Sunday, November 22, 2015

वादळ !

गेले कित्येक तास मी वादळ अनुभवतीये … न शमणारं …. न संपणारं …. जणू निसर्गाच्या सामंजस्याचा फुटलेला बांध !
जणू काही त्याच्या असह्य वेदनांना फुटलेला कंठ …. अखंड थयथयाट … तप नु तपे जपलेल्या , शमवलेल्या भावनांना मोकळं करून दिलेलं रान … त्याचे हि प्रश्न असतील कदाचित …. काही अनुत्तरीत ! त्याचीची होत असेल घुसमट …. न सुटणाऱ्या प्रश्नांनी आणि नव नवीन आव्हानांनी …. कितीही मोठं असलं तरी त्याचही मन आहे …. दुखावलं जाणारं … त्याचं सुद्धा काळीज आहे … चिरत जाणार…. सुकले असतील त्याचे ही अश्रू ….आणि म्हणूनच हे तांडव …. न संपणारं !!

Sunday, November 15, 2015

The sine wave

Yes the sine wave. I recently had an interesting discussion with a colleague on the nature of one of our projects. We are experiencing frequent highs and lows and are caught up in the drama of the sine wave. We both agreed on this but decided to take it a level above.

Instead of getting into the drama of highs and lows, why not be the central axis and limit the drama!
And thats where it occurred to me , this is true every where...

Generally the experiences we have are like sine waves , the frequency might vary but its never low forever and never high forever. The whole struggling piece comes from sliding on the curves through highs and lows...Just imagine being at the central axis and looking at the curves! It will be amusing!

Wow its so easy to write but when I think about it , it is extremely difficult to follow! 

Sunday, October 25, 2015

The Pie is fixed!! ??

Yes , The Fixed Pie thinking. Its so easy to get into a trap of fixed pie thinking. We want something and we believe its limited and if someone gets some share of it, we get the rest!

Well we all are stuck in the fixed pie thinking all the time and forget the abundance life has to offer!
Just imagine for a moment , just not getting a limited share, more than that just not having any pie!

Although we all know about the concept and claim that we are inline , most of the time its not applied...



(PS : I have had enough debates on the existence of fixed pie and getting our share, I haven't managed to convinced people yet :( )

Sunday, July 26, 2015


या आठवड्यात मी फ्लाईट मध्ये "अमेरिकन निन्जा वॉरियर " नावाची सिरीज बघत होते … त्यात काही अवघड stunts करायचे असतात आणि जो कोणी ते सगळे पूर्ण करेल तो ANW (American Ninja Warrior)
बनतो . त्यात एक stunt आहे कि एका फळीवर एक कापड लटकलेल असत … ती फळी एक २० फुटांवर असेल जमिनीपासून …. ते कापड दोन्ही बाजूंनी लटकत असत …आता त्या कापडावर लोंबकळत पुढे यायच आणि मग खाली उडी मारायची …. खूप लोकांना जमला नाही हे … कापडावर लोम्बालात सगळे पुढे आले त्यापुढे किनालाही जाता येईना … मग एकाने ते पार केला ! आणि त्याने बाकीच्यांपेक्षा एकाच गोष्ट वेगळी केली होती … त्याने उडी मारताना दोन्ही हात सोडले ! मग माझ्या डोक्यात सुरु झाल नेहमीच विचार चक्र  !


एखादी गोष्ट आपण जर पूर्णपणे झोकून देऊन केली नाही तर ती नीट  होताच नाही ! आपण आपलं उडी मारताना एक हात त्या कापडाला धरून आणि दुसरा सोडतो पण अस एक हात सोडून काही काही होणार नाहीये :) दोन्ही हात सोडणं महत्वाच ! ते म्हणतात ना किनारा नजरेसमोर ठेवून कधीच नवीन खंड सापडत नाहीत … तसच आहे हे… 

I always want to take a leap into unknown keeping my eye on the known! Well thats playing safe.  It might take me somewhere but may be not where I want to be! 

--

म्हणायला तर मी एकदम विश्वास ठेऊन उडी मारत आहे पण एका हाताने मी माझ्या वर्तमानाला घट्ट धरला आहे ! अशाने नाही तर वर्तमान नाही तर भविष्य !

:) काय फिलोसोफिकल झालय हे  !

----

जाऊ देत साध्या सोप्या भाषेत , जोपर्यंत संपूर्ण विश्वास ठेवून झोकून देत नाही तोपर्यंत काहीही करणं शक्य नाही … एक हात इथे , एक हात तिथे केल तर राहणार लटकत !!







Sunday, July 12, 2015

आजचा भविष्य !

भविष्य जाणून घ्यायला आपल्या सगळ्यानाच आवडेल ना ! आज माझ्या आयुष्यात नक्की काय होणार , या आठवड्यात काय होणार , या महिन्यात काय होणार , या वर्षात ! काय मज येईल … कधी काही surprises अन unknowns चा कंटाळा येतो !

मग राशीफळ वगैरे बघणं सुरु करतात सगळे …. कधी काम करू नये कारण शनि असतो , कधी मंगळ तरी कधी अजून कोणी ….


माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे कि नाही हा मुद्दा नाहीये , पण हे ग्रह तारे वर बसून आपल्या वायटावर उठतील असं काही मला वाटत नाही …. काही गोष्टी काही वेळी करू नयेत हे ठीक आहे पण रोजच आपल्या मागे कोणी कोणी सुद्धा लागत नाही …

आजच बघितला एकाने लिहिला होतं … "The stars and planets will not affect your life in any way! "

अर्रेच्च्चा हे तर सगळ्यात उत्तम भविष्य झाल! म्हणजे थोडक्यात आज तुम्ही जे काही कराल त्याव्ह्या निकालावर कोणत्याही घरह किंवा तार्याचा परिणाम नाही !! म्हणजे तुमची मेहनत आणि त्याचं फळ !


चला म्हणजे आजचा दिवस उत्तम आहे! काळजी करण्याचे काही एक कारण नाही !

Sunday, June 28, 2015

The logic behind Hope

I keep getting myself into trouble with sch discussions, especially with people who are very very logical!

This week, once again I found myself arguing about being logical and being emotional!

So here I start again, this time I stuck to one point. The logical factor behind hope!

How is hope logical. One needs hope to go on, in dark situations. One needs hope when one has been walking in the dark tunnel for a long time. Unless there is no hope, you cannot continue.. And the "hope" isn't really a logical thing. Its more of an assurance that there is still a chance. I can still manage to survive the storm..
Being hopeful might not be very easy. But who wants easy all the time?

So after my speech, the other person responded

No, in order to survive difficult situation, you need to logically define a way to come out of it. You need to have faith in yourself , you need to be able to think straight and remove the emotional factor out of it.

Well this isn't wrong , but we are emotional species. So how do we remove the emotional factor.


Aren't we saying the same thing! Logic is not equal to emotion isnt true always. You can be "logically emotional" or "emotionally logical"!

Anyways , we will continue fighting again when we meet next time. :)



Sunday, June 14, 2015

मागच्या आठवड्यात मेक्सिको ला गेले होते… आणि माझ्या खूप जवळच्या मित्रांना भेटले … कार्लोस आणि औरोरा … आम्ही तिघ वर्षभरा नंतर भेटलो आणि यावेळी मेक्सिको मध्ये ! खूप खूप मस्त वाटत होतं ….

कार्लोस च्या आजी -  आजोबांना भेटले , त्यांची भाषा मला समाजात नाही आणि माझी त्यांना ! पण ज्या आपुलकीने आणि प्रेमाने ते माझ्याशी बोलत होते, त्यामुळे भाषा खूप महत्वाची वाटलीच नाही …. कदाचित त्यांनी बोललेले शब्द कळत नव्हते पण त्यांना काय म्हणायचं हे समजत होतं !!

खरच  एवढ प्रेमाने बोलत होते कि काही न कऴता सुद्धा त्यांच्याशी बोलावसं वाटत होत , त्यांच ऐकावस वाटत होतं … लिहिता येणार नाही नीट पण सुंदर अनुभव होता !