Sunday, February 23, 2014

हीरा

हीरा

highway चित्रपटात एक खूप सुंदर कबिरांचा दोहा  वापरलाय… प्रचंड philosophy अगदी थोडक्यात सांगणारा दोहा आहे हा !
पहिली चारोळी सांगते कि हिरा खूप ठोकून ठोकून बनवला जातो  , हि गोष्ट आपण समजून घ्यायला हवी … त्या हिऱ्याचा आदर करायला हवा … तसच  एखादा माणूस आपल्या समोर जेव्हा येतो , तो तसा बनण्यासाठी त्याने कष्ट घेतलेले असतात , आपण त्याचा आदर करायला हवा … दुसर्या दोन ओळींमध्ये अस लिहिल आहे कि कितीही पारखून पहिला तरी हिरा तो हिराच ! खोटेपणा कधीतरी बाहेर येतोच पण ज्या हिर्याने इतका त्रास सोसून आकार घेतला त्यात खोत नाही काढता येत


दुसरी चारोळी :
आपला हिरा भाजीच्या बाजारात मांडून ठेवू नये , भाजीच्या बाजारात असताना तो आपल्या जवळ जपून ठेवावा आणि आपल्या मार्गावर चालत राहावे … किती मस्त अर्थ आहे याला ! आपला शहाणपणा कदर नसलेल्या ठिकाणी स्वतःजवळ ठेवावा आणि आपल्या मार्गावर चालत राहावे , कधी न कधी तरी त्या हिर्याला पारखी भेटणारच !

तिसरी चारोळी :
अशाच एका बाजारात एक हिरा रस्त्यावर पडलेला असतो , अनेक लोक त्या रस्त्यावरून ये - जा करतात पण त्यांच्या लक्षात येत नाही तो हिरा , फक्त ज्याला पारख आहे असाच मनुष्य तो हिरा उचलून घेतो !

त्यामुळे आपल्या कडे कुणी लक्ष देत नसल्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आपल्या कडे योग्य व्यक्तीने  लक्ष देण्याचा  आनंद मोठा नाही का ?

Sunday, February 16, 2014

पहिला उरला नाहीस तू ….

पहिला उरला नाहीस तू …. 

खूप दिवसांनी १०फ मधली हि कविता ऐकली! खरच ध्येयवेड्या माणसाला अस बघायची सवयच आहे आपल्याला… असाच दोन मित्रांची मनोगते , एक ध्येयवेडा आणि दुसरा त्याचा मित्र… दोघांनाही एकमेकांची साथ द्यायची आहे, पण मनात गोंधळ सुरु आहे, कुणी कुणाला बोलून दाखवत नाहीये … हे त्यांच्या मनातले गोंधळ 

----
 

तुझ्या ध्येयामागे तू एवढा वेद झालायस कि आधीसारखा राहिलाच नाहीस तू … तू आधीचा …. खरच आधीच्या "तू" मध्ये अस काय होतं जे आताच्या तुझ्यात नाही ? निरर्थक गोष्टींमध्ये गुंतलेला तू …. स्वप्नांकडे जाताना नक्की कुठे चाललायस तू ?


खर तर जेव्हा मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतोय तेंव्हाच स्वतःला शोधतोय…. आधीचा मी आणि आत्ताचा मी … कोण आहे मी … अशावेळी मला सर्वात जास्त गरज आहे ती माझ्या माणसांची , मित्रांची , घराची , कुटुंबियांची … स्वतःला शोधताना जगापासून लांब जावच लागतं का ?
हे स्वतःला शोधण म्हणजे नक्की तरी काय ? स्वतःला नवीन नजरेने पाहणं कि जगाला ?



भरारी घेताना दिसत असत उत्तुंग आकाश पण जमिनीवरची नजर कधी हटत नाही ! जर एखादा अशी उंच भरारी घेत  असेल तर आपण त्याला साथ द्यायची , सांभाळून घ्यायचा  का ध्येयासक्ति पासून प्रवृत्त करायच? 



या नवीन "तू " ला समजून घेण्यासाठी , त्याच्या ध्येयांना, स्वप्नांना समजून घ्याव लागेल… त्याच्या स्वप्नांना त्याच्या नजरेने पहाव लागेल !

--

कधी आपण "तू" असतो तर कधी "तू" चा मित्र ! 

