मागच्या आठवड्यात bloomington ला जाऊन आले. खूप खूप मज्जा केली..One of the best weekends in US. गेल्या गेल्याच इतकं छान वाटलं..अगदी घरी गेल्यासारखं!! मी तर त्या दोघांना बघूनच खूप खूष झाले होते..
मग घरी जाऊन मस्त जेवण केलं!! खूप खूप गप्पा मारल्या!!
शनिवार आणि रविवारी तर आम्ही इतके picture बघितले!! Movie marathon almost!! अगदी nonsense comedy पासून ते 2012 , मी नथुराम गोडसे बोलतोय अशा serious नाटकांपर्यंत!! अमेरिकेवर झालेल्या ११ सप्टेंबर च्या हल्ल्याच्या documentaries पासून तर "जानकी लावण जासूस "..पण महत्वाची गोष्ट अशी कि या सगळ्या गोष्टींवर आम्ही भरपूर चर्चा केली...त्यातून आपली match सुद्धा होती..काय वाईट हरलो..शेवटची ओवर तर बघू सुद्धा नये अशी होती..सचिन ने एवढे जास्त runs करून पण काही उपयोग नाही झाला..
लहानपणीच्या आठवणींबद्दल बोलताना तर किती वेळ गेला कळलं पण नाही..तस बघितल तर जिजूंशी ओळख पहिल्यांदाच झाली.. लग्नात काय ओळख होणार कोणाची!! जीजून्सोबत बोलताना बर्याच बऱ्याच गोष्टिन्वर नव्याने विचार झाला..अशा अनुभवी लोकांसोबत वेल घालवला की गोष्टींचे नवीन पैलू दिसतात..सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, इथे आपल्यासोबत कोणीतरी आहे ही भावना पण खूप वेगळी अणि छान असते..
३ तासांचा (flight) अंतर म्हणजे फार काही नाही हे सुद्धा जाणवते..
तिथे गेल्यावर एक कळलं, कि कितीही सुखसोयी असल्या इथे तरी परत जावसं वाटतच..ते दोघं इथं ३ - ४ वर्षांपासून राहत आहेत. इथे सगळं असूनही परत जायची ओढ आहे त्यांना..आता यात मी काही फार वेगळा विचार मांडत आहे अशातला भाग नाही..
No comments:
Post a Comment