Sunday, August 12, 2012

एक तारा तुटलेला..

मधे एक कविता वाचली..बहुतेक हरिवंशराय बच्चन यांची आहे
खूप सुंदर वाटली मला..आणि त्यावरून जाणवलं , एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कदाचित त्या गोष्टीपेक्षा सुद्धा मोठा किंवा महत्वाचा असू शकतो..तुटत्या ताऱ्याला बघून डोळे मिटून काही तरी मागणं या पलीकडे आपण त्या ताऱ्याचा विचार सुद्धा करत नाही..पण या कवितेत त्यांनी लिहिलंय..

                                                          यह परवशता या निर्ममता 
                                                          निर्बलता या बल की क्षमता
                                            मिटता एक, देखता रहता  दूर खड़ा तारक-दल सारा..
                                                              देखो टूट रहा है तारा..

आणि आपण त्याच तारक - दलाच्या त्या ताऱ्याला न वाचवण्याच्या दुःखावरती आपल्या इच्छेचे महाल उभे करतो..ती कविता वाचून मला इतकं वेगळा वाटलं होतं..त्या पडणाऱ्या ताऱ्याकडे बघायचे हे किती दोन वेगळे दृष्टीकोन..तसं बघायला गेलं तर अगदी प्रत्येक गोष्टीबद्दलच हे लागू होतं..

एखाद्या प्रश्नाकडे किंवा समस्येकडे प्रत्येक जण वेगळ्या अर्थाने बघतं..माझा एक मित्र आहे, त्याच्या बोलण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला तर तो फक्त एक वाक्य म्हणतो "As you take it"..खरच जर समजा आपल्या समोर आलेल्या परिस्थितींना बोलता आलं असतं तर त्याही तेच म्हणाल्या असत्या..

No comments:

Post a Comment