Sunday, December 4, 2011

खरंच कधी कधी विचारांच्या गुंत्यात इतके गुंतून जातो आपण कि एक विचार सोडवणं अशक्य वाटायला लागतं..मग एकटेपणा जाणवायला लागतो..समुद्राच्या मध्यभागी असताना तळ, किनारा या गोष्टी किती महत्वाच्या असतात हे कळत..पण म्हणलंय ना "sometimes you just have to pick yourself up and CARRY ON.." 

अशाच एका संध्याकाळी 
घरापासून इतके लांब 
विचार करत बसले होते
शोधात होते मनाचा थांग..

शोधत होते काहीतरी 
कुठेतरी हरवलेले
रे मना सांग ना मला
कुठे रे  शोधू मी आता 

किनारा दिसेना..तळ गवसेना..
माझ्याच मनात मी गेले हरवून..
काहीच का कळेना आता 
विचार करून गेले शिणून..

अशीच थकून बसले असता..
हळूच एक आवाज आला..
काय शोधिसी हे तरी आहे 
का नक्की ठावूक तुला.

कधी कधी गुंतते मन
फक्त विचारांच्या गुंत्यात
तेवा फक्त एक धागा 
मदत करतो उलगडण्यात 



1 comment: