Sunday, July 17, 2011

पंढरीसी जा जा कुणी..

चंद्रभागेचे वाळवंट दुसरे नकोच वैकुंठ..
माधव भरला आकंठ हासून नाचून..
मनात भरली पंढरी जाऊन यावे दरबारी.. 
विठलाच्या मंदिरी हासून नाचून..

काय मस्त वाटतं असे अभंग ऐकून!! मागच्याच आठवड्यात आषाढी एकादशी झाली..
खरं तर मी कधीच आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले नाही, कारण आषाढी एकादशी आणि पंढरपूर याच्याशी माझ्या वेगळ्याच आठवणी जोडलेल्या आहेत!! बाबा प्रदूषण नियंत्रण मंडळात आणि त्यातून सोलापूर जिल्ह्यात बरीच वर्ष होते, त्यामुळे त्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला असावाच लागायचं..त्यामुळे मी आषाढी एकादशीचं पंढरपूर प्रदूषणाच्या नजरेतून पाहिलंय!! :););)

ते काहीही असो, मला खरच छान वाटतं ते सगळे कार्यक्रम टीवीवर बघायला, रिंगण, घोडे, हलणारा कळस, वारकरी, त्यांचा उत्साह..बघायला एकदम छान वाटतं..

खरंच अजूनही दर वर्षी नित्य नेमाने वारीला जाणारे लोक आहेत महाराष्ट्रात..शाळेत असताना वारीसोबत सुद्धा जाऊन झालं..वेगळाच अनुभव होता तो..

सगळ्यात महत्वाचं अभंग!!मला अभंग म्हणायला आणि ऐकायला फार आवडतात!!
एकदा सुरु झाले कि एकानंतर एक सुचतच जातात, आत्ता काही डोक्यात येत आहेत ते इथे लिहिते.. 

धरीला पंढरीचा चोर..
पैल आले हरी शंख चक्र शोभे करी..
कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी..
हरिभजनावीण काळ घालवू नको रे..
माझे माहेर पंढरी..
अबीर गुलाल अबीर गुलाल..
पंढरीसी जा जा कुणी..
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..

हि तर खरंच खूप मोठी यादी होईल..
काय सुंदर चाली आहेत या..माझं गुणागुणन थांबणारच नाहीये आता!!












No comments:

Post a Comment