Sunday, June 14, 2015

मागच्या आठवड्यात मेक्सिको ला गेले होते… आणि माझ्या खूप जवळच्या मित्रांना भेटले … कार्लोस आणि औरोरा … आम्ही तिघ वर्षभरा नंतर भेटलो आणि यावेळी मेक्सिको मध्ये ! खूप खूप मस्त वाटत होतं ….

कार्लोस च्या आजी -  आजोबांना भेटले , त्यांची भाषा मला समाजात नाही आणि माझी त्यांना ! पण ज्या आपुलकीने आणि प्रेमाने ते माझ्याशी बोलत होते, त्यामुळे भाषा खूप महत्वाची वाटलीच नाही …. कदाचित त्यांनी बोललेले शब्द कळत नव्हते पण त्यांना काय म्हणायचं हे समजत होतं !!

खरच  एवढ प्रेमाने बोलत होते कि काही न कऴता सुद्धा त्यांच्याशी बोलावसं वाटत होत , त्यांच ऐकावस वाटत होतं … लिहिता येणार नाही नीट पण सुंदर अनुभव होता !


No comments:

Post a Comment