Sunday, March 26, 2017

The Ship of Theseus

I have been pondering upon the Theseus's paradox all week long! Thats a long span of attention..
For those of us new to this though experiment, here is a brief description from wikipedia

The ship of Theseus, also known as Theseus's paradox, is a thought experiment that raises the question of whether an object that has had all of its components replaced remains fundamentally the same object.

So the concept is if you replace all the components , would you still call it the same object? Reminded of few lines from sandep khare's sang sakhya re..

सरोवर मात्र अजूनही तिथेच ....

पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे पाणीसुद्धा नवयं कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतात सगळे !
------

असाच विचार करताना सुचलेल्या काही ओळी

कोण मी कोण मी
बिचारा आरसा देखील उत्तर देऊ शकत नव्हता
ती इतकी बदलली होती कि ती नक्की कोण हे आरश्याला नव्हे तर तिलाही ओळखू येत नव्हते
पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून वेगळ उत्तर मिळणार नाही हे माहित असून देखील ती विचारात राहिली
तोच प्रश्न अजून एकदा आणि अजून एकदा
नक्की काय घडल होतं ? हि आरश्यात दिसणारी अनोळखी व्यक्ती कोण आणि कशी आली ?
कुठे गेली "ती" जी सापडत नव्हती स्वतःला ! कोण होती ती ?

असा विचार करताना तिला वाटलं कदाचित ती मी नव्हतेच!
हि अनोळखी , नव्याने सापडलेली मीच खरी मी असेन !
कदाचित नवी मी आणि जुनी मी हा प्रश्नच चुकीचा आहे !
रोज नव्याने स्वतःलाच सापडणं म्हणजेच आयुष्य का काय ते असेल
------





No comments:

Post a Comment