Sunday, March 20, 2011

एक ऊनाड दिवस..

               मला कधी कधी कळतच नाही की चांगले मराठी चित्रपट माझे कसे काय बघायचे राहतात?? मुंबई पुणे मुंबई असो किंवा सावरखेड: एक गाव..सरीवर सर असो किंवा सातच्या आत घरात..आता त्यात भर पडली आहे या चित्रपटाची..एक उनाड दिवस!!
            आज मी फार छान picture बघितला..एक उनाड दिवस..खर तर उशीराच बघितला, पण atleast बघून तरी झाला..अशोक सरफान्नी फार मस्त काम केलय यात..दाभोळकर अगदी जीवंत उभे केलेत.. तसा पाहिल तर दाभोळकर आपल्या सगळ्यासारखेच..घडयाळ्याच्या काट्याला बांधलेले.. स्वताच्या नियमंमधे स्वताच अडकलेले..
             योगायोगाने त्यांना एक दिवस मिळतो , मुखवटा बाजूला ठेवून जगण्याचा..लोक काय म्हणतील याचा विचार न करण्याचा..कधीही न केलेल्या गोष्टी करण्याचा..सामान्य माणसाच आयुष्य जगण्याचा..एक दिवस ऊनाडपणे हुन्डडण्याचा..
          ही फक्त त्या एक दिवसाची गोष्ट..त्या एका दिवसात दाभोळकरांच्या आयुष्यात किती मोठे बदल होतात..ते किती वेगावेगाल्या व्यक्तिंना भेटतात..पैसे कमी असून सुद्धा अगदी आनंदी माणस बघतात..आयुष्य १५ वर्षांनी वाढवतात!!
         मी बराच वेळ विचार करत होते, खरच आपण काय करतोय? आयुष्य चांगल घालवण्यासाठी आयुष्य जगायला विसारतोय..आपल्यातल्या दाभोळकरांना एक ऊनाड दिवस देऊन तर बघुया..एक दिवस ऊनाडपणे फिरून तर बघुया..बघुया आयुष्य वाढतय का?? आयुष्य वाढण्याच माहित नाही, पण उरलेल आयुष्य जगण्याचा नवीन दृष्टिकोण मात्र नक्की मिळेल..
        याच चित्रपटात एक छान गाण आहे..त्याबद्दल काही बोलण्यापेक्षा, ते गाणच इथे लिहिते..
        
        हुरहुर असते तीच  उरी.. दिवस बरा की रात्र बरी...
        कुठला रस्ता सांग खरा.. वळणाचा की सरळ बरा..
        जगणे मरणे काय बरे.. सुख खरे की दुख खरे..

No comments:

Post a Comment