Sunday, February 9, 2014

पुन्हा एकदा..White Rock Lake..

आजचा white rock lake खूप खूप वेगळा आहे नेहमी पेक्षा … सूर्यास्त झालाय आधीच आणि खूप खूप थंडी आहे त्यामुळे आसपास चिटपाखरू सुद्धा नाहीये…कडाक्याची थंडी , बेभान सुटलेला वारा , त्यामुळे निर्माण झालेल्या त्या पाण्याच्या लाटा , हातात कॉफी चा कप आणि मी !

आवाज नाही कुठलाच , फक्त वार्याचा झंझावात , गाड्यांचा आवाज नाही , माणसांचा गोंधळ नाही , काही काही  नाही….अगदी सामसूम सगळीकडे …पाण्याच्या लाटांचा तो अगदी हळू आवाज … एवढ्या थंडीत पक्षी सुद्धा नाहीयेत आसपास, बदकं  सुद्धा दिसेनात पाण्यात …

खर तर मी प्रचंड कुडकुडतीये इथे , लिहिताना अगदी हात थरथरतायत ! पण तरीही बसावसं वाटतंय इथे , हि शांतता आवडतीये … हा बोचरा वारा अनुभवायचा आहे … काय माहित पुन्हा असा योग कधी येईल ?

एवढा वाहणारा वर असून सुद्धा एक स्तब्धता आहे वातावरणात , ती आवडतीये मला मनापासून ! खर तर अजून पुढे जाउन पाण्याच्या अगदी जवळ बसायच आहे…

खर तर सगळ गोठलाय माझ , विचार सुद्धा बहुतेक ,त्यामुळे फार काही सुचतच नाहीये…

माझ आणि या जागेच अस एक वेगळा नात आहे, इथून दिसणार आकाश मला स्वतःचं वाटतं ! इथली झाडं मला माझी वाटतात… इथे आल्यावर एक छान "familiar" feeling येतं ! आणि मग एकदम "philosophical" type वाटायला लागतं ! मजेशीर असतो  आपण अगदी ! शांत जागा , निसर्ग वगैरे दिसला कि अचानक आयुष्याबद्दल विचार सुरु !! :) :) :) अचानक आयुष्यातले प्रश्न, त्यांची उत्तरं , अनुभव, आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी वगैरे वगैरे ! अस करायला हव मी , तस व्हायला हव वगैरे वगैरे , सगळ तत्वज्ञान कस घडाघडा आठवायला लागत !! एकदम स्फुरण चढत , आपण म्हणजे एकदम भारी वगैरे वगैरे वाटण्याचे chances वाढायला लागतात !

बापरे , माझ्या बाबतीत अस होण्याच्या आधी इथून उठलेल बरं ! कारण हे सगळ वाटणं ठीक आहे , पण एकदा इथून उठल्यावर त्याचा संपूर्णपणे विसर पडणार असतो ! घरी जाउन पुन्हा आपल नेहमीच सुरु!!








Sunday, February 2, 2014

Catching Fire!

Hunger Games! खरच एक विलक्षण गोष्ट आहे ही !
अजून मी पुस्तक वाचल नाहीये एकही , पण गोष्ट सुंदर आहे…चित्रपट कसे आहेत , याबद्दल इथे चर्चा करायचा अजिबात मानस नाही माझा !

(And knowing the films I watch, I don't think my little "Film Critique" will be valued!)

It is an extra ordinary story of possibilities, imagining the future, human tendencies to react towards fear..The attitude towards systems.. The story captures the human element of all of this very very well.. It is the story of Katnis Everdeen ,the girl on fire.. A story of ordinary girl with extra ordinary will power to survive! Here love for her sister..The moment she participates in the "Hunger Games" , her life changes..and so does everyone elses..People start to think, people start to imagine the possibilities , they start imagining the concept of "FREEDOM", The concept almost unheard of in all the districts.. The hidden fighter starts to find his way out after been entrapped in people for ages..

Amazing storyline and I am sure the books are also a great piece of work.. Planning on reading the books sometime..For now, Cant wait for the next movie!

Sunday, January 26, 2014

अजूनही..


आरसा तोच आहे अजूनही
चेहरे मात्र बदललेत..

रस्ते तिथेच आहेत अजूनही
सोबती मात्र हरवलेत

आठवणी तशाच आहेत अजूनही
जोडलेल्या भावना मात्र बदलल्यायत..

