतं..खरं तर आत्ताच्या काळात इतकं जुनं सगळं मिळणं कठीण आहे, पण सात पिढ्यांपासून शिरुरे खानदानीत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आज आमच्याकडे आहे..तेंवा आजोबा होते सगळा इतिहास सांगायला..रंगनाथ अण्णा होते गोष्टी रंगवून सांगायला..ज्यांना जे काही माहित होतं त्यांनी ते सगळं सांगितलं..तेंवा जुन्या लग्नाच्या पत्रिका आणि फोटो पाहायला मिळाले..सगळ्यांचा मदतीनेच तो कुलवृतांत  पूर्ण झाला..आपण शिरूर  अनंतपाळ का सोडलं? शिरूर अनंतपाळचे सगळे शिरुरे आपल्याच परिवारातले आहेत काय?? आपण गुढीपाडवा का साजरा नाही करत, दर्ग्यात झेंडे घेऊन का जातात?? मलिदा का खातात?? सात पिढ्यांपूर्वी आपले पूर्वज उपाशी राहिले म्हणून आपण हे सगळं करतो हे तर माहित होतं, पण त्यांना सणाच्या दिवशी ज्या लोकांनी मदत केली, आज अजूनही आपण सण  त्यांच्यासोबत साजरा करायचा हि कल्पना अगदी मनापासून पटली...मला मनापासून अभिमान आहे कि माझ्या कुटुंबाचा इतिहास इतका मोठा आहे..सगळ्या गोष्टी आमच्या घरी कारण समजावून घेऊन करतो आम्ही, गुढीपाडव्याच्या दिवशी मलिदा खाणं, किंवा आमचं कुलदैवत ते का आहे, किंवा आपल्याकडे असेच सण का साजरे होतात ? सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तर मिळत गेली..
      जर तुमच्यापैकी कोणी "शिरुरे" मला सात पिढ्यांच्या मागे जायला किंवा आपली मुळ शोधायला मदत करू शकत असेल तर खरच नक्की करा..

1 comment:

  1. शिरुर अनंतपाळ बद्दल वाचुन खुप धान वाटल. आजुन गावात खुप सारे शिरुरे आहेत. जर गावाच्या ईतिहासाबद्दल व त्या काळच्या गोष्टीबद्दल लिहीले तर खुप आवडेल.

    ReplyDelete