उत्तरेचा तो ध्रुव अढळच आहे अजूनही
दिशा मात्र हरवल्यायत..

सूर्य उगवतोय रोज अजूनही...
दिवस मात्र हरवलेत..

रात्रराणीची जादू तशीच आहे अजूनही..
तिचा सखा मात्र हरवलाय..

खूप खूप सुचतंय अजूनही..
पेनातली शाई मात्र संपतीये..

Sunday, January 19, 2014

That thing!



That thing
           wakes you up every single morning
That thing
            keeps the desire burning
That thing
            makes you strive for excellence
That thing
            brings smile on your face even when you are totally exhausted
That thing
            makes your life truly fabulous
That thing
            brings twinkle in your eyes
That thing
            makes you play harder
That thing
            finds inspiration for you everywhere
That thing
            makes you see the best in everyone!



Sunday, January 12, 2014

काही गोष्टी न बदलणाऱ्या …

खरच… काही गोष्टी कधीही न बदलणाऱ्या असतात… कितीही वर्ष उलटली तरीही त्या गोष्टींमध्ये तसूभर सुद्धा फरक जाणवत नाही ! या वेळी जाणवलेल्या काही गोष्टी

मागच्या महिन्यात नाशिकला गेले होते…एका मैत्रिणीच्या  निमित्ताने … अगदी २४ तासांपेक्षाही  कमी वेळ होते… पण खरंच खूप मस्त वाटलं !! कित्येक जण कॉलेज नंतर आत्ताच भेटले… एवढ्या वर्षांनी  सुद्धा तेच जोक्स , त्याच गप्पा आणि तरीही सगळ हवं हवंसं वाटत होतं !!



याआधी नाशिकला मी २००६ मध्ये गेले होते… तब्बल ८ वर्षांनी पुन्हा गेले … सगळ्यात न बदललेली गोष्टं म्हणजे नागलकर काका काकू , दीदी , तुषार आणि घर! मी अगदी लहान असल्यापासून जातीये तिथे ! खरच खूप खूप छान वाटलं … आणि योग योगाने दीदी आणि तुषार ची सुद्धा भेट झाली… इतक्या वर्षांनी जाउन सुद्धा मला तिथे अजिबात नवीन वाटत नव्हतं ! अगदी "At peace , at home" वाटत होतं…अगदी सकाळी बसून पेपर वाचण्याची जागा , नेहमी च्या dining table वरच्या गप्पा , आजीबात न बदललेली खालची रूम !
मस्त एकदम !खरच असच राहील का हे सगळं कायम ? आपली माणसं … आपल्या जागा… सगळ अगदी तसच्या तस !!



आम्ही नेह्मो लातूर ला जायचा रस्ता , भिगवण च तेच हॉटेल…. तिथला तोच नाश्ता ….गेल्या १५ वर्षांपासून आम्ही लातूरला त्याच रस्त्यावरून जातो आणि त्याच ठिकाणी "हॉटेल सागर " मध्ये नाश्ता करतो आणि पुढे तेम्भूर्णी ला "संत सावतामाळी " टपरी वरचा चहा !! I am a BIG fan of that tea! Its been there since I dont know when, I just love their TEA! इतक्या वर्षात त्यांनी टपरी सुद्धा बदलली नाहीये!!
खिडकीतून बाहेर बघताना सुद्धा त्याच ओळखीच्या गोष्टी,  दूर वरून दिसणाऱ्या निळ्या छप्परांच्या पेपर कंपनीच्या ईमारती … ती कंपनी दोनदा विकली गेली , ज्याने कोणी घेतली त्याने कधीही निळ्या रंगाच छप्पर बदलण्याचा विचार केला नाही वाटतं …. येडशीच्या घाटा नंतर चा cold drink spot! तिथे नेहमी MRP पेक्षा जास्त किमतीत विकल जाणार पाणी आणि कोक! आणि माझा नेहमीच उत्तर माहित असून सुद्धा वाद घालायचा अट्टाहास!! गाडीतली नेहमीची चर्चा आणि कधी हि न संपणारे विषय / वाद !!


काही काही म्हणून बदलत नाही …खरच आणि काही बदलाव असा वाटत सुद्धा नाही !! असू देत असच सगळ!